
jio financial-paytm | पेटीएमवर भारतीय रिझर्व्ह बँकेने बंदी घातली आहे. त्यामुळे आपला पैसा सुरक्षित राहील कि, नाही? ही भिती लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. अशी चर्चा आहे की, उद्योगपती मुकेश अंबानी यांची जियो फायनेंशियल सर्व्हीसेस लिमिटेड पेटीएमचा वॉलेट बिझनेस विकत घेईल. पण यामागे सत्य काय आहे? त्याचा खुलासा आता झालाय. पेटीएमचे मालही हक्क असलेली कंपनी वन97 कम्युनिकेशंस आणि जियो फायनेंशियल्सने या बद्दल स्पष्टीकरण दिलय. एचडीएफसी बँक पेटीएमला वाचवणार अशी सुद्धा चर्चा आहे. पण या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कंपनी जियो फायनेंशियल सर्विसेसने स्पष्ट केलं की, “‘पेटीएम वॉलेट’ खरेदी करण्यासाठी वन97 कम्युनिकेशंससोबत कुठलीही चर्चा करण्याचा विचार नाहीय” शेअर मार्केटला दिलेल्या माहितीत जियो फायनेंशियल सर्विसेस लिमिटेडने सांगितलं की, “मीडियामध्ये या बद्दल सुरु असलेल्या चर्चा सगळ्या शक्यता, अंदाज आहेत. आम्ही अशा प्रकारच्या कुठल्याही चर्चेमध्ये सहभाग घेतलेला नाहीय”
पेटीएमने काय म्हटलय?
पेटीएमने सुद्धा आपल्या बाजूने स्पष्टीकरण दिलय. त्यांच्याकडे सुद्धा शेअर बाजाराने स्पष्टीकरण मागितलेलं. “जियो फायनेंशियलसोबत कुठलीही डील हे मनाचे खेळ आहेत. याला काही आधार नाहीय. हे चुकीच आहे” असं पेटीएमने अधिकृत स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकच्या सेवेवर बंदी घातली आहे. पेमेंट्स बँक कुठलीही रक्कम जमा करु शकत नाही. नवे ग्राहक जोडण्यावर मार्च 2022 पासून बंदी आहे. आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांना पैसे खर्च करण्यासाठी 29 फेब्रुवारीपर्यंतचा वेळ दिला आहे.