पेट्रोल आणि हायब्रीड इंजिनमध्ये काय आहे फरक? अनेक कार चालकांसाठी नवीन आहे माहिती

| Updated on: Oct 28, 2022 | 11:49 AM

इंधन दरवाढीनंतर अनेक चारचाकी वाहनांमध्ये हायब्रीड इंजिन प्रणालीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. हे इंजिन नेमके काय आहे जाणून घेऊया

पेट्रोल आणि हायब्रीड इंजिनमध्ये काय आहे फरक? अनेक कार चालकांसाठी नवीन आहे माहिती
हायब्रीड इंजिन
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी जग स्वच्छ गतिशीलता उपाय शोधत आहे. त्यामुळे सीएनजीवर चालणारी वाहने, हायड्रोजन इंधन, इलेक्ट्रिक कार आणि हायब्रीड यांसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा शोध लागला. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी अनेक कार निर्मात्यांनी त्यांची डिझेल इंजिने बंद केली आहेत. आजच्या युगात, काही आधुनिक कारमध्ये नियमित पेट्रोल इंजिन किंवा हायब्रीड प्रणाली यापैकी एक निवडण्याचा पर्याय आहे. यामुळे चार्जिंग, कारची रेंज यासारख्या गोष्टींबद्दल काही चिंता निर्माण होत आहे. एक उपाय म्हणजे हायब्रीड (Hybrid Engine) प्रणाली कशी कार्य करते आणि पेट्रोलवर चालणाऱ्या नेहमीच्या वाहनाच्या तुलनेत ती किती वेगळी आहे हे जाणून घेऊया.

पेट्रोल इंजिन

पेट्रोलवर चालणारे इंजिन किंवा अंतर्गत ज्वलन इंजिन (ICE) प्रामुख्याने पेट्रोलवर चालते जे इंजिनच्या ज्वलन कक्षामध्ये जळते आणि ड्राइव्हशाफ्टद्वारे चाकांना शक्ती देते. जळलेल्या पेट्रोलचा धूर कारमधून एक्झॉस्ट पाईपमधून बाहेर पडतो आणि वातावरणात पसरतो.

कार चालवण्यासाठी पेट्रोल हे प्रामुख्याने वापरले जाणारे आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या कारची काही उदाहरणे म्हणजे मारुती सुझुकी अल्टो, ह्युंदाई वेर्ना, ह्युंदाई i20, टाटा पंच हे आहेत. भारतीय बाजारपेठेतील बहुतांश वाहने पेट्रोलवर चालतात.

हे सुद्धा वाचा

हायब्रिड इंजिन

हायब्रिड वाहनामध्ये नियमित अंतर्गत ज्वलन इंजिन (ICE) आणि इलेक्ट्रिक ड्राईव्हट्रेन असते जे एकत्र काम करतात. वाहनाच्या प्रकारावर अवलंबून, वाहन प्रामुख्याने बॅटरी पॅक किंवा ICE प्रकारात मोडतात. भारतात विकली जाणारी बहुतेक हायब्रिड वाहने प्रामुख्याने पेट्रोल इंजिनद्वारे चालविली जातात. तथापि, जेव्हा वाहन कमी वेगाने चालविले जाते, तेव्हा इलेक्ट्रिक ड्राइव्हट्रेन कार्य करण्यास सुरवात करते.

पेट्रोल इंजिन आणि हायब्रीड मोटर पेट्रोलचा कमीत कमी वापर करून  उच्च कार्यक्षमता देण्यासाठी एकत्र काम करतात. ICE मोडवर बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज होईपर्यंत इलेक्ट्रिक मोटर चालते आणि सामान्यतः शुद्ध EV क्षमता खूपच कमी असते. जेव्हा बॅटरी पॅक कमी पॉवरवर चालतो, तेव्हा पेट्रोल इंजिन आणि रीजनरेटिव्ह ब्रेकिंग बॅटरी चार्ज करते यालाच हायब्रीड म्हणतात. किंवा काही मॉडेल्समधील इलेक्ट्रिक कारप्रमाणे बाह्य चार्जरद्वारे चार्ज केले जाऊ शकते, ज्याला प्लग-इन-हायब्रिड म्हणतात.