कार खरेदी करताना तुम्ही काय पाहाता ? या सेफ्टी फिचर्सची खात्री नक्की करा
अनेक लोक कमी किंमतीच्या आणि कमजोर सेफ्टीच्या कार निवडतात. परंतू हा निर्णय नंतर त्रासदायक ठरतो. त्यामुळे कार खरेदी करताना केवळ डिझाईन आणि प्रिमीयम लूकवर न भुलता सेफ्टीवर जास्त लक्ष द्यायला हवे...

Car Safety Features : कार खरेदी करताना केवळ त्यातील सनरुफ, मोठी टच स्क्रीन आणि प्रीमियम लूकच महत्वाचा नसतो. तर त्यात इतरही महत्वाच्या सेफ्टी फिचर्सचा विचार करणे महत्वाचे असते. कार कंपन्या आकर्षक फिचर्सना जास्त प्रमोट करतात, कारण या गोष्टी लोकांना मोहवून टाकतात. मात्र, खरे तर तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी जे फिचर्स महत्वाचे असतात त्याची आधी तपासणी करायची असते. अनेक लोक कमी किंमत किंवा जास्त फिचर्सच्या चक्करपायी अनेक सेफ्टी फिचर्सना दुर्लक्ष करतात.
ही चूक नंतर महागात पडू शकते. आता भारतीय बाजारात देखील कार सेफ्टी संदर्भात लोकांचा विचार वेगाने बदलत आहे.ग्राहक आता केवळ स्टाईलच नव्हे तर मजबूत बॉडी आणि एडव्हान्स सेफ्टी टेक्नॉलॉजीवाल्या कारना जास्त पसंदी देत आहेत. यामुळे तुम्ही जर नवीन कार विकत घेण्याच्याय विचार करत आहात तर काही आवश्यक सेफ्टी फिचर्सना चेक करणे गरजेचे आहे.
एअरबॅग आणि ब्रेकिंग सिस्टीम महत्वाची
नवीन कार खरेदी करताना सर्वात आधी एअरबॅगची संख्या चेक करणे गरजेचे असते. आज अनेक कंपन्या ६ एअरबॅग स्टँडर्ड देत आहेत. जे अपघाताच्या वेळी गंभीर जखम होण्यापासून वाचवते. या सोबतच ABS म्हणजेच एंटी लॉक ब्रेक्रिंग सिस्टीम आणि EBD सारखे फिचर्स देखील खूप महत्वाचे आहेत. हे फिचर्स अचानक ब्रेक लावल्यानंतर कारवर कंट्रोल ठेवण्यात आणि स्कीड होण्यापासून वाचवतात.
तसेच ESC म्हणजेच इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल खराब रोड वा तीव्र वळणावर कारला संतुलित राखण्यासाठी मदत करते. जर कारमध्ये हिल होल्ड असिस्ट आणि ट्रॅक्शन कंट्रोल सारखे फिचर्स असतील तर ड्रायव्हिंग आणखीन जास्त सुरक्षित होते. आजकाल अनेक लोक केवळ मोठी स्क्रीन पाहून कार खरेदी करत असतात. मात्र, खरा स्मार्ट निर्णय तोच असतो, ज्यात सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य दिलेले असते.
ADAS आणि मजबूत बॉडी
आता भारतीय बाजारात ADAS म्हणजे एडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम वेगाने लोकप्रिय होत आहे. ही टेक्नॉलॉजी ड्रायव्हींगला जास्त सुरक्षित बनवत आहे. यात लेन डिपार्चर वॉर्निंग, ऑटोमॅटिक इमरजन्सी ब्रेकिंग आणि अडॅप्टिव्ह क्रुझ कंट्रोल सारखे फिचर्स मिळतात. ही सिस्टीम ड्रायव्हरची छोट्या चुकीला मोठा अपघात बनण्यापासून वाचवते. याशिवाय कारची बॉडी क्वॉलिटी आणि ग्लोबल NCAP सेफ्टी रेटिंग देखील पाहणे गरजेचे असते.