24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहरात पुन्हा एकदा मंदिर चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील चांदीचा मुकुट चोरट्यांनी पुन्हा लंपास केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी चोरीला गेलेला हाच मुकुट पोलिसांनी शोधून काढला होता
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहरात पुन्हा एकदा मंदिर चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील चांदीचा मुकुट चोरट्यांनी पुन्हा लंपास केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी चोरीला गेलेला हाच मुकुट पोलिसांनी शोधून काढला होता आणि 12 जून रोजी पुन्हा देवीला परिधान करण्यात आला होता. मात्र अवघ्या 24 तासांतच चोरट्यांनी पुन्हा मंदिरावर डल्ला मारला.
23 मे रोजी मंदिरातील चांदीचा मुकुट चोरीला गेला होता. तळेगाव दाभाडे पोलिसांनी CCTV च्या मदतीने आरोपींचा शोध घेत मुकुट हस्तगत केला होता. पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या उपस्थितीत काल हा मुकुट पुन्हा देवीला परिधान करण्यात आला. त्यानंतर रात्री चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करत मुकुटासह दानपेटीतील रोख रक्कमही चोरून नेली.
ही संपूर्ण घटना मंदिरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त होत असून मंदिर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Published on: Jun 13, 2026 06:04 PM
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...

