Grape Harvesting : हंगाम सुरु झाला, व्यापारीही दाखल मग द्राक्ष काढणीला कशामुळे लागला ‘ब्रेक’

शेतकऱ्यांसाठी यंदाच्या वर्षात सर्वकाही नुकसानीचे ठरत आहे. मग ते अवकाळी पाऊस असो की दरवर्षी फायद्याची ठरणारी थंडी असो. थंडीमुळे पिकाची वाढ होते, फळ बागांना मोहर लागतो पण अधिकच्या गारठ्यामुळे सांगली जिल्ह्यात थेट द्राक्ष काढणीलाच ब्रेक बसला आहे.

Grape Harvesting : हंगाम सुरु झाला, व्यापारीही दाखल मग द्राक्ष काढणीला कशामुळे लागला 'ब्रेक'
आता वातावरण निवाळल्याने द्राक्ष निर्यातीमध्ये वाढ झाली आहे.
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 3:07 PM

सांगली : शेतकऱ्यांसाठी यंदाच्या वर्षात सर्वकाही नुकसानीचे ठरत आहे. मग ते (Untimely Rain) अवकाळी पाऊस असो की दरवर्षी फायद्याची ठरणारी थंडी असो. थंडीमुळे पिकाची वाढ होते, फळ बागांना मोहर लागतो पण अधिकच्या गारठ्यामुळे (Sangli District) सांगली जिल्ह्यात थेट द्राक्ष काढणीलाच ब्रेक बसला आहे. (Grape Crop) द्राक्ष बागा ह्या गेल्या तीन महिन्यांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत आहेत, मात्र, वर्षभर केलेला खर्च आणि आता पीक पदरात पडतानाच माघार कशी घ्यायची म्हणून शेतकऱ्यांनी खर्चाचा विचार न करता बागा जोपासण्यावर भर दिला पण आता हंगाम सुरु झाला तरी संकटाची मालिका ही सुरुच आहे. वाढलेल्या गारट्यामुळे द्राक्ष काढणी करताना मण्यांना तडा जात आहे. त्यामुळे न भरुन निघणारे नुकसान होत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून द्राक्ष काढणी रखडलेली आहे.

नेमके काय नुकसान होते?

अगोदरच अवकाळी, गारपिट आणि ढगाळ वातावरणामुळे उत्पादनात घट होणार आहे. याची माहिती शेतकऱ्यांना देखील आहे. त्यामुळे आता अधिकचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी काळजी घेत आहेत. वाढलेल्या गारठ्यामुळे मण्यांना तडे जात असल्याने बागांमध्येच शेकोट्या पेटवण्याची नामुष्की ओढावली होती. आता अशा अवस्थेत जर द्राक्षाची काढणी केली तर बाजारपेठेत जाईपर्यंत द्राक्ष खराब होतात. परिणामी कमी दर मिळेल म्हणून काढणी ही लांबणीवार पडणार आहे.

व्यापारी दाखल मात्र, वेटींवरच

नाशिक पाठोपाठ सांगली जिल्ह्यात द्राक्षाचे मोठे क्षेत्र आहे. शिवाय द्राक्ष खरेदीसाठी दक्षिण भारतामधून व्यापारी हे जिल्ह्यातही दाखल झाले आहेत. मात्र, वाढलेल्या गारट्यामुळे द्राक्षांची काढणी शक्य नाही म्हणून दर ठरवूनही पुढची प्रक्रिया ही करता येत नाही. अगोदरच हंगाम सुरु होण्यास विलंब झाला आहे. असे असताना काढणीच्या दरम्यानही शेतकऱ्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अजून काही दिवस अशीच परस्थिती राहिली तर दरावरही त्याचा परिणाम होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

सर्वकाही नुकसानीचेच, निसर्गामुळे यंदा द्राक्षावर संक्रात

दरवर्षी नुकसान होत नाही असे नाही पण त्याची तीव्रता ही कमी असते. यंदा गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी विविध समस्यांना सामोरे जात आहे. आता कुठे सर्वकाही सुरळीत होत असताना दरवरर्षी पोषक ठरणारी यंदा मारक ठरत आहे. अशा अवस्थेत जर काढणी सुरु ठेवली तर चार पैसे मिळणार आहेत त्यावरही संक्रात येईल म्हणून काढणी बंद असल्याचे द्राक्ष बागायत संघाचे विभागीय अध्यक्ष संजय बरगाले यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

निवड झाली आता अंमलबजावणी करा अन् योजनेचा लाभ घ्या, पशूसंवर्धन विभागाचे काय आहे आवाहन?

Hailstorm : आता एवढंच बाकी होतं, ढगाळ वातावरणाने पिकांचे अन् गारपिटीने भाजीपाल्याचे नुकसान

Grape Rate: अखेर ज्याची भीती होती तेच झालं, महिन्याभरापूर्वीच झाला होता द्राक्ष बागायत संघाचा निर्णय

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....