
ब्रुसेल्स : जागतिक पातळीवरील दिग्गज कंपनी Amazon ला 1.38 लाख कोटी रुपयांचा दंड होण्याची शक्यता आहे. अमेझॉन कंपनीविरोधात युरोपियन युनियनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. अमेझॉनवर आपल्या विक्रेत्यांच्या माहितीची गैरउपयोग केल्याचा गंभीर आरोप आहे. अमेझॉनने आपल्या वस्तूंची विक्री वाढवण्यासाठी विक्रेत्यांच्या माहितीचा दुरुपयोग केला. या प्रकरणात युरोपीय युनियनच्या नियमांचं उल्लंघन झालं असून अमेझॉनविरोधात व्यापारात गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय (Antitrust charges on E commerce player Amazon).
विक्रेत्यांनी आरोप केला आहे, “अमेझॉनने स्वतःच्या उत्पादनांची/वस्तूंची विक्री अधिक व्हावी म्हणून आपल्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर इतर विक्रेत्यांच्या माहितीचा दुरुपयोग केला. त्यांनी आपल्या नफ्यासाठी वस्तूंची विक्री वाढावी म्हणून इतर विक्रेत्यांच्या माहिती गैरवापर केला.” अमेझॉनवरील या आरोपांची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात कंपनी दोषी आढळली तर अमेझॉनला आपल्या वार्षिक टर्नओव्हरच्या 10 टक्के दंड होऊ शकतो. ही रक्कम जवळपास 1.38 लाख कोटी रुपयांपर्यंत असेल.
युरोपियन युनियनने व्यापारात चुकीच्या पद्धतीने व्यापर केल्याच्या आरोपाखाली तक्रार नोंदवली आहे. अमेझॉनवर आपल्या प्लॅटफॉर्मवर आपलं लेबल असलेल्या स्वतःच्या वस्तूंची विक्री वाढवण्यासाठी विक्रेत्यांच्या माहितीचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे. असं असलं तरी आपल्यावरील आरोप अमेझॉनने फेटाळत विनाधार असल्याचं म्हटलंय.
या प्रकरणात दोषी सापडल्यास अमेझॉनला मोठा भूर्दंड बसणार आहे. दंडापोटी आपल्या एकूण वार्षिक टर्नओव्हरच्या 10 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागू शकते. हा आकडा जवळपास 1.38 लाख कोटी रुपयांपर्यंत जातो. नियमांनुसार ई कॉमर्स प्लेटफॉर्म थर्ड पार्टी सेलर्सच्या व्यवहारांची माहिती आपल्या फायद्यासाठी वापरु शकत नाही. अस करणं बेकायदेशीर मानलं जातं.
संबंधित बातम्या :
आता अॅमेझॉनवरुन बुक करता येणार गॅस सिलेंडर
Amazon, Flipkart Sale : दिवाळीत खरेदी करा ‘हे’ पाच स्मार्टफोन, किंमत 10 हजारांपेक्षा कमी
Amazon, Flipkart Diwali Sale 2020 : ‘हे’ पाच स्मार्टफोन बंपर डिस्काऊंटसह उपलब्ध
Antitrust charges on E commerce player Amazon