मार्चमध्ये 19 दिवस बँकांना सुट्टी, सर्व बँक व्यवहार राहणार बंद

| Updated on: Feb 29, 2020 | 5:48 PM

बँक कर्माचाऱ्यांना सर्वाधिक सुट्ट्या यंदा मार्च महिन्यात मिळणार आहेत. (Bank holiday March)  दुसरा शनिवार, रविवार आणि होळी  अशा मिळून एकूण 16 दिवस बँका बंद राहणार आहेत.

मार्चमध्ये 19 दिवस बँकांना सुट्टी, सर्व बँक व्यवहार राहणार बंद
Follow us on

मुंबई :  बँक कर्माचाऱ्यांना सर्वाधिक सुट्ट्या यंदा मार्च महिन्यात मिळणार आहेत. (Bank holiday March)  दुसरा शनिवार, रविवार आणि होळी  अशा मिळून एकूण 16 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यासोबत बँकांनी तीन दिवसांचा संप पुकारला आहे. हे तीन दिवस मिळून 19 दिवस बँकेचे कामकाज बंद (Bank holiday March) राहणार आहेत.

2020 मधील तिसरा संप

यावर्षी बँकेचे कर्मचारी दर महिन्याला संप पुकारत आहेत. जानेवारी, फेब्रुवारी आणि आता मार्चमध्येही पगार वाढ या मागणीवरुन संप पुकारला आहे. हा संप 11 ते 13 मार्चपर्यंत म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवसापासून करण्यात येणार आहे. 8.47 लाख बँक कर्मचाऱ्यांची 1 नोव्हेंबर 2017 रोजी पासून पगारवाढ थांबवलेली आहे. कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार अॅडव्हान्समध्ये दिला आहे. पण कर्मचाऱ्यांनी पगारात 25 टक्क्यांची वाढ करावी अशी मागणी केली आहे.

इंडियन बँक असोसीएशन (IBA) 12.5% वाढ करण्यासाठी तयार आहेत. पण कर्मचाऱ्यांनी याला विरोध दर्शवला आहे.

कोणत्या तारखेला कुठे कुठे बँका बंद?

⦁ 1 मार्च (रविवार) – सर्व राज्यात
⦁ 5 मार्च (गुरुवार) – ओदिशामध्ये पंचायत राज दिवस
⦁ 6 मार्च (शुक्रवार) – मिजोरममध्ये चपचर कुट
⦁ 8 मार्च (रविवार) – सर्व राज्यात
⦁ 9 मार्च (सोमवार) – यूपीमध्ये हजरत अली यांचा वाढदिवस
⦁ 10 मार्च (मंगळवार) – ओडीशा, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि असममध्ये डोलजात्रा
⦁ 10 मार्च (मंगळवार) – होळी
⦁ 14 मार्च (शनिवार) – सर्व राज्यात
⦁ 15 मार्च (रविवार) – सर्व राज्यात
⦁ 22 मार्च (रविवार) – सर्व राज्यात
⦁ 23 मार्च (सोमवार) – हरियाणामध्ये भगत सिंह शहीद दिवस
⦁ 25 मार्च गुढीपाडवा (बुधवार) – कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्‍ट्र, मणिपूर आणि जम्‍मू-काश्‍मीर
⦁ 26 मार्च (गुरुवार) – गुजरात, राजस्‍थान, मध्‍य प्रदेश आणि उत्‍तराखंडमध्ये चेटी चंद यांची जयंती
⦁ 27 मार्च (शुक्रवार) – झारखंडमध्ये सरहूल
⦁ 28 मार्च (शनिवार) – सर्व राज्यात
⦁ 29 मार्च (रविवार) – सर्व राज्यात

प्रत्येक 5 वर्षाला पगार वाढतो

बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात 5 वर्षाने वाढ होत असते. गेल्यावेळीही पगार वाढीत उशीर झाला होता. कर्मचाऱ्यांचा पगार 2012 शिवाय 2015 मध्ये वाढला होता. IBA ने हा मुद्दा सोडवण्यासाठी एक समिती स्थापन केली होती.

या फेब्रुवारीत बँकेच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या DA मध्ये 4.2% ची वाढ झाली आहे. ही वाढ फेब्रुवारी ते एप्रिल कॉटरसाठी आहे. IBA ने जानेवारीमध्ये असे आदेश दिले होते. AIACPI (All India Average Consumer Price Index) चे डिसेंबर 2019 चे आकडे समोर आले आहेत. यानुसार ऑक्टोबर 2019 मध्ये सरासरी CPI 7418.42 होते. जे डिंसेबरमध्ये 7532.55 झाले. तर नोव्हेंबरमध्ये 7486.90 वर पोहोचली.