Natural Farming: देशभरात 43 लाखांहून अधिक शेतकरी करतात सेंद्रिय शेती, ‘हे’ राज्य आहे आघाडीवर

सेंद्रिय शेती पध्दतीमध्ये वाढ व्हावी यासाठी केंद्र सरकारचा कायम पुढाकार राहिलेला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदा यांची ही महत्वकांक्षा आहे. काळाच्या ओघात नैसर्गिक शेतीक्षेत्र वाढावे याकिता कृषी विभागाच्या वतीने जनजागृती केली जात आहे. पण सध्या देशभरातील 43 लाख 38 हजार 495 शेतकरी हे सेंद्रिय शेती करीत आहेत.

Natural Farming: देशभरात 43 लाखांहून अधिक शेतकरी करतात सेंद्रिय शेती, 'हे' राज्य आहे आघाडीवर
संग्रहीत छायाचित्र

मुंबई : सेंद्रिय शेती पध्दतीमध्ये वाढ व्हावी यासाठी (Central Government) केंद्र सरकारचा कायम पुढाकार राहिलेला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदा यांची ही महत्वकांक्षा आहे. काळाच्या ओघात नैसर्गिक शेतीक्षेत्र वाढावे याकिता कृषी विभागाच्या वतीने जनजागृती केली जात आहे. पण सध्या देशभरातील 43 लाख 38 हजार 495 शेतकरी हे सेंद्रिय शेती करीत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या राज्यात या सेंद्रिय शेतीचा उद्य झाला त्या महाराष्ट्रात नाही तर (Madhya Pradesh) मध्यप्रदेशामध्ये अधिक शेतकरी हे या शेती पध्दतीचा अवलंब करीत आहेत. सेंद्रिय शेती करणारे 7 लाख 73 हजार शेतकरी हे मध्यप्रदेशातील आहेत. एवढेच नाही तर यामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकार हे प्रयत्न करीत आहे. मध्य प्रदेश सरकारने २००१-२००२ मध्ये सेंद्रिय शेतीचे (Organic Farming) काम सुरू केले.  शेतकऱ्यांच्या माध्यमातून या राज्याला स्वावलंबी करण्याचे धोरण असल्याचा मनोदय फलोत्पादन आणि अन्न प्रक्रिया मंत्री भरतसिंग कुशवाह यांनी व्यक्त केला आहे. सध्या राज्यात 17 लाख 31 हजार हेक्टरमध्ये सेंद्रिय शेती होत आहे.

यामुळे वाढले मध्यप्रदेशमध्ये क्षेत्र

केवळ घोषणाच नाही तर अंमलबजावणीसाठी मध्यप्रदेश सरकारने महत्वाचे असे पाऊल उचलले आहे. याकरिता प्रथम बागायती क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती अवलंबण्याचा अट्टाहास करण्यात आला होता. त्याच अनुशंगाने कुशवाह यांनी खंडवा येथील रिची गार्डन येथे सेंद्रिय पद्धतीने उत्पादित होणाऱ्या पिकांची पाहणी केली. शिवाय बागायती विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना अधिकाधिक सेंद्रिय शेती करण्यास प्रवृत्त करण्यास सांगितले. स्थानिक पातळीवर सेंद्रिय शेतीचे फायदे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याने हा बदल झाला आहे. याबरोबरच कृषी योजनांबाबतही जनजागृती होत असल्याचे कुशावह यांनी सांगितले आहे.

सेंद्रिय शेती क्षेत्र वाढवण्याचा कानमंत्र

राज्यातील फळे आणि भाजीपाला उत्पादन घेणारे शेतकरी हे सेंद्रिय पध्दतीचा अवलंब करण्यास तयार आहेत याचा आढावा घेणे गरजेचे आहे. अशा पध्दतीने लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या सर्वेक्षण करून गोळा करणे आवश्यक आहे. सेंद्रिय भाज्या आणि फळांच्या उत्पादनात गुंतलेल्या शेतकऱ्यांनाही मदत केली जाणार आहे. गोशाळातून शेणाचे सेंद्रिय खत थेट शेतकऱ्यांपर्यंत सेंद्रिय खतासाठी नेण्याचे नियोजन करणे महत्वाचे. सेंद्रिय पध्दतीने शेती होत असलेल्या भागात गो शाळांशी जोडल्यानंतर शेतकरी आणि गौशाळा या दोघांनाही फायदा होणार असल्याचे भरतसिंग कुशवाह यांनी सांगितले आहे.

दुसरी बाजू अशी

आयसीएआरने स्थापन केलेल्या तज्ज्ञांच्या पॅनेलचे अध्यक्ष आणि तेलंगणा राज्य कृषी विद्यापीठाचे कुलगुरू व्ही. प्रवीण राव यांनी म्हटले आहे की, जर शेतकऱ्यांनी कृत्रिम रसायनांचा वापर थांबवला आणि सेंद्रीय शेतीचा अवलंब स्वीकारला तर कृषी उत्पादनात मोठी घट होईल, जे भारताच्या अन्न सुरक्षेला आव्हान ठरू शकते. भारतीय कृषी संशोधन समितीने वर्तवलेला हा अंदाज देखील महत्वाचा असून संपूर्ण अभ्यास करुनच सेंद्रिय शेतीचा विस्तार होणे गरजेचे आणि टिकावू राहणार आहे.

संबंधित बातम्या:

Grape Harvesting : हंगाम सुरु झाला, व्यापारीही दाखल मग द्राक्ष काढणीला कशामुळे लागला ‘ब्रेक’

निवड झाली आता अंमलबजावणी करा अन् योजनेचा लाभ घ्या, पशूसंवर्धन विभागाचे काय आहे आवाहन?

Hailstorm : आता एवढंच बाकी होतं, ढगाळ वातावरणाने पिकांचे अन् गारपिटीने भाजीपाल्याचे नुकसान

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI