BLOG: स्पष्टपणे विचार करण्याची कला : गटात काम करणं फायद्याचं की तोट्याचं?

14 एप्रिल 1994 मध्ये अमेरिकन एअर फोर्स एफ-1 च्या लढाऊंनी अमेरिकन सैन्याच्याच दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्सवर हल्ला केला. यात त्यातील सर्व 26 सैनिक आणि इतर लोक ठार झाले. यामागे Social Loafing चं कारण असल्याचं समोर आलं. हे Social Loafing नेमकं काय आहे?

BLOG: स्पष्टपणे विचार करण्याची कला : गटात काम करणं फायद्याचं की तोट्याचं?
Follow us
| Updated on: Apr 16, 2020 | 2:50 AM

‘रस्सी खेच’ म्हणजे दोरी ओढायचा खेळ कधी खेळलात का? गटामध्ये की एकट्याने? तुम्ही म्हणाल त्याने काय फरक पडतो? 1913 मध्ये फ्रेंच अभियंता ‘मॅक्सिमिलियन रिंगेल्मॅन’ याने एक प्रयोग केला. दोरी ओढायच्या खेळाच्या म्हणजेच रस्सी खेचच्या मदतीने त्याने हा अभ्यास केला. एकदा हा खेळ त्याने गटामध्ये खेळवला. काय सापडलं असेल त्याला यामधून? (Art of Thinking clearly Social Loafing)

तर……….

त्याला असं सापडलं की, जेव्हा एखादा व्यक्ती एकट्याने हा खेळ खेळतो तेव्हा तो जिंकण्यासाठी तितकी ताकद लावतो तितकी तो गटामध्ये खेळताना लावत नाही. दोन्ही वेळी खेळ सारखाच आहे. मग गटात आणि एकट्याने खेळताना लावणाऱ्या ताकदीत फरक का?

1974 मध्ये अॅलन इंघॅम, जेम्स ग्रेव्ह्ज यांनी असाच एक अभ्यास केला. त्यांनी दोन ग्रुप बनवले.

1. एका गटामध्ये दोन व्यक्ती होते. वर दाखवलेल्या दुसऱ्या चित्राप्रमाणे.

2. दुसऱ्या गटात खेळातल्या लोकांची संख्या वाढवत नेली. या दुसऱ्या गटात पहिल्या गटातील दोन लोकांसोबत इतरही लोक होते. मात्र, हे दोन लोक सोडून इतर लोकं फक्त दोरी ओढायची अॅक्टिंग करत होते. त्यांना या प्रयोगात असं आढळलं, की जसे जसे खेळात लोकं वाढत होते तशी पहिल्या गटातील दोन लोकांची आधीच्या गटातील कामगिरीच्या तुलनेत घटत गेली.

या आलेखावरुन आपल्या लक्षात येईल की खेळात जसे जसे लोकं वाढत गेले तसं त्या दोन लोकांची खेळातील कामगिरी घटत गेली. यालाच “social loafing” असं म्हणतात. याचाच अर्थ असा की, “जेव्हा लोकं एकत्र काम करतात तेव्हा त्यांची वैयक्तिक कामगिरी कमी होते.

हे फक्त शारीरिक कामगिरीच्या बाबतीत नव्हे, तर मानसिकरित्या सुद्धा आपली कामगिरी, गटामध्ये काम करत असतांना घटते. उदाहरणार्थ वेगवेगळ्या मिटिंग्समध्ये लोकांची संख्या जेवढी जास्त तेवढा वैयक्तिक सहभाग कमी होतो. लहानपणी कधी तुम्हीही अनुभव घेतला असेलच. शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना दिल्या जाणाऱ्या असाइनमेंट कधी एकट्याला दिल्या जायच्या तर कधी गटात. पण जेव्हा त्या एकट्याला दिल्या जायच्या तेव्हा त्यासाठी केलेली मेहेनत निश्चितच अधिक असायची. कारण कितीही नाही म्हटलं तरी गटात काम करतांना जबाबदारी आपल्या एकट्या व्यक्तीची नसते. हे आपल्याला माहिती असतं.

1993 मध्ये मेटा-विश्लेषणामध्ये यू.एस.चे सामाजिक मानसशास्त्रज्ञ स्टीव्हन जे. करौ यांनी एक ‘Collective Effort Model (CEM)’ नावाचे मॉडेल मांडले. याचा उपयोग Social loafing चा अंदाज लावण्यासाठी केला जातो. या मॉडेलचे काही निष्कर्ष असे होते.

  • Social Loafing चे परिणाम हे महिलांच्या बाबतीत आणि पूर्वेकडील संस्कृतीतील लोकांविषयी कमी झालेले आढळले.
  • व्यक्ती जेव्हा ग्रुपमध्ये त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर जास्त चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी असते तेव्हा जास्त social loafing करतात.
  • व्यक्ती ओळखीच्या लोकांच्या गटात कमी social loafing करतात. तसेच जास्त हुशार लोकांच्या गटात म्हणजेच  ‘highly valued group’ मध्ये लोकं अत्यंत कमी किंवा काहीच  social loafing करत नाहीत.

पण नेमकं ग्रुपमध्ये काम करायची कल्पना जास्त फेमस कधीपासून झाली? कदाचित जपानच्या लोकांकडून? 30 वर्षांपूर्वी जागतिक बाजारपेठेत जपानच्या उत्पादनांचा पूर आला होता. व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञांनी या औद्योगिक चमत्काराकडे अधिक बारकाईने पाहिले आणि त्यांच्या असे लक्षात आलं की जपानी कारखाने हे वेगवेगळ्या गटात संघटीत झालेले आहेत. मग हेच मॉडेल सर्वत्र कॉपी केले गेले. पण जपानमध्ये जे झाले त्याची पुनरावृत्ती अमेरिका आणि युरोपमध्ये होऊ शकली नाही. कारण कदाचित तेथे social loafing क्वचितच घडले असावे. पश्चिमेकडे हे गट छोटे असतात तेव्हाच तेथील लोकं गटात खूप चांगली कामगिरी करतात. अनेक विशेषतज्ज्ञ असलेले असे असतात. कारण या गटांमध्ये व्यक्तिगत कामगिरीवर विशेषतज्ज्ञ लक्ष ठेऊन असतात.

विशेष गोष्ट म्हणजे gender म्हणजेच लिंगभावाप्रमाणे social loafing चे परिणाम बदलतात. ते कसे?  तर 1985 मध्ये गॅब्रान्या, वांग आणि लताने यांना आढळले की चीनी आणि अमेरिकन अशा दोन्ही संस्कृतींमध्ये social loafing चे परिणाम स्त्री आणि पुरुष यांमध्ये वेगवेगळे दिसून येतात. म्हणजेच वेगवेगळ्या संस्कृतीत स्त्रिया या पुरुषांपेक्षा कमी social loafing करतात. social loafing चे असेच काही वेगवेगळे परिणाम आणि घटना आपण पाहू.

प्रयत्नांची अक्षमता

Social Loafing चा अजून एक परिणाम म्हणजे प्रयत्नांची अक्षमता. म्हणजे ग्रुपमध्ये काम करतांना समजा एखाद्या व्यक्तीला वाटलं की तिच्या किंवा त्याच्या प्रयत्नांना पुरेसा न्याय मिळत नाही, तर असे व्यक्ती कामात दुर्लक्ष करू शकतात किंवा कमी प्रयत्न करू शकतात. उदाहरणार्थ मतदान/वोटिंग. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत फक्त 67 टक्के मतदान झालं. सगळ्यांना मतदान करणे किती महत्वाचे आहे हे माहिती असले तरी असलेल्या लोकसंखेच्या दृष्टीने माझ्या एका मताचा काय उपयोग होणार असं वाटून लोकं मतदान करत नाही. पण जर प्रत्येकाने असा विचार करून मत दिले नाही तर काय होईल?

यातून social loafing होण्यामागे शोषक इफेक्ट/ sucker effect हे एक कारण असू शकतं हे लक्षात येतं. हा इफेक्ट म्हणजे ग्रुपमध्ये काम करतांना काही लोकांना वाटतं की आपण कितीही मेहनत घेतली तरी त्याचं क्रेडीट हे ग्रुपमधल्या कुण्या तरी दुसऱ्याच व्यक्तीला मिळणार मग कशाला मेहनत करा? 

1994 मध्ये ब्लॅक हॉक शूट डाउन नावाची एक घटना घडली होती. या घटनेचा जेव्हा सखोल अभ्यास झाला तेव्हा असे लक्षात आले की या घटनेमागे social loafing कारणीभूत आहे. 

1994 ब्लॅक हॉक शूट डाउन घटना

14 एप्रिल 1994 मध्ये अमेरिकन एअर फोर्स एफ-1 च्या लढाऊंनी उत्तर इराकमध्ये इराकचे हेलिकॉप्टर समजून अमेरिकन सैन्याच्याच दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्सवर हल्ला केला. यात त्यातील सर्व 26 सैनिक आणि इतर लोक ठार झाले. या घटनेच्या तपशीलांचे विश्लेषण वेस्ट पॉइंटचे प्रोफेसर स्कॉट स्नूक यांनी त्यांच्या फ्रेंडली फायर पुस्तकात केले होते. यात स्नॉकने हेलिकॉप्टरचा मागोवा घेण्यास आणि नेमबाजीला रोखण्यात AWACS विमान संघाच्या अपयशाला social loafing कारणीभूत आहे असं म्हटलं.  social loafing मुळे 26 जणांना आपलं जीव गमवावा लागला.

जर याचे एवढे गंभीर परिणाम होतात तर मग social loafing कसं टाळायचं?  

  1. गटातील लोकंची संख्या कमी ठेवणे .
  2. गटातील लोकांना जास्तीत जात प्रेरणा देणे
  3. गटापुढे  आव्हानात्मक ध्येय ठेवणे

तर याच अर्थ असा की गटात काम करताना गट हे छोटे ठेवले, गटात काही विशेषतज्ज्ञांचाही समावेश केला आणि या गटापुढे जर आव्हानात्मक ध्येय ठेवले तर  social loafing चा धोका कमी होऊ शकतो.

(टीप – लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत)

संबंधित ब्लॉग:

BLOG: अपयशी स्वप्नांच्या स्मशानभूमीमध्ये अधूनमधून चक्कर मारायला हवी

BLOG: स्पष्टपणे विचार करण्याची कला : सरळरेषीय पूर्वग्रह : तुम्ही एक कागद सातवेळा दुमडू शकता?

BLOG: स्पष्टपणे विचार करण्याची कला : गालावर तीळ असलेल्या गोऱ्या मुली : नेमकेपणामुळे होणारा गोंधळ

BLOG: स्वत:ची इतरांशी तुलना करण्याचा धोका

Art of Thinking clearly Social Loafing

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.