Fraud Alert | सावधान! अनोळखी कॉलवर सांगू नका ‘आई’चे नाव, अन्यथा होऊ शकते बँक खाते रिकामी!

ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी आपली वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये. जर, अनोळखी कॉलवर एखाद्याने आपल्या आईचे नाव विचारले, तर चुकूनही ते सांगू नका, अशा सूचना स्टेट बँकेने दिल्या आहेत.

Fraud Alert | सावधान! अनोळखी कॉलवर सांगू नका ‘आई’चे नाव, अन्यथा होऊ शकते बँक खाते रिकामी!
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : ऑनलाइन बँकिंगचे जितके फायदे आहेत, तितकेच तोटे देखील आहेत. ऑनलाइन बँकिंगचा मोठा फायदा म्हणजे आपले व्यवहार अगदी झटक्यात पूर्ण होतात. पैशाच्या व्यवहारासाठी एखाद्याला बँक शाखेत जाण्याची गरज नाही. परंतु, वेळ वाचवण्यासाठी केलेले या कामात आपण सावधगिरी न बाळगल्यास आपले पैसेही एका झटक्यात अदृश्य होऊ शकतात. अशावेळी अचानक तुमच्या फोनवर एक मेसेज येतो आणि तुम्हाला माहिती होते की, तुम्ही सायबर फसवणूकीचे बळी ठरला आहात आणि तुमच्या खात्यातून सगळे पैसे काढून घेण्यात आले आहेत!(Banking alert Do not Share your mother name or surname on unknown fraud calls)

म्हणूनच बँकांद्वारे वेळोवेळी हे स्पष्ट केले गेले आहे की, आपण ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी आपली वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये. जर, अनोळखी कॉलवर एखाद्याने आपल्या आईचे नाव विचारले, तर चुकूनही ते सांगू नका, अशा सूचना स्टेट बँकेने दिल्या आहेत.

स्टेट बँकेने आपल्या सूचनेत म्हटले आहे की, चुकून कोणत्याही अनोळखी कॉलवर आपल्या आईचे नाव किंवा आडनाव शेअर करु नका. स्टेट बँकेने आपल्या डेबिट कार्डधारकांना देखील हा इशारा दिला आहे. आईचे नाव किंवा आडनाव शेअर न करण्याचा सल्ला देण्यामागे ग्राहकांचे हित आहे. याचे एक महत्वाचे कारण म्हणजे ‘पासवर्ड प्रोटेक्शन’ आहे. आपण आपला डेबिट कार्ड पासवर्ड रीसेट करता, तेव्हा आपल्याला काही सिक्युरिटी संबंधित प्रश्न विचारले जातात. लोक बर्‍याचदा त्यांच्या आईचे नाव किंवा आडनाव तिथे लिहितात. आपण देखील आपल्या सिक्युरिटी प्रश्नांना आईचे नाव किंवा आडनाव ठेवले असल्यास, अनोळखी फोनवर आईचे नाव किंवा आडनाव सांगने काळजीपूर्वक टाळा.

नाव किंवा आडनावाद्वारे होते हॅकिंग!

जर, कोणत्याही हॅकर किंवा सायबर गुन्हेगारास फोनवरुण आईचे नाव किंवा आडनाव कळले असेल, तर तो आपल्या खात्यात सहज घुसखोरी करू शकतो. म्हणूनच, यापासून बचाव करण्याचा एकमात्र मार्ग असा आहे की, जर आपल्याला असा कॉल आला असेल तर, आईचे नाव किंवा आडनाव सांगू नका. जर, आपल्याला पहिल्यांदाच असा फोन आला असेल, तर सुरुवातीला काहीच बोलू नये आणि फोन थेट डिस्कनेक्ट करावा. रिझर्व्ह बँकेच्या वतीने हा फोन करण्यात आला असे म्हटले तर, त्याची नोंद तातडीने रिझर्व्ह बँकेच्या पोर्टलवर द्यावी. बँकेच्या वतीने सांगितले गेले आहे की, त्यांच्या वतीने ग्राहकांकडून कोणतीही वैयक्तिक माहिती मागितली जात नाही. म्हणून जेव्हा जेव्हा असा कॉल येईल, तेव्हा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ नका (Banking alert Do not Share your mother name or surname on unknown fraud calls).

पासवर्ड गोपनीय ठेवा!

जर तुम्ही इंटरनेट बँकिंग वापरत असाल, तर तुमचा यूजर आयडी व पासवर्ड नेहमी गोपनीय ठेवा. हे पासवर्ड कोणालाही सांगू नका, कारण यामुळे आपल्या खात्यात जमा असणाऱ्या रकमेला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच, इंटरनेट किंवा मोबाईल बँकिंगसाठी नेहमीच स्ट्राँग पासवर्ड तयार करा, कारण सामान्यत: लोक सोपा पासवर्ड निवडतात, ज्यामुळे तो लक्षात ठेवणे सोपे होते. परंतु, असे संकेतशब्द हॅक करणे सोपे असते.

स्ट्राँग पासवर्ड ठेवा.

इंटरनेट किंवा मोबाईल बँकिंगसाठी नेहमीच स्ट्राँग पासवर्ड तयार करा. पासवर्ड तयार करताना तुम्हाला शब्दांसह अंक वापरण्याची सूचनाही बँकिंग यंत्रणेने केली आहे. तुमच्याशिवाय कोणीही विचार करू शकत नाही असा संकेतशब्द तयार करा. यामुळे हॅकिंगची शक्यता कमी होईल. आपल्याला वेळोवेळी आपला संकेतशब्द बदलण्याची सूचना देखील देण्यात येते. बरेच दिवस एकाच पासवर्ड ठेवल्यामुळे जोखीम वाढते. मोबाईल नंबरसह आधार आणि पॅन जोडल्यानंतर हा धोका अधिक वाढला आहे.

ऑनलाईन बँकिंग करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा!

ऑनलाईन बँकिंग करताना एका गोष्टीची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. ऑनलाईन बँकिंगमध्ये तुम्ही ज्या कंपनीचा किंवा व्यापाऱ्याबरोबर व्यवहार करत आहात, त्याला तुमच्या कार्डाशी संबंधित माहिती कधीही सेव्ह करू देऊ नका. कोणाबरोबरही सीव्हीव्ही व पिन क्रमांक शेअर करू नका. आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नका. यूपीआय आणि भीम अ‍ॅपमधून व्यवहार करतानाही या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. व्यापार्‍याने दिलेल्या देय तपशीलाची विनंती तपासल्यानंतरच पैसे द्या. आपले यूपीआय आधारित अॅप्स नेहमीच अद्यतनित ठेवा.

(Banking alert Do not Share your mother name or surname on unknown fraud calls)

हेही वाचा :

SBI मध्ये खातं असेल तर तुम्हालाही स्वस्तात पेट्रोल मिळू शकतं!

SBI चे 44 कोटी ग्राहकांना अलर्ट! मोबाईलवर SMS आल्यास त्वरित करा हे काम, अन्यथा…

Published On - 1:34 pm, Sat, 27 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI