या बँकेच्या खातेधारकांना मोठा झटका, येत्या १ डिसेंबरपासून वाढवले सर्व्हीस चार्ज
ICICI बँकेने त्यांच्या NRI खाताधारकांना मोठा झटका दिला आहे. १ डिसेबर पासून नव्या नियमानुसार ज्यांच्या या खात्यात कॅश जमा करणे आणि काढणे माहागात पडणार आहे. ECS पेमेंट फेल झाल्यानंतर देखील दंड वाढणार आहे.

जर तुमचे खाते ICICI बँकेत आहे तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. आयसीआयसीआय बँकेने परदेशात राहाणाऱ्या भारतीय (NRI) च्या सेव्हींग अकाऊंटशी संबंधित काही सर्व्हीस चार्जमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन नियम १ सप्टेंबर २०२६ पासून लागू होतील. याचा परिणाम एनआरआय सेव्हिंग अकाऊंट असणाऱ्या ग्राहकांना पडणार आहे.
बँकेने खास करुन कॅश जमा करणे, कॅश काढणे आणि ECS च्या द्वारे होणारे पेमेंट फेल झाल्यानंतर लागणाऱ्या चार्जमध्ये बदल केला आहे. म्हणजे जर ग्राहक निश्चित फ्री लिमिटहून जास्त घेवाण-देवाण करत असेल तर त्यांना आधीच्या तुलनेने जास्त पैसे द्यावे लागणार आहे.
किती लागेल चार्ज?
आतापर्यंत निश्चित फ्री लिमिटहून जास्त कॅम जमा वा काढण्यावर दर १००० रुपयांवर ३.५० रुपये चार्ज लागत होता. १ डिसेंबरपासून याला वाढवून ४ रुपये करण्यात आला आहे. मात्र, मिनिमम चार्ज १५० रुपये राहाणार आहे. साधारण एनआरआय सेव्हिंग अकाऊंटमध्ये दर महिन्याला ३ वेळा कॅश जमा करणे आणि काढणे मोफत असेल. कॅश जमा करणे आणि काढण्याची मर्यादा १ लाख रुपये असेल. यात निश्चित ट्राक्झंशन संख्या वा रकमेची लिमिट पार झाल्यानंतर बँकेचा नवा चार्ज लागू होईल.
कोणत्या ग्राहकांना मिळेल जास्त लिमिट?
NRI प्रायव्हेट बँकिंग आणि प्रीमियम कॅटेगरीच्या काही ग्राहकांना साधारण खातेधारकांच्या तुलनेत जास्त सूट मिळेल. यासाठी ग्राहक बँकेत किमान एक कोटी रुपयांची एकूण रिलेशनशिप व्हॅल्यू ठेवावी लागेल. वा गेल्या तीन महिन्यांपैकी कोणत्याही एका महिन्यात खात्यात २५ लाख रुपये वा त्याहून जास्त डिपॉझिट आणि बॅलन्स असायला हवे.
अशा योग्य ग्राहकांना दर महिन्याला एकूण १५ ट्राक्झंशन मोफत मिळेल. याशिवाय कॅश जमा आणि काढण्यासाठी वेग-वेगळी १५ लाख रुपयांपर्यंत मोफत लिमिट मिळेल. या लिमिटहून जास्त लेन-देण केल्यानंतर दर १००० रुपयांवर ४ रुपये वा किमान १५० रुपये चार्ज लागेल.
ECS पेमेंट फेल झाल्यावर वाढेल चार्ज
ECS म्हणजे इलेक्ट्रॉनिक क्लियरिंग सर्व्हीसद्वारे बँक खात्यातून आपोआप होणारे पेमेंट. उदा. EMI, विम्याचे हप्ते वा दुसरे नियमित खर्च. जर खात्यात पुरेसे पैसे नसतील किंवा कोणा दुसऱ्या आर्थिक कारणाने पेमेंट फेल झाले तर बँक ५०० रुपये ते ५५० रुपये पर्यंत चार्ज वसुल करेल.
कोणत्या खात्यांवर लागू होतील नियम?
हा बदल ICICI बँकेच्या या NRI सेव्हींग अकाऊंटवर लागू होतील, उदा. NRI प्रायव्हेट बँकिंग, NRI प्रीमियम, NRI सिलेक्ट, NRI प्रो, NRI रेग्युलर, सीफेयरर, वर्च्यु आणि NRI स्पर्श. खास बाब म्हणजे हे बदल त्या खात्यांना देखील होतील जे ४ ऑगस्ट २०२५ च्या आधी उघडली आहेत.