Electric Car : ‘इलेक्ट्रिक कार’ चांगली आहे, पण खरेदी करताना काळजी घ्या, अन्यथा दुर्लक्ष महागात पडेल !

| Updated on: Apr 26, 2022 | 8:00 AM

देशात इलेक्ट्रिक कारची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. पण पेट्रोल-डिझेलसारखी इलेक्ट्रिक कार खरेदी करणे इतके सोपे नाही. यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया इलेक्ट्रिक कार घेण्यापूर्वी कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत?

Electric Car : ‘इलेक्ट्रिक कार’ चांगली आहे, पण खरेदी करताना काळजी घ्या, अन्यथा दुर्लक्ष महागात पडेल !
Electric Car
Image Credit source: tv9
Follow us on

जगभरात ‘इलेक्ट्रिक कार’ ला (Electric car) प्रचंड मागणी आहे. ‘टेस्ला ते टाटा’ पर्यंतच्या कंपन्या सतत त्यांच्या ‘इलेक्ट्रिक कार’ चे नवीन मॉडेल लॉंच करण्याच्या तयारीत असतात. इलेक्ट्रिक कार केवळ इंधन वाचवण्याचा एक उत्तम पर्याय नाही तर पर्यावरणासाठी एक उत्तम उपाय आहे. तुम्हीही इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिक कार या पेट्रोल-डिझेल किंवा ‘सीएनजी’ सारख्या पारंपरिक (Conventional like CNG) कारपेक्षा वेगळ्या आहेत. जर, तुम्ही इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल तर या फायद्यांबद्दल नक्कीच जाणून घ्या. अर्थात ही कार किमतीच्या बाबतीत इतर कारच्या तुलनेत महाग आहे. तुमच्या खिशाला न परवरणारीही वाटू शकते परंतु, या कारच्या खरेदीवर तुम्हाला करात सवलत (Tax relief) दिली जाते. कोणतीही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यापूर्वी या पाच गोष्टींकड़े प्राधान्यांने लक्ष केंद्रीत करा.

1. किमतींकडे विशेष लक्ष द्या

इलेक्ट्रिक वाहन पर्यावरणासाठी खूप चांगले आहे परंतु खिशाच्या दृष्टीने ते ग्राहकांवर थोडे भारी पडू शकते. महागड्या बॅटरी पॅकमुळे त्याची किंमत डिझेल-पेट्रोलपेक्षा जास्त आहे, त्यामुळे सर्वात आधी त्याची किंमत जाणून घेणे आवश्यक आहे. एका छोट्या हॅचबॅक इलेक्ट्रिक कारची किंमत 6 लाखांपेक्षा जास्त आहे.

2. कर सवलत

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारही खूप प्रयत्न करत आहे. इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सरकार विविध प्रकारचे कर सवलत देते. जर तुम्ही इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल तर या फायद्यांबद्दल नक्कीच जाणून घ्या. अर्थात ही कार किमतीत तुमच्या खिशाला भारी आहे, पण तुम्ही टॅक्सच्या माध्यमातून काही पैसे वाचवू शकता. इटिक

3. ड्रायव्हिंग रेंज

इलेक्ट्रिक कारमध्ये ड्रायव्हिंग रेंज ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ड्रायव्हिंग रेंज जितकी जास्त असेल तितके ग्राहकांसाठी ते अधिक चांगले असेल. कार खरेदी करताना कंपनीच्या दाव्यावर विश्वास ठेवू नका. हे तपासण्यासाठी, प्रत्यक्षात ही वाहने चालवणाऱ्या लोकांशी बोला. त्यानंतर अंदाज लावा की ही ड्रायव्हिंग रेंज तुमच्यासाठी खरोखर योग्य आहे का? रोजच्या ड्राईव्हसाठी इलेक्ट्रिक कार 100 किमी पेक्षा जास्त धावणे फायदेशीर आहे. हाय-एंड कारबद्दल बोलायचे तर त्यांची ड्रायव्हिंग रेंज 400 किमी पर्यंत आहे.

4. बॅटरीचे आयुष्य

बॅटरी पॅक कोणत्याही इलेक्ट्रिक कारचा सर्वात महाग आणि आवश्यक घटक आहे. कारमधील बॅटरी पॅक बदलणेही तुमच्या खिशाला भारी पडू शकते. त्यामुळे इलेक्ट्रिक कार घेण्यापूर्वी बॅटरीचे आयुष्य किती आहे हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात तुम्ही तुमच्या कारची बॅटरी बदलल्यास, तुमच्या खिशावर किती खर्च येईल? याबाबत संपूर्ण माहिती घेऊनच कार खरेदी करा.

5. चार्जिंग पर्याय

जगात इलेक्ट्रिक कारची मोठी श्रेणी आहे. फास्ट चार्जिंग, स्टँडर्ड चार्जिंग आणि स्लो चार्जिंग असे पर्याय आहेत. जलद चार्जर बसवण्यासाठी खूप खर्च येतो. भारताविषयी बोलायचे झाले तर चार्जिंग स्टेशनची पायाभूत सुविधा अद्याप इतकी विकसित झालेली नाही. कार लवकर चार्ज करता यावी यासाठी शहरात जलद चार्जिंगचे पर्याय उपलब्ध आहेत. घरामध्ये स्टँडर्ड आणि स्लो चार्जिंग सारखे पर्याय आहेत. कार खरेदी करण्यापूर्वी, तुम्हाला या चार्जिंग पर्यायांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

Jeep Meridian : ‘एसयूव्ही’ सेगमेंटमध्ये जीपची धमाकेदार एंट्री; 7 सीटर कार मेरिडियनचे बुकिंग या तारखेपासून सुरू, जाणून घ्या, केव्हा मिळेल डिलिव्हरी !

Best deal: निम्म्यापेक्षा कमी किमतीत होंडा ॲक्टिव्हा खरेदी करण्याची संधी

पेट्रोल-डिझेलची चिंता सोडा, सीएनजीच्या पर्यायांसह ‘या’ चार एसयुव्ही कार खरेदी करा