Grape : द्राक्ष बागांवरील संकट कायम, भुरी रोगाच्या प्रादुर्भावासाठी अनुकूल वातावरण, असे करा व्यवस्थापन

आगोदर द्राक्षांच्या उबदार ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडून रात्र पाळीने शेकोट्या पेटवल्या जात आहेत. ढगाळ हवामान, कमी ते मध्यम तापमान व दमट वातावरण या बाबी भुरी रोगासाठी अनुकूल आहेत. दिवसातील कोरडे वातावरण आणि कमी तापमान अशा अनुकूल परिस्थितीमध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असतो.

Grape : द्राक्ष बागांवरील संकट कायम, भुरी रोगाच्या प्रादुर्भावासाठी अनुकूल वातावरण, असे करा व्यवस्थापन
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 7:29 AM

मुंबई : वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम यंदा फळबाग क्षेत्रांवर झालेला आहे. यामध्ये ( Grape fruit) द्राक्ष आणि आंबा फळबागांचा प्रकर्षाने सहभाग होतो. (Climate Change) सद्यः परिस्थिती पाहता वातावरणामध्ये थंडीचे प्रमाण वाढले आहे. वाढलेली थंडी आणि सकाळी पडणारे दवामुळे द्राक्ष बागेत भुरी रोगास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. आगोदर द्राक्षांच्या उबदार ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडून रात्र पाळीने शेकोट्या पेटवल्या जात आहेत. ढगाळ हवामान, कमी ते मध्यम तापमान व दमट वातावरण या बाबी भुरी रोगासाठी अनुकूल आहेत. दिवसातील कोरडे वातावरण आणि कमी तापमान अशा अनुकूल परिस्थितीमध्ये (brown disease) भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असतो. यावर्षी सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे बागेत एकाच वेळी डाऊनी मिल्ड्यू प्रमाणेच भुरी रोगामुळे देखील द्राक्ष उत्पादनात मोठे नुकसान होते. अशा परिस्थितीमध्ये योग्य प्रकारे नियंत्रण मिळवण्यासाठी भुरी रोगाची लक्षणे अचूक ओळखता येणे आवश्यक आहे.

ही आहेत भुरी रोगाची लक्षणे

* प्रतिकूल वातावरणामुळे इरिसिफे निकेटर या रोगकारक बुरशीचा प्रादुर्भाव द्राक्ष बागेवर होतो. या रोगाचा प्रादुर्भामुळे वेलीच्या सर्व हिरव्या भागावर होतो. मात्र बुरशीचे धागे प्रत्यक्ष वेलीच्या भागात प्रवेश न करता पृष्ठभागावरच वाढतात.

* पानांच्या खालील बाजूस काळसर रंगाचे डाग दिसून येतात. सुरुवातीला पानावर पांढरट ठिपके व नंतर ते भुरकट होऊन संपूर्ण पान काळपट दिसते. वाढत्या प्रसारासोबत हे डाग मोठे व भुरकट रंगाचे होत जातात.

* फुलोरा अवस्थेत रोगाची लागण झाल्यास फलधारणा होत नाही. फळ धारणेच्या वेळी प्रादुर्भाव असल्यास मणी लहान आकाराचे होतात. काही मणी अपरिपक्वच राहतात. पांढऱ्या रंगाच्या बुरशीचा थर मण्यांवर येऊन मणी तडकतात व फुटतात

* पावसाळ्याच्या दिवसांत कमी पाऊस आणि ढगाळ वातावरणामध्ये वाऱ्यामार्फत भुरी रोगाचा प्रसार अधिक प्रमाणात होतो.

असे करा व्यवस्थापन

  • सद्यपरिस्थितीत टोपणगळ अवस्थेमध्ये असणाऱ्या व स्थानिक बाजारपेठेत जाणाऱ्या द्राक्ष बागेमध्ये भुरीच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही करशीनाशकांचा वापर करावा. अशा बागांमध्ये सायफ्लुफेनामाइड 0.5 मिलि प्रति लिटर पाणी किंवा फ्लुओपायरम टेब्यूकोनॅझोल संयुक्त करशीनाशक 0.563 मिलि प्रति लिटर पाणी किंवा फ्लुक्झापायरॉक्झाइड ( 75 ग्रॅम प्रति लिटर ) अधिक डायफेनोकोनॅझोल ( 50 ग्रॅम प्रति लिटर ) एससी ( या फॉर्म्युलेशनचे संयुक्त बुरशीनाशक ) 0.8 मिलि प्रति लिटर पाणी किंवा मेट्रॉफेनॉन 0.25 मिलि प्रति लिटर याप्रमाणे बुरशीनाशकांची फवारणी करावी.
  • बेदाणा उत्पादन घेणाऱ्या बागायतदार देखील भुरी नियंत्रणासाठी बुरशीनाशकांचा वापर करू शकतात. फळधारणा होत असलेल्या व निर्यातक्षम बागांमध्ये भुरीच्या नियंत्रणासाठी, सल्फर (40 एस. सी) 3 मिलि किंवा अम्पिलोमायसिस क्विसक्वॉलिस 5 मिलि प्रति लिटर याप्रमाणे वापर करावा लागणार आहे. भुरीचा प्रादुर्भाव अधिक असल्यास क्लोरीन डायऑक्साइड (50 पीपीएम) 2 मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी लागणार आहे.
  •  फवारणी सर्व पाने आणि घडांवर एकसारखी होईल याची काळजी घ्यावी. जेणेकरून सर्व बुरशी नाहीशी होऊन पुढील प्रादुर्भाव टाळला जाईल. दर 15 दिवसांच्या अंतराने ट्रायकोडर्मा व बॅसिलस सबटिलिस डी आर – 39 ची 2 मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी व ड्रेचिंग करावे.

(संबंधित माहिती राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे येथील डॉ. सुजोय साहा यांच्या लेखातील आहे. कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसारच शेतकऱ्यांनी व्यवस्थापन करावे)

संबंधित बातम्या :

Kharif Season : सोयाबीन, कापसानंतर आता तुरीवर मदार, आवक सुरु दराचे काय?

Natural Farming: देशभरात 43 लाखांहून अधिक शेतकरी करतात सेंद्रिय शेती, ‘हे’ राज्य आहे आघाडीवर

निवड झाली आता अंमलबजावणी करा अन् योजनेचा लाभ घ्या, पशूसंवर्धन विभागाचे काय आहे आवाहन?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.