AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8th Pay Commission: सरकारी कर्मचार्‍यांना थकबाकीसह कधी मिळणार पगार, मोठी अपडेट काय?

8th Pay Commission: 8 वा वेतन आयोग सध्या चर्चेत आहे. आयोगाला मंजूरी मिळाल्यानंतर 2027 पर्यंत तो लागू होऊ शकतो. कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2026 रोजीपासूनची थकबाकी आणि वाढीव पगार मिळण्याची आशा आहे.

8th Pay Commission: सरकारी कर्मचार्‍यांना थकबाकीसह कधी मिळणार पगार, मोठी अपडेट काय?
8 वा वेतन आयोग
| Updated on: May 26, 2026 | 4:06 PM
Share

8th Pay Commission Update: 8 व्या वेतन आयोग सध्या कर्मचारी संघटना आणि इतरांशी चर्चा करत आहे. वेतन आयोगाकडून पगार, थकबाकी, अनुषांगिक लाभ आणि सेवा निवृत्तीची रक्कम ठरवण्यापूर्वी ही चर्चा करण्यात येत आहे. वेतन आयोगाला मंजूरी मिळाल्यानंतर तो 2027 च्या अखेरपर्यंत लागू करण्यात येऊ शकतो. 1 जानेवारी 2026 पासून थकबाकी (Arrears) मिळण्याची आशा आहे. कर्मचारी संघटनांनी विविध फिटमेंट फॅक्टर सुचवले आहे. आयोगाचे दौरे, मंजूरी मिळणे आणि तो लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना एरिअरसह वाढीव पगार हाती येईल.

1 जानेवारी 2026 पासून थकबाकी

8 वा केंद्रीय वेतन आयोग अद्याप लागू झालेला नाही. कारण वेतन, पेन्शन, अनुषांगिक लाभ, कर्मचाऱ्यांची कामासंबंधीच्या अटी, सेवा शर्तीशी संबंधित मुद्दे, कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या संघटना, कर्मचारी आणि इतरांशी चर्चा करत आहे. ही चर्चा 8व्या CPC च्या प्रक्रियेचा भाग आहे. याविषयीचा अहवाल तयार झाल्यानंतर तो मंत्र्यांच्या गटाकडे पाठवण्यात येईल. मंजूरी मिळाल्यानंतर हा अहवाल लागू होईल. कर्मचाऱ्यांना थकबाकीसह सुधारीत वेतन श्रेणीनुसार पगार मिळेल. 1 जानेवारी 2026 रोजीपासून थकीत रक्कम आणि वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. 1-5 श्रेणीतील कर्मचार्‍यांचा जर 20 महिन्यांची थकबाकी असेल तर ती रक्कम कर्मचाऱ्यांना मिळेल. आतही रक्कम किती असेल याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

8 व्या वेतन आयोगाचा दौरा

8 व्या वेतन आयोगाने उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये बैठक घेतली. आयोगाने केंद्र सरकारचे विभाग, कर्मचारी संघटना यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यांच्या अडचणी आणि मागण्या काय हे समजून घेतले. जून 2026 मध्ये जम्मू-कश्मीर आणि लद्दाखमध्ये बैठका झाल्या. त्यात कार्यक्रम निश्चित करण्यात आला.

फिटमेंट फॅक्टरवर भर

8 व्या वेतन आयोगाने देशातील विविध क्षेत्रातील संघटना, कर्मचारी नेते आणि इतर संस्थांशी चर्चा केली आहे. त्यात प्रत्येकाने विविध फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची शिखर संघटना NC-JCM ने 3.833 फिटमेंट फॅक्टर आणि 69,000 रुपये कमाल मूळ वेतनाची मागणी केली आहे. All India Defence Employees Federation (AIDEF) ने सुद्धा 3.83 फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे. तर Indian Railways Technical Supervisors Association (IRTSA) या संघटनेने पाच विविध फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे. 2-5 या श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी 2.92 पासून ते 17-18 श्रेणीच्या कर्मचाऱ्यांसाठी 4.38 पर्यंत फिटमेंट फॅक्टरची मागणी करण्यात आली आहे. अर्थात ही केवळ मागणी आहे. यापूर्वी 7 व्या वेतन आयोगावेळी NC-JCM ने 3.71 फिटमेंट फॅक्टरची मागणी केली होती. पण आयोगाने 2.57 ची शिफारस केली होती. ही शिफारस नंतर ग्राह्य धरण्यात आली.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा