Hatchback vs Compact व्हू इज द बेस्ट… जाणून घ्या दोघांचे फायदे अन्‌ तोटे

| Updated on: May 26, 2022 | 8:44 AM

एसयुव्ही कारच्या तुलनेत हॅचबॅक कारला कमी किमतीत खरेदी करता येते. एकंदरीत हॅचबॅक कारच्या तुलनेतमध्ये एसयुव्ही कारच्या किमती जास्त असतात.

Hatchback vs Compact व्हू इज द बेस्ट... जाणून घ्या दोघांचे फायदे अन्‌ तोटे
Hatchback vs Compact
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : भारतीय ऑटोमोबाईल बाजारात गाड्यांसाठी विविध पर्याय खुले आहेत. प्रत्येक व्यक्ती त्याच्या आवडी-निवडीनुसार विविध सेगमेंटमधील कारची खरेदी करीत असतो. असे दोन बॉडी स्टाईलमध्ये नेहमीच काट्याची टक्कर होत असते. हॅचबॅक (Hatchback) आणि कॉम्पॅक्ट (Compact) एसयुव्हीमध्ये नेहमी स्पर्धा दिसून येत असते. हे दोन्हीही प्रकाराच्या कार्स 10 लाखांहून कमी किमतीत उपलब्ध आहेत. या सेगमेंटमध्ये टाटा पंच (Tata Punch) ही सर्वाधिक स्वस्त कार आहे. दुसरीकडे हॅचबॅकचा विचार केल्यास मारुतीपासून ते ह्युंडाईपर्यंत विविध पर्यायाच्या कार मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. परंतु अनेक ग्राहकांना कार खरेदी करीत असताना हॅचबॅक घ्यावी की, कॉम्पॅक्ट एसयुव्ही? असा प्रश्‍न पडत असतो. यासाठी आम्ही आज या लेखातून दोन्ही कारमधील फायदे व तोटे तुम्हाला सांगणार आहोत.

चांगला रोड व्ह्यू

हायवे आणि शहरांमधील रस्त्यांवर चांगला अनुभव पाहिजे असेल तर, जास्त उंचीच्या कार चांगल्या असतात. आणि एसयुव्ही कार हॅचबॅक किंवा सेडन कारच्या तुलनेत उंच असता. त्यामुळे एसयुव्ही कार्स याबाबत जास्त उपयोगी ठरु शकतात. जास्त उंचावरुन चांगला ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स मिळू शकतो.

जास्त सामानासाठी उपयोगी

हॅचबॅक कारच्या तुलनेत एसयुव्ही कारमध्ये जास्त सामान बसू शकतो. एसयुव्ही कारमध्ये जास्त उंची असल्याने मागील सिटला फोल्ड करुन त्यावर जास्त सामान वाहून नेता येतो. फोल्ड बाईसिकलदेखील घेउन नेणे सोपे असते.

हे सुद्धा वाचा

किमतीत फरक

एसयुव्ही कारच्या तुलनेत हॅचबॅक कारला कमी किमतीत खरेदी करता येते. एकंदरीत हॅचबॅक कारच्या तुलनेतमध्ये एसयुव्ही कारच्या किमती जास्त असतात. कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमध्ये सर्वाधिक स्वस्त कार टाटा पंच आहे. तिची एक्सशोरुम किंमत 6 लाख रुपये आहे. तर दुसरीकडे हॅचबॅक कारची सुरुवातीची एक्सशोरुम किंमत ही 4 लाखांपासून सुरु होते.

रनिंग कॉस्ट

हॅचबॅक कारमध्ये एसयुव्ही कारच्या तुलनेत लहान इंजिन असते. व त्यामुळे लहान इंजिन असल्याने त्यातून मायलेजदेखील अधिक मिळत असतो. परंतु अशा कार्समध्ये पॉवर कमी असते. तर दुसरीकडे एसयुव्ही कारमध्ये जास्त मोठे इंजिन आणि पॉवरदेखील जास्त असते. त्यामुळे अशा कार मायलेजदेखील कमी देत असता. त्यामुळे हॅचबॅक गाड्यांची रनिंग कॉस्ट कमी असते.

स्पोर्टी लूक

तुम्हाला जर स्पोर्टी लूक असलेली कार खरेदी करायची असेल तर तुम्ही एसयुव्ही पर्यायासोबत जायला हवे. हॅचबॅक गाड्यांना ग्राउंड क्लिअरन्स कमी असल्याने त्या सहजपणे वळवता येणे शक्य असते. तर दुसरीकडे एसयुव्ही मात्र ग्राउंड क्लिअरन्स जास्त असल्याने त्यांना सहज वळवता येत नाही. अनेकदा त्या पलटी होण्याचा धोकाही जास्त असतो.