काँग्रेसच्या किमान वेतन योजनेमागे अमर्त्य सेन यांची थिअरी?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

नवी दिल्ली : देशात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. भाजपचा पराभव करण्यासाठी मोठ्या ताकदीने काँग्रेस मैदानात उतरली आहे. यावेळी काँग्रेसने आमची सत्ता आल्यास ‘किमान वेतन योजना’ देशातील सर्व गरिबांना लागू करु असे आश्वासन काँग्रेसने दिलं आहे. किमान वेतन योजना ही प्रसिद्ध अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांच्या पॉव्हर्टी इंडेक्सवर आधारित आहे. आम्ही सत्तेवर आल्यास देशातील […]

काँग्रेसच्या किमान वेतन योजनेमागे अमर्त्य सेन यांची थिअरी?
Follow us on

नवी दिल्ली : देशात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. भाजपचा पराभव करण्यासाठी मोठ्या ताकदीने काँग्रेस मैदानात उतरली आहे. यावेळी काँग्रेसने आमची सत्ता आल्यास ‘किमान वेतन योजना’ देशातील सर्व गरिबांना लागू करु असे आश्वासन काँग्रेसने दिलं आहे. किमान वेतन योजना ही प्रसिद्ध अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांच्या पॉव्हर्टी इंडेक्सवर आधारित आहे. आम्ही सत्तेवर आल्यास देशातील पाच कोटी गरिबांना प्रत्येक महिन्याला 6 हजार रुपये देऊ, अशी घोषणा समोवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

अमर्त्य सेन यांच्या मांडणीनुसार, गरिबांमध्ये खूप गरिब लोकही असतात. काँग्रेसने गरिब कुटुंबावर केलेल्या अभ्यासात दिसलं की, गरिब कुटुंबाना प्रत्येक महिन्याला कमीत कमी 12 हजार रुपयांची गरज असते. यामुळे या योजनेच्या माध्यमातून गरिब कुटुंबाना मदत करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिलं आहे.

मनमोहन सिंह आणि चिदंबरम समिती

या योजनेवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या सदस्येखाली एक समिती नेमण्यात आली. चिदंबरम यांनी याआधीही देशातली गरिब कुटुंबावर अभ्यास केला होता. या आधारावर ही समिती तयार करण्यात आली. तसेच आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांचा सल्ला घेण्यात आला. ही योजना सुरु करण्याआधी चिदंबरम यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीला याबद्दलची सर्व माहिती दिली.

अनेक देशांमध्ये राबवण्यात आली योजना

दुसऱ्या देशातही अशा योजना राबवण्यात आल्या आहेत. ब्राझीलमध्ये किमान वेतन देण्याचा दावा केला होता. मात्र यासोबत अशी अट होती की, प्रत्येकाने आपल्या मुलांना शाळेत पाठवणे अनिवार्य होते. 1967 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनीही पायलट प्रोजेक्टद्वारे ही योजना लागू करण्याचा प्रयत्न केला होता.