जबरदस्त सेफ्टी, Hyundai ची नवीन कार लॉन्च, फीचर्स पाहून ग्राहकांची खरेदीसाठी उडाली झुंबड

दिवाळीमध्ये कार घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. Creta आणि Venue कारला टक्कर देण्यासाठी Hyundai ने लॉन्च केली नवीन कार. किंमत देखील खूपच कमी. बुकिंगसाठी उडाली झुंबड.

| Updated on: Oct 26, 2026 | 3:20 PM
1 / 5
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कार खरेदी करणाऱ्यांसाठी एक नवी SUV बाजारात येण्याची चर्चा आहे. Hyundai Bayon ही नवीन SUV आज, 26 ऑक्टोबर रोजी अधिकृतपणे लॉन्च होणार असल्याचे वृत्त आहे. आकाराने Creta पेक्षा छोटी आणि Venue पेक्षा मोठी असलेल्या या कारला ‘बेबी क्रेटा’ असे म्हटले जात आहे.

2 / 5

Hyundai Bayon चे बुकिंग अधिकृत वेबसाइट आणि डीलरशिपच्या माध्यमातून 11,000 मध्ये सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. या SUV ची संभाव्य एक्स-शोरूम किंमत 8.5 लाख ते 15 लाखांदरम्यान असू शकते.

3 / 5

या कारमध्ये Creta मधील 1.5-लिटर, चार-सिलिंडर पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. हे इंजिन 115 hp पॉवर आणि 144 Nm टॉर्क निर्माण करते. तिची लांबी 4 मीटरपेक्षा थोडी जास्त असण्याचा अंदाज आहे.

4 / 5

Bayon च्या केबिनमध्ये 12.3-इंचाच्या दोन स्क्रीन मिळू शकतात. यातील एक स्क्रीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी, तर दुसरी इन्फोटेन्मेंटसाठी असेल. तसेच, Generative AI आधारित व्हॉइस असिस्टंट आणि Bluelink कनेक्टेड कार तंत्रज्ञान मिळण्याची शक्यता आहे.

5 / 5

उच्च व्हेरिएंटमध्ये लेव्हल-2 ADAS (Advanced Driver Assistance System) मिळण्याची अपेक्षा आहे. यामध्ये 23 हून अधिक सुरक्षा फीचर्स आणि 12 रडार सेन्सर्स असू शकतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us