AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाजारात येतेय नवी SUV, काय आहे नव्या SUVचे फिचर, कोणापेक्षा वरचड आहे नवी SUV?

टोयोटा आणि मारुती सुझुकी मिळून त्यांच्या एका मध्यम आकाराच्या SUVवर काम करत आहेत. ही एक पाच सीट असणारी SUV असणार आहे. असं बोललं जातंय की, आगामी काळा टोयोटा आणि मारुती सुझुकीची येणारी नवी SUV ही सध्या असलेल्या हुंडई क्रेटा, किआ सेल्टोस, वीडब्ल्यू ताइगुन, स्कोडा कुशाक, एमजी एस्टर सारख्या मोठ्या गाड्यांसोबत स्पर्धा करेल.

बाजारात येतेय नवी SUV, काय आहे नव्या SUVचे फिचर, कोणापेक्षा वरचड आहे नवी SUV?
SUVImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 17, 2022 | 1:01 PM
Share

मुंबई : कोणताही सण उत्सव आला की गाडी (CAR) घेणाऱ्यांची संख्या वाढू लागते. ग्राहकांना विशेष पर्यायही उपलब्ध करुन दिले जातात. आता यातच टोयोटा (Toyota) आणि मारुती सुझुकी (Maruti Suzuki) मिळून त्यांच्या एका मध्यम आकाराच्या SUVवर काम करत आहेत. ही एक पाच सीट असणारी SUV असणार आहे. असं बोललं जातंय की, आगामी काळा टोयोटा आणि मारुती सुझुकीची येणारी नवी SUV ही सध्या असलेल्या हुंडई क्रेटा, (Hyundai Creta) किआ सेल्टोस, वीडब्ल्यू ताइगुन, स्कोडा कुशाक, एमजी एस्टर सारख्या मोठ्या गाड्यांसोबत स्पर्धा करेल. आता असं असलं तरी टोयोटा आणि मारुती या दोन्ही कंपन्यांच्या एसयूव्हीला वेगवेगळे कोडनेम असणार आहे. मारुती सुझुकीचा कोडनेम YFG आहे. ते भारतातील सर्वात मोठ्या कार निर्मात्याच्या नव्याने लॉन्च केलेल्या लाइनअपचा एक भाग आहे. तर टोयोटा मध्यम आकाराच्या SUVला D22 असे कोडनेम आहे. पाच-सीटर एसयूव्हीची कोणतीही रिबॅज केलेली आवृत्ती नसेल. उत्पादन खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी कंपनीने दोन्ही SUV वेगवेगळ्या टॉप हॉटसह विकसित केल्या आहेत. हे विशेष. त्यामुळे आता येत्या काळात ग्राहकांना नव्या प्रकारच्या गाड्या पहायला आणि अनुभवायला मिळू शकतात.

लाँच होण्यापूर्वीच फोटो आला

गाडी घ्यायची म्हटलं की आधी त्या गाडीचा फोटो पाहिला जातोय. त्यानंतर त्याचे वैशिष्ठ्य पाहिले जातात. टोयोटा आणि मारुती सुझुकीच्या नव्या SUVच्या पहिला फोटो इंटरनेटवर आलाय. त्या या वर्षाच्या शेवटी लाँच केल्या जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. Toyota D22 चे डिझाईन अत्याधुनिक टोयोटा SUV प्रमाणेच असणार आहे. ज्यामध्ये सरळ समोर फॅसिआ आणि एक मजबूत बॉडी पॅनल देखील आहे.

नव्या SUVचे वैशिष्ट्य

नवी SUV येणार म्हणजे त्यामध्ये अनेक गोष्टी या नव्या असणारच. SUVच्या इतर व्हिज्युअल हायलाइट्समध्ये विस्तीर्ण एअर इनटेक, स्पोर्टी बंपर सेक्शन, स्क्वेअर-ऑफ व्हील आर्च, 17-इंच चाके आहेत. उंच खांब आणि रूफलाइन एक मोठे ग्रीनहाऊस मजबूत करेल, तर प्रशस्त कॅबिनही. दोन्ही SUV ला अधूनमधून ऑफ-रोड परिस्थितींसाठी उच्च ग्राउंड क्लीयरन्स असणार आहे. आता Toyota D22 आणि Maruti Suzuki YFG जागतिक बाजारपेठेत टोयोटाच्या DNGA आर्किटेक्चरच्या नवीन प्लॅटफॉर्मवर आधारित असणार आहे. हे दिवाळीच्या जवळपास लॉन्च होण्याची शक्यता आहे. आता प्रश्न येते की त्याची किंमत काय असणार. आता या गाड्यांची किंमत देखील इतर स्पर्धक कंपन्यांच्या गाड्यांप्रमाणेच असणार आहे. हे सहा-स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडले जाऊ शकते. इंटीरियरसाठी, ते उच्च दर्जाचे पृष्ठभाग साहित्य या गाड्यांमध्ये वापरले आहेत. फ्लोटिंग टचस्क्रीन, 360-डिग्री कॅमेरा, हेड्स-अप डिस्प्ले, मागील एसी व्हेंट्स, आधुनिक कनेक्टिव्हिटी, ड्रायव्हर-असिस्टंटसह सुसज्ज अशी ही कार लवकरच येणार आहे.

इतर बातम्या

नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं ढोल-ताशाच्या गजरात जंगी स्वागत

Gondia : वसंत ऋतू लागताच गोंदियात फुलला पिवळा पळस, पाहा मनमोहक फोटो!

Nashik | ‘अभिनव भारत’च्या श्रेयासाठी खासदार गोडसेंची केविलवाणी धडपड; आमदार फरांदेंकडून विधानसभेत भांडाफोड

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.