सिंगल चार्जमध्ये 70 ते 100 किमी धावेल ही सायकल, जाणून घ्या याचे खास फिचर्स

| Updated on: May 26, 2021 | 7:57 PM

तंत्रज्ञानासोबतच यात बरेच बदल देखील करण्यात आले आहेत. यामध्ये कमी बजेटमध्ये आपल्याला चांगली ई-सायकल मिळेल. (This cycle will run 70 to 100 km in a single charge, know about features)

सिंगल चार्जमध्ये 70 ते 100 किमी धावेल ही सायकल, जाणून घ्या याचे खास फिचर्स
सिंगल चार्जमध्ये 70 ते 100 किमी धावेल ही सायकल
Follow us on

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने कार किंवा दुचाकी वापरणे खूप महाग झाले आहे. यामुळे जर आपल्याला पैसे वाचवायचे असतील तसेच आपले आरोग्यही तंदुरुस्त ठेवायचे असेल तर आपल्यासाठी इलेक्ट्रिक सायकल हा एक चांगला पर्याय आहे. ही सायकल बर्‍याच रेंज आणि विविध प्रकारात उपलब्ध आहेत. तंत्रज्ञानासोबतच यात बरेच बदल देखील करण्यात आले आहेत. यामध्ये कमी बजेटमध्ये आपल्याला चांगली ई-सायकल मिळेल. (This cycle will run 70 to 100 km in a single charge, know about features)

स्केलिग प्रो (Skellig Pro)

भारतात अनेक परदेशी कंपन्या इलेक्ट्रिक सायकली विकत आहेत. त्यापैकीच एक ब्रिटनची कंपनी गोझेरो(GoZero) आहे. कंपनीने भारतात ई-सायकलच्या अनेक रेंज आणल्या आहेत. यापैकी स्केलिग प्रो(Skellig Pro) सर्वाधिक पसंत केली जात आहे. कंपनीचा दावा आहे की, ही सायकल सिंगल रिचार्जवर 70 किमी पर्यंत चालते. यात 250W पॉवरची मोटर आहे. या सायकलमध्ये 7-स्पीड मायक्रोशिफ्ट गिअर आहे. याशिवाय ड्युअल डिस्क ब्रेकसुद्धा उपलब्ध असतील. या ई-सायकलची किंमत सुमारे 39,999 रुपये आहे.

रोडलार्क (Roadlark)

इलेक्ट्रिक सायकल कंपनी नेक्सझू मोबिलिटी(Nexzu Mobility)ने मार्चमध्ये इलेक्ट्रिक सायकल रोडलार्क(Roadlark) लाँच केले. एकदा चार्ज झाल्यावर ही सायकल 100 किमी अंतर धावू शकते असा कंपनीचा दावा आहे. याची खासियत अशी आहे की बॅटरी डिस्चार्ज झाल्यानंतरही आपण पँडलद्वारे सायकल चालवू शकतो. यात ड्युअल बॅटरी सिस्टम आहे. प्रायमरी 8.7 Ah ची हलकी आणि रिम्हूवेबल बॅटरी देण्यात आली आहे, यात 5.2 Ah दुय्यम इन-फ्रेम बॅटरी देखील उपलब्ध आहे. त्याची किंमत 42,000 रुपये आहे.

हेईलियो एम 100 (Heileo M100)

बेंगळुरूस्थित कंपनी टौचे(Toutche)ने आपली इलेक्ट्रिक सायकल हेईलियो एम 100 (Heileo M100) बाजारात आणली आहे. या इलेक्ट्रिक सायकलची रेंज 60 किमी आहे. याची बॅटरी 0.37kWh क्षमतेची आहे. त्यामध्ये रेंज वाढविण्याचा एक पर्याय उपलब्ध आहे. यासाठी, आपल्याला बॅटरी अपग्रेड करावी लागेल. या सायकलची किंमत सुमारे 49,900 रुपये आहे. (This cycle will run 70 to 100 km in a single charge, know about features)

इतर बातम्या

“सुबोधकुमार CBI च्या प्रमुखपदी, राज्य सरकारला अडचणीत आणणाऱ्या अधिकाऱ्यांना महत्वाची पदं”

भाजपमध्ये किंमत नसल्यामुळे राणे वैफल्यग्रस्त, वैभव नाईकांचा पलटवार