AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकदा चार्ज केल्यावर 220 KM धावणार, Komaki DT3000 इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात

भारतात इलेक्ट्रिक वेहिकल सेगमेंटमध्ये दुचाकींची (Electric Two Wheeler) मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ही मागणी पाहता अनेक वाहन कंपन्या आपली नवनवीन उत्पादने बाजारात आणत आहेत.

एकदा चार्ज केल्यावर 220 KM धावणार, Komaki DT3000 इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात
Komaki Electric Scooter (प्रातिनिधिक फोटो)Image Credit source: komaki.in
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Apr 02, 2022 | 5:27 PM
Share

मुंबई : भारतात इलेक्ट्रिक वेहिकल सेगमेंटमध्ये दुचाकींची (Electric Two Wheeler) मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ही मागणी पाहता अनेक वाहन कंपन्या आपली नवनवीन उत्पादने बाजारात आणत आहेत. अशा परिस्थितीत ऑटो कंपनी कोमाकीने (Komaki) नुकतीच स्वतःची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर (Komaki Electric Scooter) सादर केली आहे. कोमाकीने सादर केलेल्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरचं नाव कोमाकी डीटी 3000 (Komaki DT 3000) असं ठेवण्यात आलं आहे. भारतात या स्कूटरची किंमत 1,15,000 रुपयांपासून सुरू होते. नवीन स्कूटर बाजारात सध्याच्या स्पर्धकांना जोरदार टक्कर देईल आणि ग्राहकांची पसंती मिळवेल असा कंपनीला विश्वास आहे. दरम्यान, Komaki DT3000 ई-स्कूटर आजपासून देशातील सर्व Komaki डीलरशिपवर उपलब्ध झाली आहे.

Komaki कंपनीने या वर्षी आतापर्यंत लेटेस्ट DT3000 सह एकूण तीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च केल्या आहेत. यापूर्वी कंपनीच्या दुचाकी रेंजर आणि व्हेनिस इलेक्ट्रिक स्कूटर खूप लोकप्रिय झाल्या आहेत. या नवीन Komaki DT3000 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये दोन मोटर्स देण्यात आल्या आहेत. 3000 वॅट BLDC मोटर तसेच 72 V52 AH बॅटरी देण्यात आली आहे. ही स्कूटरदेखील रेंजर आणि व्हेनिसप्रमाणे लोकप्रिय होईल, असा कंपनीचा विश्वास आहे.

सिंगल चार्जवर 180-220 किलोमीटर रेंज

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, DT 3000 इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जवर 180-220 किमीची रेंज देते. तसेच या ई-स्कूटरचा टॉप स्पीड 90KMPH इतका असल्याचा कंपनीचा दावा आहे. DT 3000 इलेक्ट्रिक स्कूटरच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास कोमाकीने अद्याप या स्कूटरचा एकही फोटो जारी केलेला नाही. यासाठी इच्छुक ग्राहक त्यांच्या जवळच्या  कोमाकी डीलरशिपला भेट देऊ शकतात. स्कूटर लवकरच ऑनलाइन सादर केली जाईल.

कोमाकी इलेक्ट्रिक डिव्हिजनचे संचालक गुंजन मल्होत्रा ​​म्हणाले, “अनेक विंटेज कोमाकी मॉडेल्ससह आमच्या विविध उत्पादनांनी भारतीय ग्राहकांची मने जिंकली आहेत. आता आम्ही DT3000 ही हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन आलो आहोत. मल्होत्रा म्हणाले, इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमध्ये ही स्कूटर युनिक आहे, कारण त्यात 3000W BLDC मोटर आणि 72V52Ah पेटंट लिथियम बॅटरी आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 12 पेक्षा जास्त खास फीचर्स आहेत.

इतर बातम्या

कार चालकांसाठी महत्त्वाची बातमी, नितीन गडकरींनी जारी केलेले नियम लागू होणार

भारतात 1 एप्रिलपासून सर्व BMW कार महागणार, पाहा किती होणार दरवाढ

नवीन कलर थीम आणि स्पोर्टी लूकसह 2022 Yamaha YZF-R3 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Follow Us
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल