आता टॉप मॉडेलमध्ये मिळणार ह्युंदाईची ‘ही’ लोकप्रिय सीएनजी कार… जबरदस्त फीचर्ससह होणार लाँच

| Updated on: Jun 10, 2022 | 12:57 PM

भारतीय कार निर्माता कंपनी ह्युंदाई इंडिया (Hyundai India) लवकरच बाजारात आपली लोकप्रिय सीएनजी कारच्या टॉप मॉडेलचे (Top model) लाँचिंग करणार आहे. एका रिपोर्टनुसार, कंपनी सेडन सेगमेंटची ओरा सीएनजीचे (Aura CNG) टॉप व्हेरिएंट मार्केटमध्ये उतरवणार आहे. कंपनी या नवीन व्हेरिएंटला सीएनजी आणि पेट्रोल इंजिनसह लाँच करण्याच्या तयारीमध्ये आहे. या नवीन कारच्या फीचर्समध्ये S 1.2 CNG च्या […]

आता टॉप मॉडेलमध्ये मिळणार ह्युंदाईची ‘ही’ लोकप्रिय सीएनजी कार... जबरदस्त फीचर्ससह होणार लाँच
Follow us on

भारतीय कार निर्माता कंपनी ह्युंदाई इंडिया (Hyundai India) लवकरच बाजारात आपली लोकप्रिय सीएनजी कारच्या टॉप मॉडेलचे (Top model) लाँचिंग करणार आहे. एका रिपोर्टनुसार, कंपनी सेडन सेगमेंटची ओरा सीएनजीचे (Aura CNG) टॉप व्हेरिएंट मार्केटमध्ये उतरवणार आहे. कंपनी या नवीन व्हेरिएंटला सीएनजी आणि पेट्रोल इंजिनसह लाँच करण्याच्या तयारीमध्ये आहे. या नवीन कारच्या फीचर्समध्ये S 1.2 CNG च्या तुलनेत फार जास्त बदल करण्यात आलेले नाहीत. परंतु कंपनीने या वेळी एक नवीन मॉडेलमध्ये अधिक चांगले इंफोटेनमेंट सिस्टम देण्याचे प्रयत्न चालविले आहेत. याशिवाय यात अलॉय व्हील्समध्येही बदल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, एका दाव्यानुसार, ओराची एसएक्स 1.2 सीएनजी व्हेरिएंटमध्ये अँड्रॉइड ओटो आणि ॲप्पल कार प्लेसह 8 इंचाचा टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देण्यात आला आहे. यासह यात ग्राहकांना 15 इंचाचे डायमंड कटचे अलॉय व्हील्सदेखील उपलब्ध होणार आहे. कंपनीने याला सीएनजीसाठी खासकरुन ट्रिम केले आहे. कंपनीने यात 1.2 लीटरचे पेट्रोल आणि सीएनजी इंजिनचा वापर केला आहे. ओरा एसएक्स 1.2 सीएनजी पर्याय हे टॉप व्हेरिएंट असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ओरा एसएक्स सीएनजीमध्ये 1.2 लीटरचे बाई फ्यूल पेट्रोल मोटरचा देखील समावेश असणार आहे. ही प्रणाली सीएनजी मूडसाठी चांगली ठरणार आहे. यात आपल्याला 37 लीटर पेट्रोल आणि जवळपास 10 किग्रा सीएनजीची फ्यूअल स्पेस मिळणार आहे. ही सीएनजी मोडवर 69 पीएस पॉवर आणि 95 एनएम टॉर्क जनरेट करेल. जर पेट्रोल स्टडर्डबाबत बोलायचे झाल्यास, हे जास्तीत जास्त 83PS किंवा 114 NM टॉर्क जनरेट करण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

नवीन अलॉय व्हीलसह उपलब्ध होईल कार

ओराच्या एसएक्स व्हेरिएंटची तुलना जर S 1.2 CNG सोबत केली तर यात आपल्याला सीएनजीची बँगिग आणि 15 इंचाचे डायमंड कट अलॉय व्हील मिळणार आहेत. कंपनीने येणार्या मॉडेलमध्ये अजून काही खास बदल केलेले नाहीत. याच्या फीचर्समध्ये आपल्याला रियर पार्किंग कॅमेरा, शार्क फिन एंटीना, क्रोम प्लेटेड डोर हँडल, इलेक्ट्रिक OVRM सह इंटेग्रेटेड टर्न इंडिक्रेटर्सशिवाय अजून बरेच फीचर्स मिळणार आहेत.