25 हजार सॅलरीवर तुम्ही Royal Enfield Hunter 350 विकत घेऊ शकता का? जाणून घ्या EMI चा हिशोब

रॉयल एनफिल्ड हंटर 350 बाइकच्या स्टायलिश लूकमुळे युवकांमध्ये या बाइकची खास क्रेझ आहे. जर, तुम्ही Royal Enfield Hunter 350 बाइक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी सॅलरी आणि हप्त्याच गणित कसं बसवायचं जाणून घ्या.

25 हजार सॅलरीवर तुम्ही Royal Enfield Hunter 350 विकत घेऊ शकता का? जाणून घ्या EMI चा हिशोब
royal enfield hunter 350
| Updated on: Sep 04, 2025 | 8:44 AM

रॉयल एनफिल्ड बाइक्सना भारतीय बाजारपेठेत खूप पसंत केलं जातं. कंपनीकडून बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या रॉयल एनफिल्ड बाइक्सची विक्री केली जाते. यात हंटर 350 मॉडल युवकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. रॉयल एनफिल्ड हंटर 350 बाइकच्या स्टायलिश लूकमुळे युवकांमध्ये या बाइकची खास क्रेझ आहे. जर, तुम्ही Royal Enfield Hunter 350 बाइक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी तुमची किती सॅलरी आहे? किती सॅलरी असताना तुम्ही ही स्टायलिश बाइक खरेदी करु शकता ते गणित जाणून घ्या.

रॉयल एनफिल्ड हंटर 350 ची एक्स-शोरूम किंमत 1,49,900 रुपयापासून सुरु होते. ही बाइक विकत घेण्यासाठी एकाचवेळी पूर्ण पेमेंट करण्याची आवश्यकता नाहीय. ही बाइक तुम्ही लोनवर सुद्धा खरेदी करु शकता. रॉयल एनफिल्ड हंटर 350 च्या बेस मॉडल रेट्रो फॅक्ट्रीची दिल्लीत ऑन-रोड किंमत 1.73 लाख रुपये आहे. ही बाइक विकत घेण्यासाठी तुम्हाला 1.64 लाख रुपयापर्यंत लोन मिळू शकतं. हंटर 350 ची चावी हातात पडण्याआधी तुम्हाला 8,646 रुपये डाउन पेमेंटमध्ये भरावे लागतील.

जर, तुम्ही रॉयल एनफिल्डची बाइक विकत घेण्यासाठी दोन वर्षांपासाठी लोन घेत असाल, तर बँक या लोनवर 9 टक्के व्याज आकारेल. तुम्हाला 24 महिन्यापर्यंत म्हणजे दोन वर्ष 8,100 रुपये EMI भरावा लागेल.

दर महिन्याला किती EMI भरावा लागेल?

हंटर 350 विकत घेण्यासाठी तुम्ही तीन वर्षांसाठी कर्ज काढलं तर तुम्हाला 9 टक्के व्याजाने 36 महिने 5,800 रुपयांचा हफ्ता बँकेत जमा करावा लागेल. रॉयल एनफिल्डची ही बाइक विकत घेण्यासाठी तुम्ही जर चार वर्षांसाठी कर्ज काढलं, तर 9 टक्के व्याजाने बँकेत तुम्हाला 4,700 रुपयाचा हफ्ता भरावा लागेल. अशामध्ये तुमची सॅलरी जर 25 हजार रुपये आहे, तर सर्व खर्च भागवून तुम्ही रॉयल एनफिल्ड हंटर 350 खरेदी करण्याचा विचार करु शकता.

Royal Enfield Hunter चा मायलेज किती?

रॉयल एनफिल्ड हंटर 350 मध्ये 349 cc, सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक इंजिन लावण्यात आलं आहे. मोटरसायकल लावण्यात आलेल्या इंजिनमधून 20.2 bhp पावर मिळते. त्यातून 27 Nm टॉर्क जनरेट होतो. सोबतच 5-स्पीड गियरबॉक्स, 13 लीटरचा फ्यूल टँक आणि 36.2 kmpl चा मायलेज मिळतो.