Tata Sierra नव्या अवतारात, या तारखेला होणार लाँच, हाय टेक फिचर्सने सुसज्ज कार
टाटा मोटर्सने तिची आयकॉनिक सुव्ह Sierra च्या पुनरागमनाची घोषणा केली आहे. रेट्रो डिझाईन आणि मॉडर्न फिचर्सने सुसज्ज नवीन सिएरा 25 नोव्हेंबर 2025 रोजी लाँच होणार आहे. चला या कारची वैशिष्ट्ये पाहूयात...

Tata Motors ने आपली प्रसिद्ध आणि आयकॉनिक SUV Sierra चे जबरदस्त पुनरागमनाची घोषणा केली आहे. ही सुव्ह पुन्हा एकदा भारतीय रस्त्यावर धमाल माजवण्यासाठी तयार आहे. नव्या Tata Sierra 2025 चे डिझाईन जुन्या क्लासिक मॉडेल्सवरुन प्रेरित आहे. परंतू आता यास संपूर्ण रेट्रो आणि मॉर्डन स्टाईल अशा कॉम्बिनेशनसह सादर करण्यात येणार आहे. कंपनीने या कारची लाँच डेट 25 नोव्हेंबर 2025 निश्चित केली आहे. त्यामुळे या सुव्हच्या चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
कसे आहे डिझाईन?
नव्या Tata Sierra ने आपल्या जुन्या मॉडेलची ओळख कायम राखत एक नवीन आणि आणखीन आकर्षक डिझाईन सह प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यात कर्व्ड रिअर विण्डोज, बॉक्सी व्हील आर्चेस आणि शार्प LED हेडलाईट्स सारखे फिचर्सचा समावेश आहे. सुव्हला मस्कुलर आणि प्रीमीयम लुक देण्यासाठी यात नवीन अलॉय व्हील्स आणि पॅनोरमिक ग्लास रुफ जोडण्यात आला आहे.
लक्झरी आणि टेक्नोलॉजीचे इंटेरिअर
Tata Sierra 2025 चे केबिन खूपच लक्झरी आणि टेक-लोडेड असणार आहे. यात तीन मोठ्या 12.3-इंच स्क्रीन, व्हेटीलेटेड सीट्स, ड्युअल -झोन क्लायमेट कंट्रोल आणि एम्बिएंट लायटींग सारखे फिचर्स मिळण्याची आशा आहे. कंपनीने यात आराम आणि प्रीमियम एक्सपीरियन्स दोन्हींवर फोकस ठेवला आहे.
इंजिन आणि परफॉर्मेन्स
नव्या टाटा Sierra त 5-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन (170 bhp)च्या शिवाय डिझेल व्हेरिएंट देखील येण्याची शक्यता आहे. तसेच कंपनी या कारचे इलेक्ट्रीक व्हर्जन देखील नंतर लाँच करु शकते. टाटाचा दावा आहे की ही सुव्ह न केवळ परफॉर्मेन्समध्ये दमदार असेल तर ती मायलेज देखील चांगले देईल.
किंमत आणि लाँच डिटेल्स
टाटा सिएराची एक्स शोरुम किंमत सुमारे 12 लाख ते 20 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. या किंमतीच्या रेंजमध्ये ही सुव्ह SUV Hyundai Creta, Kia Seltos, Mahindra Scorpio-N आणि Maruti Grand Vitara सारख्या गाड्यांना टक्कर देणार आहे. टाटा Sierra ची सेफ्टी, फिचर्स आणि डिझाईनला पाहाता ही ‘व्हॅल्यु फॉर मनी’ SUV सिद्ध होऊ शकते.
