Mahindra Bolero: महिंद्राच्या बोलेरोकडून पुन्हा धोबीपछाड! सर्वांना मागे टाकत पुन्हा ठरली नंबर 1…

| Updated on: Jul 10, 2022 | 1:14 PM

Mahindra Bolero: गेल्या महिन्यात कंपनीने एकूण 26640 युनिटची विक्री केली आहे. महिंद्राने जून 2021 मध्ये एकूण 16636 युनिट्‌सची विक्री केली असून या माध्यमातून कंपनीने वाहन विक्रीत चांगली कामगिरी केली आहे. जून 2022 मध्ये महिंद्राने 60.13 टक्क्यांनी वाढ मिळवली आहे.

Mahindra Bolero: महिंद्राच्या बोलेरोकडून पुन्हा धोबीपछाड! सर्वांना मागे टाकत पुन्हा ठरली नंबर 1...
Mahindra Bolero
Image Credit source: Social Media
Follow us on

देशातील सर्वाधिक लोकप्रिय एसयुव्ही कार निर्माता कंपन्यांमधील एक असलेल्या महिंद्राच्या (Mahindra) जून 2022 मध्ये झालेल्या विक्रीचे आकडे समोर आले आहेत. रिपोर्ट्‌सनुसार, गेल्या महिन्यात कंपनीने एकूण 26640 युनिटची विक्री केली आहे. महिंद्राने जून 2021 मध्ये एकूण 16636 युनिट्‌सची विक्री केली असून या माध्यमातून कंपनीने वाहन विक्रीत चांगली कामगिरी केली आहे. जून 2022 मध्ये महिंद्राने 60.13 टक्क्यांनी वाढ मिळवली आहे. महिंद्राच्या या चांगल्या परफॉर्मेंसचा (Performance) मान बोलेरोला जातो. जून 2022 मध्ये महिंद्रा बोलेरोची (Mahindra Bolero) सर्वात जास्त विक्री झालेली आहे. या शिवाय एक्सयुव्ही 700, एक्सयुव्ही 300, स्कॉर्पियो आणि थार आदी गाड्यांनीही चांगली कामगिरी केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये महिंद्राच्या या टॉप-5 कारची कामगिरी कशी राहिली त्यावर या लेखाच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.

1) महिंद्रा बोलेरो

बोलेरो जून 2022 मध्ये महिंद्राची सर्वाधिक विक्री होणारी गाडी ठरली आहे. गेल्या महिन्यात याच्या एकूण 7884 युनिटची विक्री झाली आहे. तर दुसरीकडे जून 2021 मध्ये एकूण 5744 युनिटची विक्री झालेली आहे. या दरम्यान, बोलेरोने 37.26 टक्के ग्रोथ मिळवली आहे. महिंद्राच्या एकूण विक्रीमध्ये बोलेरोचे एकूण 29.59 टक़्के शेअर्स आहेत.

2) महिंद्रा एक्सयुव्ही 700

महिंद्रा एक्सयुव्ही 700 देशातील सर्वाधिक विक्री होणार एसयुव्हीमधील एक आहे. गेल्या महिन्यात महिंद्राने एक्सयुव्ही 700 ची 6022 युनिटची विक्री केली आहे. कंपनीने एकूण विक्रीमध्ये एक्सयुव्ही 700 चा शेअर 22.61 टक्के इतका आहे. मे 2022 च्या तुलनेत जून 2022 मध्ये एक्सयुव्ही 700 चा ग्रोथ रेट 19 टक़्क्यांपेक्षा जास्त राहिला आहे.

हे सुद्धा वाचा

3) महिंद्रा एक्सयुव्ही 300

जून 2022 मध्ये महिंद्रा एक्सयुव्ही 300 च्या एकूण 4754 युनिटची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी जूनच्या तुलनेत या वेळी 139 युनिटची जास्त विक्री झाली आहे. जून 2021 मध्ये एकूण 4615 युनिटची विक्री झाली होती. एक्सयुव्ही 300 च्या विक्रीमध्ये 3.01 टक्के वाढ झालेली आहे. कंपनी लवकरच एक्सयुव्ही 300 चे नवीन व्हेरिएंट आणणार आहे.

4) महिंद्रा स्कॉर्पियो

स्कॉर्पियोचे नवीन मॉडेल स्कॉर्पियो एन दाखल झाल्यानंतरही जुन्या स्कॉर्पियोच्या विक्रीमध्ये फारसा काही बदल झाला नाही. गेल्या महिन्यात एकूण 4131 युनिट्‌ची विक्री झाली होती. तर गेल्या वर्षी जूनमध्ये एकूण 4160 युनिट्‌सची विक्री नोंदवली गेली आहे. या गाडीच्या विक्रीमध्ये 0.70 टक्क्यांची मामुली घट झाली आहे.

5) महिंद्रा थार

महिंद्रा थारने या यादीमध्ये पाचवा क्रमांक मिळवला आहे. थार 241.78 टक्क्यांच्या ग्रोथ रेटसह सर्वात पुढे आहे. जून 2022 मध्ये थारची एकूण 3640 युनिटची विक्री झाली होती. तर मागील वर्षी जून 2021 मध्ये हाच आकडा 1065 युनिट्‌वर होता. कंपनीने यंदा 2575 युनिट जास्तीची विक्री नोंदवली आहे.