AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! आणखी 54 खासदार देणार भाजपच्या डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा? पक्षांची नावं समोर

केंद्रातील भाजप सरकारने 30 नोव्हेंबर रोजी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. दरम्यान याच अधिवेशनात डिलिमिटेशन बिल देखील सादर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! आणखी 54 खासदार देणार भाजपच्या डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा? पक्षांची नावं समोर
आणखी 54 खासदार डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याची शक्यता Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 27, 2026 | 12:54 PM
Share

केंद्रातील भाजप सरकारने 30 नोव्हेंबर रोजी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. दरम्यान याच अधिवेशनात डिलिमिटेशन बिल देखील सादर होण्याची शक्यता आहे. डिलिमिटेशन बिल मंजूर करण्यासाठी भाजपला दोन तृतियांश मतांची गरज आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता खासदारांचा आकडा जुळविण्यास सुरुवात झाली आहे. भाजपला जर हे बिल मंजूर करायचं असेल तर एनडीएचे जेवढे खासदार आहेत, त्याव्यतिरिक्त देखील आणखी काही खासदारांची आवश्यकता आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आणखी तीन पक्ष जे एनडीएचे घटक पक्ष नाहीत ते या बिलाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचा मार्ग आता अधिक सोपा होण्याची चिन्हं आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी शरद पवार गट या बिलाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी संकेत दिले आहेत. जर डिलिमिटेशन बिल हे देशाच्या हिताचं असेल तर आम्ही पाठिंब्याबाबत विचार करू असं त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे सध्या आठ खासदार आहेत. दरम्यान दुसरीकडे वायएसआर काँग्रेस देखील डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. वायएसआर काँग्रेसने या आधी देखील भाजपला अनेकदा पाठिंबा दिला आहे. वायएसआर काँग्रेसकडे चार खासदार आहेत.

तामिळनाडूमधील मोठा पक्ष असलेला डीएमके जो की एनडीएचा घटक पक्ष नाही, परंतु डीएमके देखील या बिलाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. डीएमकेकडे 22 खासदार आहेत. जर सर्व राज्यांना 50 टक्के जागा मिळणार असतील तर आम्ही पाठिंब्याबाबत विचार करू असं स्टॅलिन यांनी म्हटलं आहे. तसेच प्रत्येक बाबतीमध्ये भाजपला विरोध करणं योग्य नसल्याचं देखील पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.

तर पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्यानंतर तृणमूलमध्ये मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं. तृणमूलच्या तब्बल 20 खासदारांनी बंडखोरी केली, त्यांनी वेगळा गट स्थापन करून नव्या पक्षात प्रवेश केला. हे सर्व खासदार देखील डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 8, डीएमकेचे 22, तृणमूलमधून बाहेर पडलेला खासदारांचा गट 20 आणि वायएसआर काँग्रेसचे 4 खासदार असे एकूण 54 खासदार आता या बिलाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचा मार्ग सोपा होण्याची शक्यता आहे.

Follow Us
माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे...
Supriya Sule : माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
रोहित पवार यांचं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे
Supriya Sule : रोहित पवार यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेश..
Uday Samant : Shivsena : ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेशाच्या चर्चांवरही दिलं उत्तर, म्हणाले...
सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर सहकार....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर भाजप प्रणित सहकार विकास पॅनलचा झेंडा
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय; अर्जुनसिंह मोहिते पाटील यांची बाजी
संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी..
NCP : संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी; नेमका काय आहे पक्षाचा निर्देश?
देशातील लोकशाहीच्या पाठीवर; सत्तेची सूत्रं दोन व्यापाऱ्यांच्या...
Sanjay Raut : देशातील लोकशाहीच्या पाठीवर...; सत्तेची सूत्रं दोन व्यापाऱ्यांच्या हातात, संजय राऊतांचा मोठा दावा
शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत....
Sanjay Raut :  शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत..; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट; प्रकृती स्थिर, डॉक्टरांचा....
Sharad Pawar Health Update : शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट; प्रकृती स्थिर, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला
डिलिमिटेशन विधेयकात महिला आरक्षणाचा मुद्दा दिशाभूल करणारा....
Natasha Awhad : डिलिमिटेशन विधेयकात महिला आरक्षणाचा मुद्दा दिशाभूल करणारा; नताशा आव्हाड असं का म्हणाल्या?