Tata Tiago 2026 : मध्यमवर्गीयांसाठी टाटाची स्वस्त कार लॉन्च, सेफ्टीमध्ये बेस्ट, पेट्रोल-CNG-EV एकत्र, किंमत सुद्धा परवडणारी

Tata Tiago 2026 : टाटा मोटर्सने मध्यमवर्गीय, सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेऊन एक खास कार लॉन्च केली आहे. या कारची किंमत परडवणारी असून अत्याधुनिक फिचर्ससह सेफ्टीमध्ये सुद्धा ही कार उत्तम आहे.

Tata Tiago 2026 :  मध्यमवर्गीयांसाठी टाटाची स्वस्त कार लॉन्च, सेफ्टीमध्ये बेस्ट, पेट्रोल-CNG-EV एकत्र, किंमत सुद्धा परवडणारी
2026 Tata Tiago
| Updated on: May 28, 2026 | 1:30 PM

टाटा मोटर्सने आपली सर्वात स्वस्त आणि छोटी कार Tiago चं नवीन मॉडल लॉन्च केलं आहे. कंपनी मागच्या काही दिवसांपासून Tiago 2026 शी संबंधित माहिती शेअर करत होती. पेट्रोल, सीएनजी आणि ईवी पावरट्रेन सोबत येणारी Tata Tiago सेगमेंटमधली पहिली कार आहे. जुन्या टियागोची किंमत 4.6 लाख रुपयापासून सुरु होते. कंपनीने नव्या कारची किंमत सुद्धा 5 लाखाच्या आत ठेवली आहे. टियागो कारला आधीपेक्षा जास्त सुरक्षित बनवण्यात आल्याचा दावा कंपनीने इवेंटमध्ये केला. त्याचा एक डेमो सुद्धा कंपनीने दिला. त्यात त्यांनी दाखवलं की, खऱ्या जगात जर टाटा टियागो कारचा अपघात झाला, तर काय होईल. कंपनीने डुअल इम्पॅक्ट अपघात दाखवला.

Tata Tiago 2026 ला कंपनीने 4.69 लाख रुपये किंमतीला लॉन्च केलं आहे. ही किंमत कारच्या बेस वेरिएंटची आहे. पेट्रोलच्या टॉप वेरिएंटची किंमत 7.29 लाख रुपये एक्स शोरुम आहे. टाटा टियागो सीएनजीची किंमत 5.79 लाख रुपये एक्स शोरुमने सुरु होते. ही किंमत 7.99 लाख रुपये एक्स शो रुमपर्यंत जाते. टाटा टियागो ईवी 2026 ची किंमत 6.99 लाख रुपयाने सुरु होते. टियागो ईवीला BaaS अंतर्गत सुद्धा तु्म्ही खरेदी करु शकता. बॅटरी एज सर्विस अंतर्गत टाटा टियागो ईवीची किंमत 4.69 लाख रुपयापासून सुरु होते.

त्यात अनेक बदल

नव्या टियागोला आधीपेक्षा जास्त चांगलं बनवण्यासाठी कंपनीने त्यात अनेक बदल केले आहेत. कारमध्ये 6 एअरबॅग स्टँडर्ड मिळतील. त्याशिवाय कारला सुरक्षित बनवण्यासाठी हाय स्ट्रेंथ मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. खराब रस्त्यावर सुद्धा ही कार सहजतेने पळेल अशा पद्धतीने ही कार डिझाईन करण्यात आली आहे.

अनेक सेफ्टी फिचर्स

कारमध्ये ब्लूटूथ कनेक्टिविटी असेल. ही कार डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टरसह येईल. कारच्या AMT वर्जनमध्ये पॅडल शिफ्ट आणि क्रूज कंट्रोल सारखे फिचर्स मिळतील. Tiago मध्ये अनेक सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे ड्रायव्हरला जास्त चांगला कॉन्फिडन्स येईल.

चार्ज करायला किती मिनिटं लागतील?

टाटा टियागो ईवीमध्ये कंपनीने अनेक बदल केले आहेत. डिजाइन आणि फिचर्ससह कंपनीने लोकांच्या मनात चालणारी रेंज एंजायटी सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या टियागो EV बॅटरीवर कंपनी लाइफटाइम वॉरंटी देत आहे. त्या शिवाय कारला फक्त 30 मिनिटात चार्ज करता येईल. ही कार मल्टीपल चार्जिंग ऑप्शनसह येते.

टाटा टियागोचा सामना कोणासोबत?

टियागो मध्ये 1.2 लीटरचं थ्री सिलेंडर इंजिन येतं. त्यातून 86 एचपी पावर जनरेट होते. सीएनजी मॉडलमध्ये ही कार 75.5 एचपी पावर देते. ही कार थ्री सिलेंडर मॅन्युअस गियर बॉक्स सोबत येते. या कारचा थेट सामना मारुती सुजुकी वॅगनआर, सेलेरियो आणि हुंडई आय 10 सोबत आहे.

Follow Us