आता आमच्यावर एक जरी हल्ला केला तर…, इराणची अमेरिकेला हादरवणारी धमकी, जगभरात मोठी खळबळ, युद्ध पुन्हा पेटणार
गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरूच आहे. दरम्यान त्यानंतर आता इराणने अमेरिकेला थेट मोठी धमकी दिली आहे. त्यामुळे आता युद्ध आणखी पेटण्याची शक्यता असून, संपूर्ण जगाचं लक्ष मध्यपूर्वेकडे लागलं आहे.

अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर भीषण हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्धाला सुरुवात झाली. या युद्धामध्ये आतापर्यंत इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. अमेरिकेकडून इराणच्या पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे इराणने देखील ज्या -ज्या आखाती देशांमध्ये अमेरिकेचे सैन्यतळं आहेत, त्या -त्या देशांवर भीषण हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये या आखाती देशांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा इराणकडून अमेरिकेला मोठा इशारा देण्यात आला आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.
इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबफ यांनी अमेरिकेला मोठा इशारा दिला आहे. अमेरिका आणि इराणमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरूच आहे. अमेरिकेकडून वारंवार इराणला युद्ध आणि हल्ला करण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता इराणचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गाफिबफ यांनी अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. आमच्यावर हल्ला करण्याचा विचार देखील करू नका, जर तुम्ही आता आमच्यावर एक जरी हल्ला केला तर आम्ही थेट युद्धाच्या मैदानात उतरू, असा थेट इशाराच इराणच्या वतीने आता अमेरिकेला देण्यात आला आहे.
इराणची न्यूज एजेंसी मेहरने दिलेल्या माहितीनुसार रविवारी पार्लमेंटमध्ये बोलताना गाफिबफ यांनी अमेरिकेला आता उघड -उघड धमकी दिली आहे. तुम्ही आता आमच्यासोबत युद्ध करण्याचा विचारही डोक्यातून काढून टाका, जर तुम्ही आमच्यावर आता एक जरी हल्ला केला तर आम्ही थेट युद्धाच्या मैदानात उतरणार आम्ही लढाईचं मैदान ठरवू , आम्ही आमचं सर्वात शक्तिशाली सैन्यदल लढाईच्या मैदानात उतरू असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच जर अमेरिकेनं आमच्या सात अटी मान्य केल्या तरच युद्धविराम होऊ शकतो, असंही यावेळी इराने म्हटलं आहे. दरम्यान इराणच्या या धमकीमुळे आता पुन्हा एकदा युद्ध पेटण्याची शक्यता आहे.
