Royal Enfield : निम्म्यापेक्षा कमी किमतीत रॉयल एनफिल्ड मिळविण्याची संधी… जाणून घ्या संपूर्ण माहिती

| Updated on: Apr 29, 2022 | 1:28 PM

रॉयल एनफिल्डची क्लासिक 350 ही सेकंड हँड दुचाकी तुम्ही निम्म्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करु शकणार आहात. या लेखात या संपूर्ण दुचाकीची वैशिष्ट्ये आणि डीलबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

Royal Enfield : निम्म्यापेक्षा कमी किमतीत रॉयल एनफिल्ड मिळविण्याची संधी... जाणून घ्या संपूर्ण माहिती
रॉयल एनफिल्ड
Image Credit source: tv9
Follow us on

Royal Enfield : आपल्याकडे एकतरी रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) असावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. दमदार इंजीन, आकर्षक लूक, धडकी भरवणारा आवाज आदी विविध कारणांमुळे रॉयल एनफिल्ड खासकरुन तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. तरुणांसाठी हा एक स्टाईल आयकॉनचा (Style icons) विषय बनला आहे. परंतु रॉयल एनफिल्डच्या किंमती पाहून हे वाहन खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न हे स्वप्नच राहून जात असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला परवडेल अशा दरात रॉयल एनफिल्डची एक डील (Deal) घेउन आलो आहे. यासोबत रॉयल एनफिल्डच्या विविध वैशिष्ट्यांबाबतही या लेखात चर्चा करणार आहोत.

युएसबी चार्जिंग पोर्ट

रॉयल एनफिल्डमध्ये 349 सीसीचे इंजीन देण्यात आले आहे. बाइकवाले वेबसाइटच्या माहितीनुसार, एक लीटर पेट्रोलमध्ये ही दुचाकी 35 किलोमीटरपर्यंत रेंज मिळवू शकते. यात पाच स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन देण्यात आलेले आहेत. सोबत 13 लीटसची टाकी, 195 किेलोचे वजन, 805 एमएमचे सीट आदी उपलब्ध आहे. दरम्यान, दुचाकीच्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये युएसबी चार्जिंग पोर्टदेखील देण्यात आलेले आहे.

ड्युअल चॅनल एबीएस

2021 च्या मोडेलमध्ये ड्युअल कार्डले फ्रेमचा वापर करण्यात आला आहे. यात 41 एमएमचे टेलीस्कोपिक फोर्क देण्यात आले असून यात ॲडजेस्टेबल ट्वीन शॉक ऑब्जर्बर आहे. दोन्ही व्हील्समध्ये डिस्क ब्रेक देण्यात आले आहे. साबतच त्यात ड्युअल चॅनल एबीएसही समाविष्ट आहेत.

हे सुद्धा वाचा

काय आहे डील?

दरम्यान, एका डीलनुसार, ही दुचाकी तुम्ही 87 हजार रुपयांमध्ये ओएलएक्सवर खरेदी करु शकणार आहात. ओएलएक्सवर ही दुचाकी लिस्टेड आहे. दुचाकीचे हे 2013 चे मॉडेल आहे. आतापर्यंत ती 45000 किमी चालली आहे. ही दुचाकी दिल्लीमध्ये रजिस्टर झालेली असून तिचा रंग काळा आहे. ही एक फर्स्ट ऑनर दुचाकी आहे.

दरम्यार, दुचाकी खरेदी करताना ती प्रत्यक्ष पाहून घ्यावी, त्याच प्रमाणे संपूर्ण कागदपत्रांची तपासणी करावी. गाडीची परिस्थिती पाहण्यासाठी सोबत मॅकॅनिकलाही घेउन जावे, सर्व पडताळणी झाल्यावरच डील करणे फायद्याचे ठरते.