Toyota Fortuner, ग्रेट खलीवर पडली भारी! एसयुव्ही नाही झाली टस की मस

| Updated on: Jan 19, 2024 | 2:20 PM

Toyota Fortuner | World Heavyweight Champion द ग्रेट खलीने इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो टोयोटा फॉर्च्युनर एसयुव्ही उचलण्याचा प्रयत्न करताना दिसतो. पण या जागतिक पहेलवानाला टोयोटाच्या फॉर्च्युनरने आस्मान दाखवले. खली ही आलिशान कार उचलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा काय होते तुम्ही पण पाहा.

Toyota Fortuner, ग्रेट खलीवर पडली भारी! एसयुव्ही नाही झाली टस की मस
Follow us on

नवी दिल्ली | 19 जानेवारी 2024 : द ग्रेट खली…दलीप सिंह राणा हे नाव रेसलिंगच्या जगात गाजलेले आहे. जगाने त्यांना रिंगमध्ये लढताना पाहिले आहे. द ग्रेट खली या नावाचे गारुड जगभरातील चाहत्यावर अजूनही आहे. आता खली इन्स्टाग्रामवर अनेक मजेशीर व्हिडिओ पोस्ट करुन लोकांचे मनोरंजन करतात. त्यांनी नुकताच एक व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर अपलोड केला आहे. टोयोटा फॉर्च्युनर ही कार उचलतानाच हा व्हिडिओ गजब आहे. या व्हिडिओवरील कमेंट्स वाचून तुम्हाला पण हसू आवरणार नाही.

टोयोटा फॉर्च्युनर उचलण्याची कसोटी

हे सुद्धा वाचा

द ग्रेट खली या व्हिडिओत टोयोटा फॉर्च्युनर उचलण्याचा प्रयत्न करताना दिसतात. तिथ उपस्थित अनेक जण खलीला प्रोत्साहन पण देतात. त्यामुळे खली ही कार समोरुन सहज उचलेल असा विश्वास वाटतो. खली कार उचलण्याचा प्रयत्न करतो. पण त्याला अपयश येते. त्याला टोयोटा फॉर्च्युनर काही उचलता येत नाही. रेसलिंगच्या रिंगमध्ये मोठ-मोठ्या रेसलरा रिंगच्या बाहेर फेकणारा खली, फॉर्च्युनरचा पुढील भाग मात्र उचलू शकत नाही.


पॉवरफुल एसयुव्ही

टोयोटा फॉर्च्युनर ही पॉवरफुल एसयुव्ही आहे. या कारचे वजन जवळपास 2200 किलोग्रॅम आहे. तर ग्रेट खलीचे वजन जवळपास 150 किलोग्रॅम आहे. टोयोटा फॉर्च्युनर ही फुलसाईज एसयुव्ही सेंगमेंटमधील सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. प्रत्येक महिन्याला हजारो लोक ही दमदार कार खरेदी करतात. या एसयुव्हीत 2.7 लिटर पेट्रोल इंजिन आणि 2.8 लिटर टर्बो डिझेल इंजिन आहे. ते क्रमशः 66 पीएस पॉवर आणि 245 एनएम टॉर्कपासून ते 204 पीएसची कमाल पॉवर आणि 500 न्यूटन मीटर पिक टॉर्क जेनरेट करते. ही एसयुव्ही 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड मॅन्युअल वा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायसह येते.

कसे आहे डिझेल मॉडेल

टोयोटा फॉर्च्युनरचे डिझेल व्हेरिएंट्सला 4-व्हील ड्राईव्ह (4WD) आहे. या कारमध्ये 8 इंचची इन्फोटेनमेंट सिस्टिम, अँड्रॉईड ऑटो आणि एप्पल कार प्ले सपोर्ट, कनेक्टेड कार फीचर्स, वायरलेस चार्जर, 6 स्पीकरसह साऊंड सिस्टिम, ड्युएल झोन ऑटोमॅटीक एसी, क्रुज कंट्रोलस 7 एयरबॅग्स, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल असिस्टसह अनेक फीचर्स आहेत.