AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Price Today: CNG सारखीच रात्रीतून LPG च्या किंमतीत वाढ? सिलेंडर बुकिंगपूर्वी जाणून घ्या भाव

LPG Price Today: CNG च्या किंमतीत वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठा वाढ झाली आहे. काल चौथ्यांदा किंमती वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. तर आज सीएनजीच्या किंमतीत वाढ झाली आहे. एलपीजी सिलेंडरची किंमत काय?

LPG Price Today: CNG सारखीच रात्रीतून LPG च्या किंमतीत वाढ? सिलेंडर बुकिंगपूर्वी जाणून घ्या भाव
एलपीजी सिलेंडरच्या किंमती वाढणार?Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 26, 2026 | 11:18 AM
Share

LPG Price Today: सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत जवळपास 10 दिवसात चौथ्यांदा वाढ झाली. आज CNG च्या किंमतीत वाढ झाली. दिल्लीत सीएनजीची किंमत दोन रुपयांनी वाढली. दिल्लीत आता सीएनजीची किंमत 83.09 रुपये प्रति किलोवर पोहचल्या आहेत. त्यापूर्वी राज्यात मुंबईसह पुण्यात सीएनजीच्या किंमतीत वाढ झाली होती.  पण सध्या LPG सिलेंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. आज 26 मे रोजी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. चौथ्या दरवाढीनंतर देशातील अनेक राज्यातील पेट्रोलचा भाव 110 रुपयांवर पोहचला आहे.

काय आहे घरगुती गॅस सिलेंडरचा भाव?

दिल्लीत 14.2 किलोग्रॅम घरगुती सिलेंडरचा भाव 913 रुपये, मुंबईत हाच दर 912.50 रुपये, कोलकत्तामध्ये 939 रुपये असा भाव आहे. चेन्नईमध्ये घरगुती सिलेंडरचा भाव 928.50 रुपये इतका आहे. किंमती मार्च महिन्यापूसन स्थिर आहे. मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 60 रुपयांची वाढ झाली होती. पण गेल्या 12 वर्षांचा विचार केला. तर घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती दुप्पट झाल्या आहेत. गेल्या एका तपात पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजीची भयावह दरवाढ झाली आहे. सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा पडला आहे.

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 47 टक्के वाढ

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती अमेरिका-इराण-इस्त्रायल युद्धानंतर 47 टक्क्यांनी भडकल्या आहेत. यापूर्वी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती 900 रुपयांहून अधिकने भडकल्या आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मार्च महिन्यात 60 रुपयांची वाढ झाली होती. अद्याप त्यात वाढ झालेली नाही. पण इंधन दरवाढ पाहता, घरगुती गॅसची किंमत अजून किती दिवस आटोक्यात राहिल याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

एलपीजी सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा

मध्यंतरी एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यातील अनियमिततेमुळे गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेकांना एलपीजी बुक करूनही सिलेंडर नि मिळाल्याने वितरकाकडे धाव घ्यावी लागली. मागणी आणि पुरवठा यातील अनियमितता, गॅस एजन्सींची साठेबाजी यामुळे अनेक भागात गॅस तुटवडा जाणवला. सरकारने तातडीने अंमलबजावणी केली. तरीही काही जिल्ह्यातील गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ