AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

17 मिनिटांचा बलात्काराचा सीन, प्रदर्शित होताच चित्रपट वादात सापडला, घातली बंदी, 2 वर्षानंतर प्रदर्शित होताच…

17 मिनिटांचा बलात्काराचा सीन, 1994 चा हा चित्रपट प्रदर्शित होताच वादात सापडलेला. या चित्रपटातील अभिनेत्रीने स्वतः चित्रपटावर बंदीची केली होती मागणी. दिला होता आत्महत्या करण्याचा इशारा.

17 मिनिटांचा बलात्काराचा सीन, प्रदर्शित होताच चित्रपट वादात सापडला, घातली बंदी, 2 वर्षानंतर प्रदर्शित होताच...
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 12, 2026 | 4:08 PM
Share

Bandit Queen : बॉलिवूडमध्ये अनेक असे चित्रपट आहेत ज्यांना आजही प्रेक्षकांकडून प्रचंड पसंती मिळते. काही चित्रपट तर कल्ट क्लासिक म्हणून ओळखले जातात. अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘बैंडिट क्वीन’. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मोठ्या वादात सापडला होता आणि काही दिवसांतच त्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र नंतर पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारही पटकावले.

‘बँडिट क्वीन’ हा चित्रपट कुख्यात डाकू फूलन देवी यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात सीमा बिस्वास यांनी फूलन देवींची भूमिका साकारली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कुलभूषण कपूर यांनी केले होते. हा चित्रपट सप्टेंबर 1994 मध्ये प्रदर्शित झाला. मात्र चित्रपटातील नग्न सीन आणि हिंसाचाराचे प्रमाण जास्त असल्यामुळे काही दिवसांतच त्यावर बंदी घालण्यात आली.

फूलन देवींचाही चित्रपटाला विरोध

चित्रपटाविरोधात स्वतः फूलन देवी यांनीही आक्षेप घेतला होता. त्यांच्या मते या चित्रपटामुळे त्यांच्या खासगी आयुष्याचे उल्लंघन झाले होते. त्यांनी असा इशाराही दिला होता की, जर चित्रपटावर बंदी घातली नाही तर त्या चित्रपटगृहाबाहेर आत्महत्या करतील. नंतर निर्माते आणि चॅनेल 4 यांच्यासोबत समझोता झाल्यानंतर त्यांनी बंदीची मागणी मागे घेतली.

1994 मध्ये बंदी घातल्यानंतर हा चित्रपट 1996 मध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. CBFC ने काही सीनवर कात्री चालवत ‘A’ प्रमाणपत्रासह चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची परवानगी दिली. सुमारे 17 मिनिटांच्या बलात्काराच्या सीनमध्ये बदल करण्यात आला.

नंतर हा चित्रपट राष्ट्रीय स्तरावर गाजला. सीमा बिस्वास यांना या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर निर्मात्यांना आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

महिलांसाठी खास शो

IMDb च्या माहितीनुसार, चंदन थिएटर येथे या चित्रपटाचे महिलांसाठी खास शो आयोजित करण्यात आला होता. चित्रपटातील काही धक्कादायक सीनमुळे अनेक महिलांना पुरुषांसोबत चित्रपट पाहणे अस्वस्थ वाटत असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. वाद, बंदी आणि टीकेनंतरही ‘बँडिट क्वीन’ हा चित्रपट आजही भारतीय चित्रपटसृष्टीतील एक धाडसी आणि प्रभावी चित्रपट म्हणून ओळखला जातो.

Follow Us
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत