रॉयल एनफिल्ड शोरूममधील चोरीचा छडा, सराईत चोरट्याला अखेर बेड्या

पोलिसांनी ही एक मोठी कामगिरी केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे (Ulhasnagar Police arrest thief who robbed Royal Enfield Bike Showroom).

रॉयल एनफिल्ड शोरूममधील चोरीचा छडा, सराईत चोरट्याला अखेर बेड्या
बदलापूर रॉयल एन्फिल्ड शोरुममधील चोरी सीसीटीव्हीत कैद झाली होती


उल्हासनग (ठाणे) : मागील काही दिवसांपासून अंबरनाथसह उल्हासनगर, बदलापूर आणि परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल चोरट्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्याने काही दिवसांपूर्वीच बदलापूरच्या रॉयल एनफिल्ड दुकानात आपणच चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी ही एक मोठी कामगिरी केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे (Ulhasnagar Police arrest thief who robbed Royal Enfield Bike Showroom).

पोलिसांनी कारवाई कशी केली?

राहुल टाक असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याने मागच्या महिन्यात मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक रिक्षा चोरली होती. हीच चोरीची रिक्षा घेऊन राहुल हा अंबरनाथच्या दिशेने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी साईबाबा मंदिराजवळ सापळा रचून त्याला अटक केली (Ulhasnagar Police arrest thief who robbed Royal Enfield Bike Showroom).

बदलापूरच्या रॉयल एनफिल्ड शोरूममध्ये चोरी

बदलापूरच्या कात्रप परिसरातील हायवेवर रॉयल एनफिल्ड ही दुचाकींची शोरुम आहे. सोमवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास एक चोरटा या शोरुममध्ये शटर वाकवून घुसला. त्याने शोरुममधील तीन आयपॅड, एक मोबाईल, टीशर्ट आणि जॅकेट असा मुद्देमाल चोरुन नेला होता. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झाली होती. सकाळी ही घटना मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या लक्षात आली. दुकानाचे वाकलेले शटर पाहून त्यांनी ही बाब पोलिसांना कळवली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली होती. अखेर राहुल टाक यानेच ही चोरी केली होती, असं कबूल केलं आहे.

आरोपीकडून 3 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

चौकशीदरम्यान राहुल याने दोन ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. बदलापुरात काही दिवसांपूर्वी रॉयल एनफिल्डच्या शोरूममध्ये चोरी झाली होती. ही चोरी आपणच केल्याची कबुली त्याने दिली. यानंतर त्याच्याकडून पोलिसांनी तीन टॅब, तीन लॅपटॉप, टी शर्ट, बॅग, चोरीची रिक्षा असा 3 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राहुल टाक हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही मध्यवर्ती, विठ्ठलवाडी आणि बदलापूर पोलीस ठाण्यात तब्बल 9 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

चोरीचा व्हिडीओ बघा :

कल्याण जीआरपीने मोबाईल चोरट्यांना पकडलं

दरम्यान, कल्याण जीआरपीने देखील आज दोन अट्टल मोबाईल चोरांना अटक केली आहे. हे चोर एक्सप्रेस गाडीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल चोरी करायचे. त्यांच्यापैकी एकाला पोलिसांनी अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने आपण आणखी एका सहकाऱ्यासोबत चोरी करत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या दुसऱ्या सहकाऱ्याला मुंब्र्यातून अटक केली.

संबंधित बातमी : रॉयल एनफिल्डच्या शोरुमचे शटर वाकवून आत शिरला, बदलापुरात धाडसी चोरी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI