Ola कडून हायपरचार्जर इन्स्टॉल करण्यास सुरुवात, ग्राहकांसाठी मोफत फास्ट चार्जिंग सुविधा

| Updated on: Dec 29, 2021 | 11:48 AM

ओला इलेक्ट्रिकने यावर्षी आपल्या दोन स्कूटर ओला एस 1 आणि ओला एस 1 प्रो लाँच केल्या आहेत आणि आता कंपनी हायपर चार्जर देखील इंस्टॉल करणार आहे. यामुळे स्कूटर केवळ फास्ट चार्ज होणार नाही तर काही काळासाठी ही सेवा मोफत उपलब्ध होणार आहे.

1 / 5
ओला इलेक्ट्रिकने यावर्षी आपल्या दोन स्कूटर ओला एस 1 आणि ओला एस 1 प्रो लाँच केल्या आहेत आणि आता कंपनी हायपर चार्जर देखील इंस्टॉल करणार आहे. यामुळे स्कूटर केवळ फास्ट चार्ज होणार नाही तर काही काळासाठी ही सेवा मोफत उपलब्ध होणार आहे. ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी माहिती दिली आहे की, कंपनी आगामी काळात चार्जिंग इंस्फ्रास्ट्रक्चरचा विस्तार करणार आहे.

2 / 5
मायक्रोब्लॉगिंग साइट Twitter वर सीईओने घोषणा केली आहे की, ओला इलेक्ट्रिकचे 4000 पेक्षा जास्त चार्जिंग पॉइंट्स स्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे, जे संपूर्ण भारतामध्ये दिसतील. हायपर चार्जर सध्या बीपीसीएलच्या पेट्रोल पंपावर बसवले जात आहे. त्यासोबतच निवासी संकुलातही हायपरचार्जर बसवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

3 / 5
ऑक्टोबरमध्ये, ओला इलेक्ट्रिकने त्यांच्या पहिल्या हायपरचार्जची घोषणा केली होती. त्यावेळी कंपनीने म्हटले की, ते आपल्या ग्राहकांना हायपर चार्जिंग सपोर्ट देतील. जे एक लाखाहून अधिक ठिकाणी बसवले जातील, ज्यामुळे स्कूटरला अनेक फीचर्स मिळतील. पुढील वर्षी जूनपर्यंत या सुविधेचा लाभ युजर्सना मोफत मिळणार आहे.

4 / 5
ओला इलेक्ट्रिकच्या हायपर चार्जरच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, ते अधिक चांगली चार्जिंग क्षमता देते. मिळालेल्या माहितीनुसार, 0-50 टक्के बॅटरी फक्त 18 मिनिटांत चार्ज होते, ज्याच्या मदतीने ही स्कूटर 75 किमीची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते. होम चार्जिंग युनिट स्टँडर्ड चार्जिंगसह येते, जे प्रत्येक स्कूटरसोबत येईल.

5 / 5
कंपनीने आपल्या वेबसाइटवर शहरनिहाय चार्जिंग नेटवर्क नमूद केले आहेत आणि अनेक ठिकाणी लोकेशनही सांगितले आहे. बहुतेक चार्जिंग स्टेशन टियर 1- आणि टियर 2 मध्ये आहेत.