अल्टो आणि वॅरनआरपेक्षाही जास्त मायलेज देते ही कार, किती आहे किंमत?

या मॉडेल्समध्ये फॅक्टरी फिटेड सीएनजी (Maruti CNG car) चा पर्याय देत आहे. वॅगनआर, अल्टो आणि एर्टिगा ही काही सर्वाधिक विक्री होणारी सीएनजी मॉडेल्स आहेत. पण, सर्वात मायलेज कार्यक्षम सीएनजी कारबद्दल बोलायचे तर..

अल्टो आणि वॅरनआरपेक्षाही जास्त मायलेज देते ही कार, किती आहे किंमत?
मारूती कार
Image Credit source: Social Media
| Updated on: Jul 02, 2023 | 8:32 PM

मुंबई : मारुती सुझुकीकडे CNG कारचा भारतातील सर्वात मोठा पोर्टफोलिओ आहे ज्यामध्ये हॅचबॅकQA1~, सेडान आणि MPV सारख्या विविध मॉडेल्सचा समावेश आहे. कंपनी मारुती अल्टो ते वॅगनआर आणि स्विफ्ट ते मारुती ग्रँड विटारा या मॉडेल्समध्ये फॅक्टरी फिटेड सीएनजी (Maruti CNG car) चा पर्याय देत आहे. वॅगनआर, अल्टो आणि एर्टिगा ही काही सर्वाधिक विक्री होणारी सीएनजी मॉडेल्स आहेत. पण, सर्वात मायलेज कार्यक्षम सीएनजी कारबद्दल बोलायचे तर, मारुती सुझुकीची सेलेरियो त्यात आघाडीवर आहे. यानंतर अल्टो आणि वॅगन आर. त्यामुळे, जर तुम्ही सीएनजी कार घेण्याचा विचार करत असाल तर सेलेरियो हा एक उत्तम पर्याय असू शकतो जो तुम्हाला अधिक मायलेज आणि कमी खर्चात गाडी चालवण्याची सोय देतो.

Celerio Wagon R, Alto, S-Presso च्या CNG आवृत्त्यांचे मायलेज

मारुती सुझुकीच्या सीएनजी आवृत्ती असलेल्या कार म्हणजे सेलेरियो, वॅगन आर, अल्टो, एस-प्रेसो. यापैकी मारुती सेलेरियो सीएनजीचे मायलेज वॅगन आर, अल्टो, एस-प्रेसोपेक्षा जास्त आहे. मारुती सेलेरियोची सीएनजी आवृत्ती गेल्या वर्षीच्या सुरुवातीला लाँच करण्यात आली होती आणि सीएनजीचे 35.60 kmpl मायलेज देते. मारुती WagonR CNG चे मायलेज 32.52km आहे, मारुती Alto CNG चे मायलेज 31.59km आहे, Maruti Suzuki S-Presso CNG चे मायलेज 31.2km आहे. अशाप्रकारे, मारुती सुझुकीची सेलेरियो सीएनजी कार इतर सीएनजी कारपेक्षा जास्त मायलेज देते, ज्यामुळे ग्राहकांसाठी ती एक उत्तम पर्याय बनू शकते.

सेलेरियोची किंमत

मारुती सुझुकी सेलेरियोची भारतातील किंमत सध्या पेट्रोल आवृत्तीसाठी रु.5.37 लाखांपासून सुरू होते. Celerio च्या CNG आवृत्तीची किंमत 6.74 लाख रुपये आहे. याशिवाय सेलेरियोच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 7.14 लाख रुपये आहे. यासह, Celerio पेट्रोल देखील खूप इंधन कार्यक्षम आहे जे 24.97 km/l ते 26.68 km/l मायलेज देते.