AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाह सत्तेत नसतील तेव्हा च***… संजय राऊतांचा आक्रमक इशारा, म्हणाले अंडरवर्ल्ड डॉन…

धारावीतील सामाजिक संस्थांवर मध्यरात्री चालवल्या जाणाऱ्या बुलडोझरवरून आणि वाढत्या दहशतीवरून संजय राऊत यांनी गौतम अदानी आणि सरकारवर तीव्र हल्लाबोल केला आहे.

अमित शाह सत्तेत नसतील तेव्हा च***... संजय राऊतांचा आक्रमक इशारा, म्हणाले अंडरवर्ल्ड डॉन...
amit shah sanjay raut
| Updated on: Jun 14, 2026 | 11:06 AM
Share

मुंबईतील धारावीमध्ये सध्या सुरू असलेल्या तोडक कारवाईवरून आणि तिथल्या वाढत्या तणावावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह राज्य सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “धारावीत सध्या अत्याचार सुरू असून मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान रचले जात आहे,” असा घणाघात त्यांनी केला. कार्यकर्त्यांनी मेहनतीने उभारलेल्या सामाजिक संस्था, व्यायामशाळा आणि मैदानांवर मध्यरात्री गुंडांच्या मदतीने बुलडोझर चालवला जात असल्याचा दावा संजय राऊतांनी केला.

संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यामांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना धारावीच्या मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी संजय राऊत म्हणाले, “धारावीत अत्याचार सुरु आहे. त्याविरुद्ध आम्ही लढा देत आहोत. परवा रात्री एका नगसेवक आले त्यांची व्यायामशाळा तोडली. काहीही कारण नव्हत आता तर शाळा आणि मैदानही ताब्यात घ्यायचे आहे. या सर्व संस्था प्रॉफीट मेकिंग संस्था नाहीत. त्या आमचे काही नगरसेवक स्वखर्चातून चालवतात. अशा पद्धतीने धारावीत हाहाकार माजला आहे. हा अत्यंत गंभीर विषय आहे. मराठी माणसाच्या काळजात कट्यार खुपसणारा हा विषय आहे. उद्धव ठाकरे आणि आम्ही सर्व धारावी यासाठी वाचावायला सांगत आहोत. रात्री अपरात्री तुम्ही सामाजिक संस्थांवर बुलडोजर चालवता, म्हाडा, पोलीस काय करायला तयार नाही. आम्ही काही केलं नाही असं म्हणतात, मग हे कोण करतंय.”

“गौतम अदानींनी गुंडांच्या फौजा वाढवल्यात का?”

धारावी ताब्यात घेण्यासाठी यांनी गौतम अदानींनी गुंडाच्या फौजा वाढवल्यात का की अंडरवर्ल्ड डॉनला सुपाऱ्या दिल्यात. या सर्व गुंडांची नावे माझ्याकडे आली आहेत. मी पोलिसांना त्या देणार आहे. आता मी उद्धव ठाकरेंशीही बोलन. खासदारांशीही आज बोलणार आहे. ज्या संस्था कार्यकर्त्यांनी अत्यंत मेहनतीने उभ्या केल्या त्यावर तुम्ही मध्यरात्री गुंडांसोबत बुलडोजर चालवतात. सरकार आणि कायदा सुव्यवस्था कुठे आहे. मोदी फ्रान्सला गेलेत. आता अदानी तिथे एखादी डील करायला जातील. तुम्ही हे सर्व घ्या. पण गरीबांची धारावी का गिळताय. मराठी माणसांच्या संस्थांवर का बुलडोजर चालवतात, हा प्रश्न देवेंद्र फडणवीस आणि नगरसेवक यांनी अदानीला प्रश्न विचारा हा तुझा मराठी माणसाला उदध्वस्त करण्याचे जे कारस्थान सुरु आहे हे कोणासाठी सुरु आहे,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

उद्या विमानतळावर जाणार

धारावीतील स्थानिक उद्योजकांचा उल्लेख करत ते म्हणाले, “धारावीतील अनेक उद्योजक यांच्या संरक्षणासाठी त्यांनी हा लढा उभारलेला आहे. ते तिथे शिवसेनेचे नेतृत्व करतात. गौतम अदानींनी गुंडांच्या टोळ्या पोसल्या आहेत का, गौतम अदानी हे स्वत:ला उद्योगपती समजतात, मग त्यांनी त्यासारखं राहावं. त्यांनी गुंडांच्या टोळीच्या प्रमुखासारखे वागू नये. उद्या २ वाजता विमानतळावर जाणार आहोत. ज्या पद्धतीने विमानतळ ताब्यात घेऊन गुंडांच्या ताब्यात दिलंय, गोल्ड स्मलिंग होतेय. त्यासाठी आम्ही जात आहोत.”

धारावीत गुंडांच्या मदतीने मराठी माणसांच्या जागा रिकामी करण्याची जोर जबरदस्ती सुरु केली आहे. धारावीत गुंडांच्या मदतीने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. हे गुंड कुठून आणले, त्यांना कोण पोसतंय तर त्यांनी त्यांचं उत्तर द्याव. जर अदानींची कंपनी या लेव्हलला आली असेल तर मग सरळ टक्कर होईल, असे संजय राऊत म्हणाले.

भाजपच्या मराठी नगरसेवकांना आणि मनसेला आवाहन

भाजपचे जे नगरसेवक निवडून आलेत यात जे कोणी मराठी आई-बापाचे असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी धारावीत जाऊन राहावं, असे संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर आणि मनसेवर निशाणा साधला.

अमित शाह नसले तर घरातून बाहेर पडणं मुश्किल होईल

शेवटी अत्यंत आक्रमक भाषेत इशारा देत राऊत म्हणाले, “आमदार खासदारांची बैठक बोलावायची नाही का, यांना कोण घाबरतंय. ज्या दिवशी अमित शहा सत्तेत नसतील त्यादिवशी यांच्या चड्ड्या खाली येतील. अमित शाह नसले तर यांना घरातून बाहेर पडणं मुश्किल होईल. हे पोलीस आणि पैशाच्या ताकदीवर लढू पाहतात, हिंमत असेल तर अदानीसमोर उभे राहा. जो मराठी माणसावर बुलडोझर फिरवतोय. हिंमत आहे का, आमची हिंमत आहे कारण आम्ही खरे टायगर आहोत.”

Follow Us
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...