AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata Tiago की Maruti Celerio, कोणती कार फायद्याची ? किंमतीपासून मायलेजपर्यंत सर्व जाणा

जीएसटीच्या पुनर्रचनेनंतर सर्वच कारच्या किंमती कमी झालेल्या आहेत. हॅचबॅक कारमध्ये Tata Tiago आणि Maruti Celerio या दोन कार चांगला पर्याय आहेत. या कारच्या किंमती ते मायलेजची तुलना पाहूयात..

Tata Tiago की Maruti Celerio, कोणती कार फायद्याची ? किंमतीपासून मायलेजपर्यंत सर्व जाणा
Tata Tiago VS Maruti Celerio
| Updated on: Nov 03, 2025 | 5:46 PM
Share

जीएसटी कटनंतर भारतीय बाजारात हॅचबॅक कारच्या किंमती खूपच कमी झाल्या आहेत. जर तुम्हाला डेली अप-डाऊनसाठी हॅचबॅककारची गरज असेल तर तुमच्यासाठी Maruti Celerio आणि Tata Tiago हे दोन चांगले पर्याय आहेत. या दोन कारची तुलना करुन कोणती कार चांगली हे पाहूयात…

जीएसटी कट के बाद भारतीय बाजार में हैचबैक की कीमतें काफी कम हो गई हैं. अगर आप भी डेली अप-डाउन के लिए किसी किफायती हैचबैक की तलाश में हैं तो आपके लिए Maruti Celerio और Tata Tiago, दो अच्छे ऑप्शन्स साबित हो सकते हैं . आइए इन दोनों गाड़ियों की कीमत, फीचर्स, सेफ्टी और माइलेज के बारे में जानते हैं ताकि आप खुद डिसाइड कर सकें कि कौन-सी गाड़ी ज्यादा वैल्यू फॉर मनी है?

दोन्ही कारची किंमत काय ?

GST कट झाल्यानंतर Maruti Celerio ची सुरुवातीची एक्स -शोरुम किंमत 4.70 लाख रुपये झाली आहे. तर या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 7.05 लाख रुपये आहे. तर Tata Tiago ची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 4.57 लाख रुपये आहे. तर याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 8.75 लाख रुपये आहे.

टाटा टियागो आणि मारुती सेलेरियोचे मायलेज

Tata Tiago CNG चे मायलेज मॅन्युअल मोडमध्ये 26.49 km/kg आणि ऑटोमॅटीक मोडमध्ये 28 km/kg आहे. रिअल वर्ल्ड ड्रायविंगमध्ये ही सरासरी 24 – 25 km/kg मायलेज देते, जे शहरी ट्रॅफीकसाठी किफायतीशीर आहे. तर Maruti Celerio सीएनजीचा मायलेज 35.60 km/kg आहे. हा आकडा इंधन बचतीसाठी महत्वाचा आहे. इंधनाचे दर वाढलेले असताना डेली कम्युटर्ससाठी ही कार लाभदायक ठरु शकते.

गाडीचे फीचर्स आणि इंटेरिअर

Tiago CNG ही एक फिचर- पॅक्ड कार आहे. यात LED DRL सह प्रोजेक्टर डेडलॅम्प, 10.25 इंचाचा टच स्क्रीन इन्फोटेनमेंट, डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, आणि AMT ट्रान्समिशनचा पर्याय मिळतो. या शिवाय ट्वीन सिलींडर टेक्नॉलॉजीमुळे बुट स्पेस देखील अन्य सीएनजी कारहून अधिक आहे.

Celerio CNG कार देखील आधुनिक आहे. यात 7-इंच टचस्क्रीन, Apple CarPlay, Android Auto, पुश – बटन स्टार्ट, आणि पॉवर विंडो मिळतो.मात्र, यात AMT ऑप्शन नाही तसेच टीयागोसारखी बूट स्पेस आहे.

कोणती कार सेफ?

सेफ्टीच्या बाबतीत Tata Tiago CNG ला ग्लोबल NCAP ने 4-स्टार रेटींग दिलेली आहे. यात ड्युअल एअरबॅग, ABS, EBD, रिअर कॅमरा, CNG लीक डिटेक्शन सिस्टम आणि मायक्रो-स्विच सारखे आधुनिक फिचर्स आहेत. तर Maruti Celerio CNG आता 6 एअरबॅग्स सोबत येते. हा एक मोठा बदल आहे. परंतू या कारचा क्रॅश टेस्ट रेकॉर्ड इतका मजबूत नाही जेवढा टियागो कारचा आहे. यामुळे सुरक्षित ड्रायव्हींगसाठी टियागो एक पाऊल पुढे आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.