Kharif Season : सोयाबीन, कापसानंतर आता तुरीवर मदार, आवक सुरु दराचे काय?

खरीप हगांमातील शेवटचे पीक म्हणून तुरीकडे पाहिले जाते. सध्या तुरीची आवक सुरु झाली असली तरी खरा हंगाम हा मार्चमध्येच सुरु होणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरु झाली असली तरी येथील हमीभावापेक्षा अधिकचा दर तुरीला मिळेल असाच अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत.

Kharif Season : सोयाबीन, कापसानंतर आता तुरीवर मदार, आवक सुरु दराचे काय?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 4:48 PM

लातूर :  (Kharif Season) खरीप हगांमातील शेवटचे पीक म्हणून तुरीकडे पाहिले जाते. सध्या तुरीची आवक सुरु झाली असली तरी खरा हंगाम हा मार्चमध्येच सुरु होणार आहे. (Central Government) केंद्र सरकारच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरु झाली असली तरी येथील हमीभावापेक्षा अधिकचा दर तुरीला मिळेल असाच अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत. गेल्या महिन्याभरात दरात झालेली वाढ आणि सोयाबीन, कापसाप्रमाणेच तुरीचे घटलेले उत्पन्न यामुळे दरात वाढ होईल मात्र,  (Farmer) शेतकऱ्यांना याकरिता काही वेळीची प्रतिक्षा करावी लागणार आहे. 6 हजार 300 चा हमीभाव ठरवून देण्यात आला आहे. परंतू, हे पीक अंतिम टप्प्यात असताना झालेल्या अवकाळी पावसामुळे आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही. मात्र, ऐन हंगामात तुरीची आवक कमी राहिली तर दरात वाढ निश्चित मानली जात आहे.

महाष्ट्रात सर्वाधिक लागवड क्षेत्र

तूर हे देशपातळीवर घेतले जाणारे पीक आहे. 44 लाख हेक्टर सरासरी क्षेत्र असले तरी पैकी एकट्या महाराष्ट्रात 12 लाख 77 हजार हेक्टराव हे पीक घेतले जात आहे. वाढत्या क्षेत्राप्रमाणेच उत्पादनातही वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. पण अखेरच्या टप्प्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान तर झालेच पण ढगाळ वातारणामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. हंगामात केवळ तूर पीकच जोमात होते पण अखेरच्या टप्प्यात या पिकाचीही अवस्था सोयाबीन अन् कापसाप्रमाणेच झाली.

सध्या काय आहे तुरीचे चित्र?

बहुतांश भागातील तुरीची काढणी कामे पूर्ण झाली आहे. अवकाळी पावसामुळे काढून टाकलेल्या पिकाचेही नुकसान झाले आहे. तर लातूर, अकोला, देगलूर, नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवकही सुरु झाली आहे. काही ठिकाणी शेतकरी हे खरेदी केंद्राचा आधार घेत आहेत पण वातावरणातील बदलामुळे नव्या तुरीमध्ये आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे 10 टक्के पेक्षा जास्त ओलावा असलेली तूर खरेदी केंद्रावर घेतली जात नाही. शेतकऱ्यांना कमी दरामध्ये व्यापाऱ्यांकडेच विक्री करावी लागत आहे. त्यामुळे सध्या 5 हजार 500 पासून ते 6 हजार 600 पर्यंत तुरीला दर मिळत आहे.

यामुळे दरात होणार वाढ

गेल्या 15 दिवसांपासूनच नव्या तुरीची आवक सुरु झाली आहे. या दरम्यानच्या काळातच 5 हजार ते 5 हजार 800 पर्यंतचे दर आता थेट 6 हजार 300 पर्यंत पोहचलेले आहेत. सध्या तुरीने हमी भावापर्यंत मजल मारली आहे. पण भविष्याचा विचार केला तर यंदा तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलेले आहे. शेतकऱ्यांनी जी सोयाबीन आणि कापसाबाबत भूमिका घेतली होती तीच तुरीबाबत घेतली तर दर निश्चित वाढणार आहेत. सध्या ढगाळ वातावरण असल्याने तूर वाळवण्यातही अडचणी येत आहेत. परंतू, तुरीची योग्य निघराणी आणि मागणीनुसार पुरवठा केला तर मात्र, दरात वाढ होणार असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी tv9 मराठी शी बोलताना सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Natural Farming: देशभरात 43 लाखांहून अधिक शेतकरी करतात सेंद्रिय शेती, ‘हे’ राज्य आहे आघाडीवर

Grape Harvesting : हंगाम सुरु झाला, व्यापारीही दाखल मग द्राक्ष काढणीला कशामुळे लागला ‘ब्रेक’

निवड झाली आता अंमलबजावणी करा अन् योजनेचा लाभ घ्या, पशूसंवर्धन विभागाचे काय आहे आवाहन?

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.