AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI मध्ये खातं असेल तर तुम्हालाही स्वस्तात पेट्रोल मिळू शकतं!

तुमचे SBI मध्ये खाते असल्यास तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदी डिस्काउंट मिळू शकते. | Petrol Diesel SBI

SBI मध्ये खातं असेल तर तुम्हालाही स्वस्तात पेट्रोल मिळू शकतं!
| Updated on: Feb 27, 2021 | 1:15 PM
Share

मुंबई: गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडल्याने सामान्यांची चिंता वाढली आहे. पेट्रोलने शंभरी गाठल्यानंतर आता मध्यमवर्गीय व्यक्ती दुचाकी किंवा चारचाकी घरातून बाहेर काढताना दहावेळा विचार करत आहे. एकंदरीतच पेट्रोल (Petrol) किंवा डिझेलची (Diesel) कशी बचत करता येईल, याचा विचार प्रत्येक वाहनधारक करत आहे. अशा परिस्थितीत आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) खातेधारकांना काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तुमचे SBI मध्ये खाते असल्यास तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदी डिस्काउंट मिळू शकते. स्टेट बँक आणि इंडियन ऑईल यांनी एकत्रितपणे RuPay डेबिट कार्ड लाँच केले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीसाठी या कार्डचा वापर केल्यास ग्राहकांना लाभ मिळू शकतो. (Discount on Petrol and Diesel rates for SBI Card holders)

SBI च्या कार्डचा फायदा काय?

SBI चे हे कार्ड कॉन्टॅक्टलेस असेल. त्यामुळे हे कार्ड स्वाईप न करता पेट्रोल पंपावर तुमच्या खात्यातील पैसे वळते होतील. तुम्ही गाडीत जेवढ्या किंमतीचे पेट्रोल किंवा डिझेल भराल त्याच्या 0.75 टक्के रिवॉर्ड पॉईंट तुम्हाला मिळतील. या रिवॉर्ड पॉईंटसचा वापर तुम्ही हॉटेल्स, सिनेमागृह किंवा कोणत्या बिलाचे पैसे भरण्यासाठी वापरु शकता.

SBI आणि BPCL चे ऑक्टेन कार्ड?

काही दिवसांपूर्वी एसबीआय कार्ड (SBI Card) आणि भारत कॉर्पोरेशन लिमिटेडने (BPCL) एक नवीन क्रेडिट कार्ड आणले होते. या क्रेडिट कार्डमुळे पेट्रोल-डिझेलसाठी कार्डने पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे. इंधनांवर जास्त खर्च करणाऱ्या ग्राहकांची बचत करण्याच्या उद्दिष्टानेच हे कार्ड लाँच करण्यात आल्याचे एसबीआयकडून सांगण्यात आले. (BPCL SBI Card Octane)

या क्रेडिट कार्डचे नाव BPCL SBI Card Octane असे आहे. या क्रेडिट कार्डमुळे भारत पेट्रोलियमचे इंधन , मॅक ल्युब्रिकन्ट, भारत गॅस (LPG) यासारख्या सुविधांसाठी संकेतस्थळ आणि अ‍ॅपच्या माध्यमातून खर्च केल्यास 25 रिवार्ड पॉईंटस मिळतात.

BPCL च्या पेट्रोल पंपावर सूट

BPCL च्या पेट्रोल पंपावर इंधन किंवा ल्युब्रिकन्टसाठी खर्च केल्यास 7.25 टक्के कॅशबॅक आणि भारत गॅसच्या सुविधेसाठी खर्च झाल्यास 6.25 टक्के कॅशबॅकचा लाभ मिळेल. याशिवाय, डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि अन्य किराणा दुकानांमध्येही हे क्रेडिट कार्ड वापरल्यास सूट मिळू शकते.

BPCL SBI Card Octane कार्ड घेतल्यास ग्राहकांना देशभरातील बीपीसीएलच्या 17 हजार पेट्रोल पंपांवर त्याचा लाभ घेता येईल. प्रत्येक इंधन खरेदीवेळी ग्राहकांची बचत होईल.

स्टेट बँक आणि पेटीएमची भागीदारी

यापूर्वी एसबीआय कार्डसने Paytm सोबत भागीदारी करून Paytm SBI card आणि Paytm SBI card Select अशी दोन क्रेडिट कार्डस लाँच केली होती. ही दोन्ही व्हिसा कार्ड होती. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि खर्चावर अधिकाअधिक बचतीसाठी ही क्रेडिट कार्ड फायदेशीर असल्याचे स्टेट बँकेकडून सांगण्यात आले होते. यंदाच्या वर्षात एसबीआय कार्डसने IPOच्या माध्यमातून 10.355 कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे.

संबंधित बातम्या:

Special Report | पेट्रोल-डिझेलचे दर शंभरी वर! ठाकरे सरकार सर्वसामन्यांना दिलासा देणार?

थंडीच्या मोसमात पेट्रोलचे दर वाढतातच, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचा दावा

(Discount on Petrol and Diesel rates for SBI Card holders)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.