Jalna : खरीप बियाणांची चिंता नाही, रासायनिक खतांचे काय ? जिल्हा प्रशासन लागले कामाला

| Updated on: Apr 11, 2022 | 4:14 PM

खरीप हंगामातील बियाणांसाठी यंदा एक ना अनेक मार्ग खुले आहेत. महाबीजने तर जय्यत तयारी केली आहे बरोबरच एनएसई सारख्या खासगी कंपन्यांकडूनही दरवर्षी बियाणे उपलब्ध करुन घेतले जाते. असे असले तरी ऐन हंगामात शेतकऱ्यांना बियाणांचा तुटवडा भासणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. शिवाय उन्हाळी हंगामातील सोयाबीनमुळे खरिपातील बियाणाचा प्रश्न काहीअंशी तरी मार्गी लागणार आहे.

Jalna : खरीप बियाणांची चिंता नाही, रासायनिक खतांचे काय ? जिल्हा प्रशासन लागले कामाला
रासायनिक खत
Follow us on

जालना : (Kharif Season) खरीप हंगामातील (Kharif Seeds) बियाणांसाठी यंदा एक ना अनेक मार्ग खुले आहेत. महाबीजने तर जय्यत तयारी केली आहे बरोबरच एनएसई सारख्या खासगी कंपन्यांकडूनही दरवर्षी बियाणे उपलब्ध करुन घेतले जाते. असे असले तरी ऐन हंगामात शेतकऱ्यांना बियाणांचा तुटवडा भासणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. शिवाय (Summer Season) उन्हाळी हंगामातील सोयाबीनमुळे खरिपातील बियाणाचा प्रश्न काहीअंशी तरी मार्गी लागणार आहे. बियाणांबाबत कोणताही निर्णय घेतला जाईल पण रासायनिक खतांचे काय? यंदाच्या मागणीप्रमाणे खत पुरवठा होईलच अशी परस्थिती नाही. त्यामुळे उपलब्ध साठा आणि आता नव्याने होणारा पुरवठा याचे नियोजन कृषी विभागाला करावे लागणार आहे. रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात खरिपाच्या नियोजनाबाबत जालन्यात जिल्हा प्रशासनाची बैठक पार पडली आहे.

यंदा भरारी पथकांची भूमिका महत्वाची

बियाणांसह खताचा व्यवस्थित पुरवठा व्हावा, कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये तसेच साठेबाजांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्यात तालुकानिहाय भरारी पथकांची स्थापना केली जाते. दरवर्षी शेतकऱ्यांची तक्रार आल्यावरच ही पथके कार्यन्विय होतात मात्र, यंदाची परस्थिती ही वेगळी आहे. कारण रशिया-युक्रेन युध्दामुळे मागेल तेवढा खताचा पुरवठा हा झालेला नाही. त्यामुळे आहे तो साठ्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. शिवाय खताचा साठा करुन अधिकच्या दराने त्याची विक्री होण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे दरवर्षी तर भरारी पथकांची नेमणूक होते पण यंदाची परस्थिती वेगळी असून विक्रेत्यांवर लक्ष ठेवावे लागणार आहे.

जालन्यासाठी 29 हजार 369 क्विंटल बियाणांची आवश्यकता

उत्पादनाच्या दृष्टीकोनातून खरीप हंगामच महत्वाचा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हंगाम जोमात असतानाच अवकाळीची अवकृपा होते आणि शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागते. जिल्ह्यातील खरिपाचे क्षेत्र लक्षात घेता यंदा 29 हजार 369 क्विंटल बियाणाची आवश्यकता भासणार आहे. जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र 6 लाख 45 हजार हेक्टर एवढे आहे. त्यानुसारच नियोजन करावे लागणार आहे. खरिपात तूर, उडीद, मुग, सोयाबीन, कापूस या पिकांचा पेरा अधिक प्रमाणात होत असतो.

डीएपी चा मात्र संरक्षित साठा

खरीप हंगामात डीएपी या रासायनिक खतालाच अधिकची मागणी असते. त्यामुळे याचा संरक्षित साठा केला जाणार आहे. जिल्ह्यात 2 लाख 53 हजार मेट्रीक टन खताची आवश्यकता भासेल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यानुसार 2 लाख 13 हजार 350 मे.टन खताचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. शिवाय कृषी विभागाकडे 57 हजार 895 मे.टन खत हे शिल्ल्क आहे. त्यामुळे योग्य नियोजन झाले तर खताचीही टंचाई भासणार नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड. मुख्यकार्यकारी अधिकारी मनुज जिंदल आणि जिल्हा कृषी अधीक्षक भीमराव रणदिवे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली आहे.

संबंधित बातम्या :

Rabi Season अंतिम टप्प्यात, शेतीमालाची साठवणूक करायची कशी? शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला

Watermelon : उत्पादन वाढीसाठी कायपण!, हनुमंतगाव शिवारात कलिंगड शेतातच भव्य मेळावा

Video : शॉर्टसर्किटमुळे शेतीमालाची होळी, डोळ्यासमोरच स्वप्नांचा चुराडा झाल्याने शेतकऱ्याचा टाहो