MG Astor डीलरशिप्सकडे उपलब्ध, लाँचिंगआधीच जाणून घ्या कसा असेल कारचा लूक, किंमत आणि फीचर्स

| Updated on: Sep 20, 2021 | 6:12 PM

एमजी मोटर्सने ऑक्टोबर 2021 मध्ये लॉन्च होण्यापूर्वी MG Astor SUV सादर केली आहे. कंपनीची आगामी फोर-व्हीलर ही भारतातील पहिली आर्टिफिशियली इंटेलिजेंट (AI) कार असण्याची अपेक्षा आहे.

MG Astor डीलरशिप्सकडे उपलब्ध, लाँचिंगआधीच जाणून घ्या कसा असेल कारचा लूक, किंमत आणि फीचर्स
Follow us on

मुंबई : एमजी मोटर्सने ऑक्टोबर 2021 मध्ये लॉन्च होण्यापूर्वी MG Astor SUV सादर केली आहे. कंपनीची आगामी फोर-व्हीलर ही भारतातील पहिली आर्टिफिशियली इंटेलिजेंट (AI) कार असण्याची अपेक्षा आहे. Astor कालपासून (19 सप्टेंबर) एमजी शोरूममध्ये प्रदर्शित झाली आहे. तथापि, ब्रँड लॉन्च होण्यापूर्वी या कारबद्दल अधिक तपशील शेअर करण्याची शक्यता आहे. भारतातील ग्राहक तांत्रिकदृष्ट्या MG Astor SUV लाँच होण्याची वाट पाहत आहेत. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी कारचा प्रत्येक पैलू सादर करणार आहोत. (You Can Now Have A Look At MG Astor In The Flesh At Dealerships, know price, features)

एमजी मोटर इंडियाने (MG Motor India) नुकताच आपल्या MG Astor कारवरून पडदा हटवला आहे. कंपनीच्या सध्याच्या MG ZS EV ची ही पेट्रोल आवृत्ती आहे. पण कंपनीने त्यात अशी अनेक वैशिष्ट्ये दिली आहेत ज्यामुळे ती देशातील पहिली आर्टिफिशियल इंटेलीजन्स (AI) वाली कार ठरते. MG Astor मध्ये, कंपनीने पर्सनल AI असिस्टंट दिलं आहे. या कारच्या पर्सनल AI असिस्टंटला पॅरालिम्पिक खेळाडू आणि खेलरत्न दीपा मलिक यांनी आवाज दिला आहे. एसयूव्ही विभागातील ही देशातील पहिली आर्टिफिशियल इंटेलीजन्स (AI) कार असल्याचा कंपनीचा दावा आहे.

मिड-साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये कांटे की टक्कर

मिड-साइज एसयूव्ही सेगमेंट भारतीय ऑटोमोबाईल उद्योगात सर्वात स्पर्धात्मक आहे. क्रेटा ते सेल्टॉस आणि कुशक पर्यंत, येथे प्रत्येक वाहनाचा स्वतःचा एक यूएसपी आहे. अशा परिस्थितीत, एमजी मोटर इंडिया अॅस्टरला अद्वितीय वैशिष्ट्यांसह पॉवर-पॅक पर्याय म्हणून सादर करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही.

फीचर्स

ग्राहकांना तीन इंटीरियर थीममधून आवडती थीम निवडता येईल. त्यापैकी एक म्हणजे ड्युअल-टोन संगरिया रेड. MG Astor मध्ये 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. यामध्ये अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोचा समावेश आहे. इतर स्टँडर्ड फीचर्समध्ये JioSaavn अॅप, आणि MapMyIndia द्वारे मॅप्स आणि नेव्हिगेशन सेवा समाविष्ट आहेत.

एमजी मोटर इंडिया Astor ला हवेशीर फ्रंट सीट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल सारख्या सुविधांनी सुसज्ज करण्याची अपेक्षा आहे. एमजी मोटर इंडिया त्याच्या कारमध्ये इंडस्ट्रीमधील पहिला पर्सनल असिस्टंट ऑफर करत आहे जे अमेरिकन फर्म स्टार डिझाईनने बनवले आहे. या विभागात पहिली ऑटोनॉमस लेव्हल 2 टेक्नोलॉजी दिली जात आहे.

MG Astor ची किंमत

MG Astor ची किंमत आगामी सणासुदीच्या हंगामात जाहीर होण्याची शक्यता आहे. एसयूव्हीची किंमत 10 लाख ते 16 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) दरम्यान असण्याची शक्यता आहे. ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टॉस किंवा टाटा हॅरियरशी Astor ला स्पर्धा करावी लागेल.

इतर बातम्या

ओला इलेक्ट्रिक स्कूटरची कमाल! दोन दिवसांत तब्बल 1100 कोटींची कमाई

होंडा एन7एक्स मिडसाईज एसयुव्ही 21 सप्टेंबरला लॉन्च होणार, ह्युंडाई क्रेटा आणि किया सेल्टोससारख्या कारशी असेल स्पर्धा

PHOTO | डस्टर ते हॅरियर पर्यंतच्या बेस्ट मिडसाईज एसयूव्हीवर मोठी सवलत, जाणून घ्या तपशील

(You Can Now Have A Look At MG Astor In The Flesh At Dealerships, know price, features)