PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये कधी येणार, या तारखेला… सर्वात महत्त्वाची अपडेट समोर!

पीएम शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्याला 2000 रुपये दिले जातात. या योजनेचा कोट्यवधी शेतकऱ्यांना लाभ होतो. परंतु अद्याप शेतकऱ्यांना 22 वा हप्ता मिळालेला नाही. तो कधी मिळणार याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये कधी येणार, या तारखेला... सर्वात महत्त्वाची अपडेट समोर!
pm kisan samman nidhi 22 installment
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 02, 2026 | 8:39 PM

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी ही केंद्र सरकारची सर्वात प्रसिद्ध आणि चर्चेत असणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांची मदत करते. एकूण तीन टप्प्यांत ही मदत दिली जाते. प्रत्येक टप्प्यात 2000 रुपये दिले जातात. या योजनेत थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेचे एकूण 21 हप्ते मिळालेले आहेत. 19 नोव्हेंबर 2025 रोजी हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवण्यात आला होता. आता शेतकरी 22 व्या हप्त्याची वाट पाहात आहेत. फेब्रुवारी महिन्यात हा हप्ता मिळणे अपेक्षित होते.

शेतकऱ्यांकडून विचारले जात आहेत हे दोन प्रश्न

परंतु अजूनही शेतकऱ्यांना ही रक्कम मिळालेली नाही. त्यामुळेच 2000 रुपये मिळण्यास विलंब का होत आहे? तसेच पीएम शेतकरी सन्मान योजनेचा 22 वा हप्ता नेमका कधी मिळणार? हे दोन प्रश्न विचारले जात आहेत. याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.

अद्याप 22 वा हप्ता मिळालेला नाही

मिळालेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे शेतकरी कार्ड काढले जात आहे. शेतकऱ्यांना त्यासाठीची प्रक्रिया पूर्व करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. तसेच इतर काही तांत्रिक कारणांमुळेदेखील या योजनेतील 22 वा हप्ता अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही.

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे कधी येणार?

दरम्यान, शेतकऱ्यांना 22 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यातच मिळणे अपेक्षित होते. परंतु अजूनही तो मिळालेला नाही. आता मार्च महिन्यात होळी या सणापर्यंत शेतकऱ्यांच्या बँख खात्यात पैसे पडतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु तेथेही शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. आता हे पैसे नेमके कधी मिळणार, याबाबतची स्पष्ट आणि नेमकी तारीख समोर आलेली नाही. परंतु मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात हे पैसे मिळू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तत्पूर्वा शेतकऱ्यांनी किसान कार्ड काढून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us