AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मारुतीची सर्वात आधुनिक Maruti e-Vitara दाखल, किंमत किती ? MG Windsor EV खेळ खल्लास होणार ?

देशात सर्वाधिक कार बनवणारी कंपनी मारुती सुझुकीने तिच्या पहिल्या इलेक्ट्रीक कारचे लाँचिंग आज अखेर केले आहे. ही कार मारुतीची e-Vitara असून ही इलेक्ट्रीक कार शानदार रेंज आणि दमदार फिचर्सह बाजारात उतरली आहे.

मारुतीची सर्वात आधुनिक Maruti e-Vitara दाखल, किंमत किती ?  MG Windsor EV खेळ खल्लास होणार ?
Maruti e-Vitara
| Updated on: Feb 17, 2026 | 9:49 PM
Share

भारतात अचानक इलेक्ट्रीक कारची मागणी वाढली आहे. मारुती सुझुकीने आता तिची नवी इलेक्ट्रीक SUV e VITARA ला लाँच केले आहे. या कारची सुरुवातीची किंमत 10.99 लाख रुपये ( इंट्रोडक्टरी BaaS किंमत  ) ठेवली आहे. या कार सोबत बॅटरी साठी स्वतंत्र 3.99  रुपये प्रति किमीच्या हिशेबाने ईएमआय द्यावा लागणार आहे. कंपनीने या मॉडेलला भारतात इलेक्ट्री मोबिलिटी प्रवासाच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हटले आहे.  e VITARA एक बॅटरी इलेक्ट्रिक व्हेईकल ( BEV ) असून संपूर्णपणे वीजेवर धावणारी आहे.

काय आहे BaaS मॉडेल?

BaaS (बॅटरी-एज-ए-सर्विस) मॉडेलमध्ये ग्राहकांना बॅटरीची किंमत एक साथ भरावी लागणार नाही. कारची किंमत वेगळी होती. बॅटरीसाठी प्रत्येक किलोमीटर हिशेबाने पैसे भरावे लागणार आहे. यामुळे सुरुवातीचा खर्च कमी होतो आणि कार खरेदी करणे सोपे जाते. e-Vitara कारला पहिल्यांदा Bharat Mobility Auto Expo 2025 प्रदर्शनात सादर करण्यात आले होते. मारुती या कारला भारतात बनवून 200 हून जास्त देशांत निर्यात करणार आहे. एवढेच नव्हे तर मारुती कंपनीने या कारची अनेक बाजारात लाँच केलेले आहे. भारतात लोक या कारच्या किंमतीची वाट पाहात आहेत.

बुकिंग आणि टेस्ट ड्राईव्ह

ग्राहक e VITARA संदर्भात माहिती घेण्यासाठी तसेच कारची टेस्ट ड्राईव्ह आणि बुकींग करण्यासाठी NEXA शोरूमला भेट देऊ शकतात. याशिवाय NEXA च्या वेबसाईटवर देखील बुकींगची सुविधा उपलब्ध आहेत. बुकींगसाठी सुरुवातीची किंमत 21,000 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या नुसार या इलेक्ट्रीक सुव्हसोबत सोपे ओनरशिप मॉडेल, विश्वासार्ह चार्जिंग सिस्टीम आणि दीर्घ वॉरंटी सारखी सुविधा मिळेल. काही ऑफर्स अंतर्गत होम चार्जर आणि इंस्टॉलेशनची सुविधा देखील दिली जाणार आहे. मात्र, BaaS किंमत रोड टॅक्स, विमा आणि अन्य सरकारी शुल्काचा समावेश नाही.

मॉडर्न डिझाईन आणि दमदार लुक

e-Vitara कारचे डिझाई क्लीन आणि मॉडर्न आहे. या कारची लांबी 4,275mm, रुंदी 1,800mm आणि उंची 1,640mm आहे. याचा व्हील बेस 2,700mm आहे. ही एक कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये येते. आणि याच्या आत खूप जागा आहे. भारतीय बाजारात या इलेक्ट्रीकच्या सुव्हला हुंडई क्रेट ईव्ही, टाटा कर्व्ह आणि एमजी विंडसर ईव्ही सोबत स्पर्धा आहे. विंडसर ईव्ही लाँचिंगनंतर भारताची बेस्ट सेलिंग इलेक्ट्रीक कार बनली आहे. याचमुळे BaaS मॉडेल अंतर्गत ही कार ग्राहकांना अधिक पसंद पडली आहे. आता ईव्ही-व्हीटारा आल्याने विंडसर ईव्हीसाठी मोठी तगडी स्पर्धा होणार आहे.

इंटेरिअर डिझाईन

e-Vitara आतून आधी पेक्षा जास्त प्रीमियम आणि तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे. आतापर्यंत ही मारुतीची सर्वात प्रीमियम मारुती सुझुकी कार मानली जात आहे. डॅशबोर्डमध्ये 10.25 – इंचाचा संपूर्ण डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर आणि 10.1 – इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे. यात सॉफ्ट-टच मटेरियल, दोन कलरवाले इंटेरिअर आणि मल्टी कलर एंबिएच लायटिंग देण्यात आली आहे. पुढच्या सीट वेंटिलेटेड आहेत. ड्रायव्हरचे आसन दहा पद्धतीने इलेक्ट्रीक एडजस्ट होऊ शकते. पाठच्या सीट 40:20:40 स्प्लिट मध्ये आहेत. ज्यास पाठी झुकवणे, पुढे मागे सरकवणे आणि फोल्ड केले जाऊ शकते. यात फिक्स्ड ग्लास सनरुफ आणि Harmanचा ट्युन केलेला ऑडिओ सिस्टीम देखील देण्यात आला आहे, त्यामुळे ही कार आणखीनच प्रिमीयम दिसते.

बॅटरी आणि मोटर

या SUV मध्ये हलका 3-in-1 इलेक्ट्रिक ड्राईव सिस्टीम दिला आहे.ज्यात मोटर, इन्वर्टर आणि ट्रान्समिशन एकाच यूनिटमध्ये लावले आहेत. यामुळे गाडी हलकी रहाते आणि परफॉर्मेन्स आणि रेंज चांगली देते. मारुतीने यास दोन बॅटरी पर्यायात सादर केले आहे. पहिले 49kWh बॅटरीचे मॉडेलमध्ये पुढे एक मोटर असेल, जी 144hp पॉवर आणि 189Nm टॉर्क देते. ही शहर आणि हायवे दोन्हीसाठी संतुलित पर्याय आहे. 61kWh मोठी बॅटरीवाले मॉडेल 174bhp पॉवर देईल ( फ्रंट-व्हील ड्राईव्ह )  परदेशात याचे ऑल-व्हील ड्राईव्ह व्हर्जन देखील मिळते, ज्यात मागे 65bhpची अतिरिक्त मोटर आहे. याची एकूण पॉवर 184bhp आणि 300Nm टॉर्क होते. टॉप व्हेरिएंटची रेंज 543km हून जास्त सांगितली जात आहे. त्यामुळे ही तिच्या सेगमेंटची सर्वात दीर्घ रेंजवाली ईव्हीपैकी एक आहे.

सुरक्षेसाठी काय ?

e-Vitara मध्ये सेफ्टीवर खास लक्ष देण्यात आले आहे.याच्या बॉडीत 50% हून जास्त हाई-टेंसाईल स्टीलचा वापर केला आहे.आणि बॅटरीसाठी स्वतंत्र सुरक्षा सिस्टीम देण्यात आला आहे. स्टँडर्ड फिचर्समध्ये 7 एअरबॅग,चार चाकांमध्ये डिस्क ब्रेक, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम आणि e-Call इर्मजन्सी फिचरचा समावेश आहे. यात लेव्हल -2 ADAS फिचर्स देखील देण्यात आले आहे. ( उदा. एडाप्टिव क्रूझ कंट्रोल, लेन किपिंग असिस्ट आणि ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टीम.)  ही कंपनीची सर्वात एडव्हान्स आणि सुरक्षित कारपैकी एक मानली जात आहे.

Follow Us
मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
लक्ष्मण हाकेंची मागणी: २ सप्टेंबरचा शासन निर्णय तातडीने रद्द करा
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा: मागण्या पूर्ण न झाल्यास राजकीय नेत्यांना भेटणार नाही
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
New Sugar Stock Norms : साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
Vijay Wadettiwar: काय शिजतंय ते आम्ही बघतोय, पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
पुणे रेल्वे स्थानकावर 2 तरुणांना टीसीने पकडलं, मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू
Sambhajinagar : चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू , 3 दिवसानंतर शेरुची सुटका
चाकण MIDCच्या विकासासाठी शिंदेंची बैठक,ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
चाकण एमआयडीसीच्या विकासासाठी शिंदे-सामंत यांची बैठक, ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
संभाजीनगर: खोट्या अफवा थांबवा,कुणालच्या मावशीची समाजमाध्यमांना विनंती
मृत कुणालच्या मावशीचा कळकळीचा संदेश: सोशल मीडियावर कुटुंबीयांविषयी चुकीची माहिती पसरवू नका
राहुल गांधींचा पुण्यातील कार्यक्रम ‘स्क्रिप्टेड पेड’;दरेकरांची टीक
राहुल गांधींचा पुणे दौरा स्क्रिप्टेड, पेड; प्रवीण दरेकरांची काँग्रेसवर टीका
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा:सुळेंचं लांडगेंना थेट आव्हान
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान