AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुर्मिळ चौसिंगा हरणाला गोळ्या घातल्या…पानशेतच्या रस्त्यावर रक्ताचे सडे; चौघांना अखेर… पोलिसांची मोठी कारवाई

राजगड-पानशेत भागात दुर्मिळ चौसिंगा हरिणाची शिकार करणाऱ्या चौघांना वन विभागाने अटक केली आहे. ओसाडे येथील घटनेने वन्यजीव गुन्हेगारी उघडकीस आली, ज्यात शिकारींनी हरिणाला गोळ्या घालून ठार केले. रक्ताळलेल्या अवस्थेत मांस वाटप करताना ते सापडले. वन्यजीव कायद्यानुसार कडक कारवाई, ७ वर्षांपर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो. वन विभाग सतर्क असून शिकारींवर कठोर कारवाई करत आहे.

दुर्मिळ चौसिंगा हरणाला गोळ्या घातल्या...पानशेतच्या रस्त्यावर रक्ताचे सडे; चौघांना अखेर... पोलिसांची मोठी कारवाई
हरिणाची शिकार
| Updated on: Dec 30, 2025 | 2:08 PM
Share

राजगड, पानशेत तसेच पश्चिम हवेली सिंहगड भागात वन्यप्राण्यांच्या शिकणाऱ्यांनी धुमाकूळ घातला आहे. राजगडच्या पानशेत रस्त्यावरील ओसाडे येथे दुर्मिळ चौसिंगा हरिणाची बंदुकीने गोळ्या घालून शिकार करण्यात आली. अखेर रक्ताळलेल्या हातांनी हरिणाच्या मांसाची वाटणी करणाऱ्या चौघांना राजगड तालुका वन विभागाने अटक केली. या घटनेमुळे पानशेत सिंहगड भागात खळबळ उडाली आहे ऐन नविन वर्षाच्या तोंडावर पर्यटकांची वर्दळ असलेल्या या परिसरात शिकारीचा प्रकार घडल्याने वन विभाग अलर्ट झाले आहे.

राजगड वन विभागाचे वन रक्षक राजेंद्र निबोंरे हे जंगलात गस्तीवर असताना काल रविवारी (२८) रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. समीर वसंत पिलाणे (वय ३६ ) , गणेश बबनराव लोहकरे (३८) दोघे राहणार रा.ओसाडे , नवनाथ चंद्रकांत पवळे ( वय ४०, रा. सोनापुर, ता. हवेली) व पांडुरंग दत्तात्रय कदम (वय ४७, रा. निगडे मोसे,ता. राजगड) अशी अटक करण्यात आलेल्या शिकणाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणी राजगड तालुका वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे तपास करत आहेत. वन्यजीव अधिनियम कायद्यानुसार चौघा शिकाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरिणाच्या मांसासह सापडले शिकारी

समीर पिलाणे, नवनाथ पावले, गणेश लोहकरे व पांडुरंग कदम यांनी सरकारी वनक्षेत्रा शेजारच्या खाजगी मालकी जंगलात चौसिंगा हरिणाला बंदुकीने गोळ्या घालून ठार मारले. वनरक्षक राजेंद्र निबोंरे यांच्या जागृतेमुळे आरोपी शिकार केलेल्या हरिणाच्या मांसासह सापडले. त्यांच्याकडून बंदुकीसह इतर हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.

वन्यप्राण्यांची शिकार केल्या प्रकरणी वन्यजीव अधिनियम १९७२ च्या कलमाखाली वन्यप्राण्यांची निघृण शिकार करणाऱ्यास ७ वर्ष कारावास व २५ हजार रुपये दंड अशा शिक्षेची तरतूद आहे असं राजगडचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे म्हणाले. हा गुन्हा अजामीनपात्र असुन दखलपात्र आहे. वन्यप्राण्यांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी शिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे त्यासाठी वन विभागाची पथके, गुप्तहेर सज्ज केले आहेत असंही त्यांनी सांगितलं.

शिकारीची माहिती मिळताच पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते व सहाय्यक वनसंरक्षक शितल राठोड, यांच्या देखरेखीखाली राजगडचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे वनपरिमंडळ अधिकारी स्मिता अर्जुन, दया डोमे, वैशाली हाडवळे, मंजुषा घुगे, वनरक्षक राजेंद्र निंभोरे, वनरक्षक ए. आर. सोनकांबळे, वनरक्षक एस. एन. कांबळे, वनरक्षक वाय. बी. टिकोळे, वनरक्षक सुनिल होलगिर, वनरक्षक निखील रासकर, वनरक्षक एस. के. भैलुमे, वनरक्षक बी. एल. जगताप, वनरक्षक स्वप्निल उंबरकर, वनरक्षक अर्चना कोरके, वनरक्षक अमोल गायकवाड, वनरक्षक संतोष रणसिंग, वनरक्षक विकास निकम यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली . रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी सखोल तपास सुरू होता.

यापूर्वी या आणि इतर शिकणाऱ्यांनी कोणत्या कोणत्या जंगलात, खाजगी रानात वन्यजीवांची शिकार केली आहे का? इतर शिकारी आहेत का? बंदुकीला परवाना आहे का? आदी बाबींचा सखोल तपास वन विभागाची पथके करत आहेत.

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.