TATA च्या EV ने सगळा खेळच पलटला..त्यांच्या या गाडीची विक्री 274 टक्क्याने वाढली

Electrick Car : भारतात इलेक्ट्रिक कारची बाजारपेठ वेगाने वाढत चालली आहे. देशात इलेक्ट्रिक कार्सची मागणी वाढत आहे. अनेक कारसची विक्री चार आकडी नंबर्समध्ये पोहोचली आहे. टाटा कंपनीच्या एका EV ने बाजी मारली आहे.

TATA च्या EV ने सगळा खेळच पलटला..त्यांच्या या गाडीची विक्री 274 टक्क्याने वाढली
tata punch ev
Image Credit source: Subaas Shrestha/NurPhoto via Getty Images
| Updated on: Nov 27, 2026 | 1:02 PM

भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत चालली आहे. ऑक्टोंबर महिन्यात या सेगमेंटने 75 टक्के ईयर-ऑन-ईयर ग्रोथ नोंदवला आहे. ऑटो पंडित्जनुसार या महिन्यात तमाम कंपन्यांनी एकूण 39,170 गाड्या विकल्या. यात सर्वात जास्त विक्री झालेलं मॉडल टाटा पंच ईवीचं आहे. ईवी देशातील पाचवी बेस्ट सेलिंग इलेक्ट्रिक कार आहे. भारताची ही पहिली इलेक्ट्रिक कार आहे. महिन्याला 5000 कारसच्या विक्रीचा आकडा या गाडीने पार केला आहे. ऑक्टोंबर महिना अनेक कारससाठी चांगला ठरला. अनेक कारसची विक्री चार आकडी नंबर्समध्ये पोहोचली आहे. टाटा पंच ईवी पुढे निघून गेली. पंच ईवी टाटाच्या पोर्टफोलियोमधील दुसरी सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. ऑक्टोंबर 2026 मध्ये या SUV च्या 5,060 यूनिट्सची विक्री झाली. मागच्यावर्षी ऑक्टोंबर 2025 मध्ये या कारच्या 1353 यूनिट्सची विक्री झालेली. टॉप सेलिंग कारच्या लिस्टमध्ये ही कार खूप खाली होती.

आता प्रश्न हा पडतो की, टाटाने असं काय केलं, ज्यामुळे ईयर-ऑन-ईयर ऑक्टोंबर महिन्यात पंच ईवीची विक्री 274 टक्क्याने वाढली. पंचची विक्री फक्त ऑक्टोंबर महिन्यात वाढलेली नाही. यावर्षी पंच फेसलिफ्ट लॉन्च झाल्यापासून ही वाढ पहायला मिळतेय. टाटा पंच ईवी किंमत 9.79 लाख रुपये एक्स शोरूमने सुरु होते. बीएएएस नुसार ही कार विकत घ्यायला गेल्यास कारची किंमत 6.59 लाख रुपयाने सुरु होते. त्या शिवाय बॅटरीसाठी 2.6 रुपये प्रति किलोमीटर चार्ज वेगळा द्यावा लागतो. या किंमतीला पंच एक चांगला पर्याय ठरते.

Loading...

टाटा पंच EV ची खासियत काय?

शहरात ड्रायव्हिंगसाठी ज्यांना ऑटोमेटिक कार हवी आहे, त्यांच्यासाठी हा चांगला ऑप्शन आहे. टाटा पंच ईवीच्या बेस मॉडलमध्ये सुद्धा तुम्हाला अनेक फिचर्स मिळतील. कार दोन बॅटरी ऑप्शन 30kW आणि 40kWh मध्ये येते. बेस वेरिएंट्स फीचर्स बद्दल बोलायचं झाल्यास कार मध्ये मल्टी-मोड रिजनरेटिव ब्रेकिंग, 2 ड्राइविंग मोड्स, 10.16 सेंटीमीटर इंस्ट्रूमेंट क्लस्टर, स्मार्टवॉच कनेक्टिविटी, हिल होल्ड असिस्ट, आय-हाय बीम अलर्ट, फ्रंट पावर विंडोज, इंडिकेटर्स सोबत येणारे ओआरवीएम्स, टीपीएमएस, रियर सीट मध्ये एडजस्टेबल हेडरेस्ट, 6 एयरबॅग, रियर पार्किंग सेंसर, ईएसपी, एबीएस-ईबीडी, इलेक्ट्रिक टेलगेट आणि दुसरे फीचर्स मिळतात. या सर्व फीचर्ससह ही कार एक चांगला पर्याय ठरते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us