Maruti ची पहिली इलेक्ट्रीक SUV होणार दाखल, क्रेटाला जोरदार आव्हान
मारुती सुझुकीची पहिली ईलेक्ट्रीक सुव्ह ई-विटारा बाजारात दाखल होत आहे. या ई-विटारा कारचे इंटेरिअर मारुतीच्या सध्याच्या अन्य कार पेक्षा प्रीमियम आहे.

भारतीय बाजारात मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रीक एसयुव्ही ई-विटारा डिसेंबर २०२५ मध्ये शोरुममध्ये येण्यासाठी पूर्ण सज्ज आहे. या कारच्या लाँचिंगची नेमकी तारीख अजूनपर्यंत घोषीत केलेली नाही.हे मॉडेल मूळ रुपात मारुती eVX कॉन्सेप्टचे प्रोडक्शन व्हर्जन आहे. ज्यास पहिल्यांदा 2023 ऑटो एक्सपोमध्ये सादर करण्यात आले होते. मिडसाईज ईव्ही सेगमेंटमध्ये या नव्या मारुती ई- विटाराचा मुकाबला महिंद्रा BE 6, हुंडई क्रेटा इलेक्ट्रिक,एमजी ZS EV आणि टाटा कर्व्ह EV सोबत होणार आहे.
कंपनीचे टार्गेट
मारुती सुझुकीच्या गुजरात स्थित हंसलपुर मॅन्युफॅक्टरिंग प्लांट ई-विटाराचे प्रोडक्शन केंद्राच्या रुपात काम करेल. वाहन निर्माती कंपनीने जर्मनी, ब्रिटन, नेदरलँड, नॉर्वे आणि फ्रान्स सहित १२ युरोपिय देशांना या एसयूव्हीचे निर्यात सुरु केली आहे. सुझुकीचे टार्गेट जगभरातील १०० हून अधिक देशात आपल्या निर्यातीचा विस्तार करणे हा आहे.
बॅटरी ऑप्शन आणि रेंज
बहुप्रतिक्षित मारुती ई-विटारा 49kWh आणि 61kWh अशा दोन बॅटरी पॅक ऑप्शनमध्ये येणार आहे. याच्या छोट्या बॅटरीला एक 144bhp इलेक्ट्रीक इंजिन असून ते कमाल 189Nm टॉर्क देईल. मोठा बॅटरी पॅक 2WD, 174bhp आणि AWD, 184bhp, दोन्ही कॉन्फिगरेशनमध्ये मिळणार आहे.
AWD व्हेरिएंटमध्ये एक अतिरिक्त रिअर-एक्सल माऊंटेड 65bhp मोटरचा वापर केलेला आहे. जी 184bhp ची पॉवर आणि 300Nmचा टॉर्क जनरेट करते. भारत-स्पेक ई-विटारासाठी मारुती सुझुकीने दुजारा दिला आहे की ही इलेक्ट्रीक एसयुव्ही पाचशे किमीहून अधिक ड्रायव्हींग रेंज प्रदान करणार आहे.
ई-विटाराचे इंटेरिअर
ई – विटाराचे इंटेरिअर मारुती सुझुकीच्या सध्याच्या कारच्या तुलनेत प्रीमीयम वाटत आहे. या इलेक्ट्रीक कारमध्ये फॅब्रिक आणि लेदरेट अपहोल्स्ट्रीसह ड्युअल स्क्रीन (एक इंफोटेनमेंट सिस्टम आणि दूसरा इंस्ट्रूमेंट क्लस्टर), ग्लॉस ब्लॅक फिनिशवाले फ्लोटिंग सेंटर कन्सोल आणि ट्विन-स्पोक फ्लॅट-बॉटम स्टीअरिंग व्हील आहे. या कारच्या फिचर्समध्ये वायरलेस फोन चार्जर, युएसबी पोर्ट, एडीएएस, आयसोफिक्स चाईल्ड सीट माऊंट, सर्व प्रवाशांसाठी 3-पॉईंट सीट बेल्ट, त्रि-स्लॅश एलईडी डीईएल, समोरच्या बाजूला चार्जिंग पोर्ट, यात 18 -इंच अलॉय व्हील्स आणि पिलर-माउंटेड मागील दरवाजाचे हँडल आहेत
