भारतात 1 एप्रिलपासून सर्व BMW कार महागणार, पाहा किती होणार दरवाढ

BMW इंडियाने अलीकडेच जाहीर केले आहे की ते 1 एप्रिलपासून देशात उपलब्ध असलेल्या सर्व मॉडेल्सच्या किंमती वाढवणार आहेत. BMW मॉडेल्सच्या किमती 3.5 टक्क्यांपर्यंत वाढतील. BMW इंडियाने म्हटलं आहे की, वाढती मटेरियल कॉस्ट आणि लॉजिस्टिकवरीव वाढता खर्च, जागतिक तणाव आणि विनिमय दरातील बदल यामुळे आम्हाला किंमती वाढवाव्या लागत आहेत.

Mar 28, 2022 | 11:52 AM
अक्षय चोरगे

|

1 / 5
BMW सध्या 2 सिरीज ग्रॅन कूप, 3 सिरीज, 3 सिरीज ग्रॅन लिमोसिन, M340i, 5 सिरीज, 6 सिरीज ग्रॅन टुरिस्मो, 7 सिरीज, X1, X3, X4, X5, X7 आणि मिनी कंट्रीमन यांसारखे अनेक लोकल मेड मॉडल ऑफर करते.

2 / 5
जर्मन लक्झरी कार निर्माता, BMW ने 1 एप्रिल 2022 पासून भारतातील BMW मॉडेल रेंजमध्ये 3.5% पर्यंत किंमत वाढीची घोषणा केली आहे. BMW कंपनी आता ऑडी आणि मर्सिडीज-बेंझच्या यादीत सामील झाली आहे, कारण या कंपन्यांनी याआधीच त्यांच्या कारच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे.

3 / 5
बीएमडब्ल्यू इंडियाने गेल्या 12 महिन्यांत केलेली ही तिसरी दरवाढ आहे. यापूर्वी, कंपनीने एप्रिल आणि ऑक्टोबर 2021 मध्ये निवडक मॉडेल्सचे दर वाढवले ​​होते. BMW ही जर्मन बेस्ट लक्झरी कार उत्पादक कंपनी आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या कंपनीने भारतीय बाजारात लक्झरी कार सेगमेंटमध्ये आपलं स्थान बळकट केलं आहे.

4 / 5
BMW इंडिया ही जर्मनीत मुख्यालय असलेल्या BMW समूहाची 100% उपकंपनी आहे. 2021 मध्ये, कंपनीने देशात एकूण 8,876 युनिट्सची विक्री केली, जी वार्षिक 34 टक्के वाढ दर्शवते. गेल्या वर्षी कोरोनामुळे विक्रीवर मोठा परिणाम झाला होता.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें