AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डबल सिलिंडर CNG, ऑटोमेटिक गिअरबॉक्स, नवीन Tata Altroz ची किंमत किती ?

Tata Motors ने नवीन Altroz iCNG AMT कार लाँच केली आहे. यात फॅक्ट्री फिटेड सीएनजी सिलिंडर देण्यात आले आहेत आणि एएमटी गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

डबल सिलिंडर  CNG, ऑटोमेटिक गिअरबॉक्स, नवीन Tata Altroz ची किंमत किती ?
Tata Altroz
| Updated on: May 12, 2026 | 8:47 PM
Share

देशाची सर्वात मोठी कार कंपनी टाटा मोटर्सने आपली लोकप्रिय प्रीमीयम हॅचबॅक Tata Altroz iCNG AMT चे नवीन AMT व्हर्जन लाँच केले आहे.खास बाब म्हणजे फॅक्ट्री फिटेड सीएनजी किट सह ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय असणारी ही भारताची पहिली आणि एकमेव प्रीमीयम हॅचबॅक कार बनली आहे.किती आहे या कारची किंमत पाहूयात….

शहरात रोजची ड्राईव्ह करणाऱ्यांसाठी आणि ज्यांना सोपे ड्रायव्हिंग आणि चांगला मायलेज हवे, खास त्यांसाठी ही नवीन Altroz iCNG AMT कार बाजारात आणण्यात आली आहे. आता सीएनजी कार खरेदी करणाऱ्यांना वारंवार क्लच आणि गिअर बदलण्याच्या अडचण राहणार नाही. एएमटी तंत्रज्ञान ट्रॅफीकमध्ये ड्रायव्हरना जास्त आरामदायक ड्रायव्हिंगचा अनुभव देते.

कारचा सर्वात मोठी खास बाब

या कारची सर्वात मोठी खासियत म्हणजे याची ट्विन – सिलिंडर टेक्नॉलॉजी आहे. सर्वसाधारणपणे सीएनजी कारमध्ये मोठा सिलिंडर असल्याने बूट स्पेसची खूप कमतरता जाणवते. मात्र टाटाने या कारमध्ये दोन छोटे सिलिंडर दिले आहेत. जे बूट फ्लोरच्या खाली लावलेले आहेत. यामुळे कारमध्ये २१० लिटरचा बूट स्पेस वाचतो. तुलना केली असता पेट्रोल आणि डिझेल व्हर्जनमध्ये ३४५ लिटरचा बूट स्पेस मिळतो.

नवीन Altroz iCNG AMT मध्ये अत्याधुनिक ECU सिस्टीम देण्यात आला आहे.ज्यामुळे कार पेट्रोल आणि सीएनजी मोडच्या दरम्यान सहज स्विच करता येते. याशिवाय कारमध्ये डायरेक्ट सीएनजी स्टार्ट फिचर देखील मिळते. म्हणजे कार थेट सीएनजी मोडमध्येही स्टार्ट होऊ शकते.

पॉवरफुल इंजिन

नवीन Altroz iCNG AMT मध्ये 1.2 लिटर Revotron iCNG इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन सीएनजी मोडमध्ये 73.5bhp ची पॉवर आणि 103Nm चे टॉर्क जनरेट करते.पहिल्यांदा या इंजिनासोबत AMT गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की हा सेटअप शहरातील ट्रॅफीकमध्ये स्मूद आणि आरामदायी ड्रायव्हींग देण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

डिझाईन

डिझाईनचे बोलायचे झाले तर या कारमध्ये लेटेस्ट Altroz वाला नविन लुक पाहायला मिळतो. यात फ्लश डोअर हँडल, कनेक्टेड एलईडी टेल लाईट्स आणि एलईडी हेडलँप्ससोबत डीआरएल देण्यात आले आहेत. कारचे इंटेरिअर देखील खूप प्रीमियम आहे. यात दोन मोठे 26.03 सेंटीमीटर डिजिटल डिस्प्ले, सॉफ्ट-टच डॅशबोर्ड, एम्बिएंट लायटिंग आणि आरामदायक रिअर सिट्स देण्यात आल्या आहेत.

सेफ्टी

सेफ्टीच्या बाबतीतही Altroz मजबूत मानली जात आहे. ही कार Tata च्या ALFA आर्किटेक्चरवर बनलेली आहे. याला 5-स्टार Bharat NCAP सेफ्टी रेटिंग मिळालेली आहे. कारमध्ये स्टँडर्ड म्हणून सहा एअर बॅग, ESP, ISOFIX चाईल्ड सिट माऊंट आणि रिव्हर्स पार्किंग सेंसर देण्यात आले आहेत.तसेच टॉप व्हेरिएंट्समध्ये 360 डिग्री कॅमरा,टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, ऑटो हेडलँप्स आणि LED फॉग लँप सारखे फिचर्स देखील मिळत आहे. कंपनीने या कारची एक्स शोरुम किंमत 8.69 लाख रुपये ठेवली आहे.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं