थंडीच्या मोसमात पेट्रोलचे दर वाढतातच, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचा दावा

देशातील पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. अनेक शहरांमध्ये तर एक लिटर पेट्रोलचा दर शंभर रुपयांपेक्षाही जास्त झाला आहे (Union Petroleum Minister Dharmendra Pradhan said petrol diesel price hike in winter).

थंडीच्या मोसमात पेट्रोलचे दर वाढतातच, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचा दावा
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 10:55 PM

मुंबई : देशात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. अनेक शहरांमध्ये तर एक लिटर पेट्रोलचा दर शंभर रुपयांपेक्षाही जास्त झाला आहे. त्यामुळे अनेकांकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. अनेक पक्षांनी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात देशात आंदोलन केल्याचं बघायला मिळालं आहे. दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अनोखं उत्तर दिलंय. थंडीच्या मोसमात पेट्रोल-डिझेलचे दर वाढतातच, असा दावा त्यांनी केला आहे. त्याचबोरबर हिवाळा संपल्यावर पेट्रोल-डिझेलचा दर कमी होईल, असं त्यांनी सांगितलंय (Union Petroleum Minister Dharmendra Pradhan said petrol diesel price hike in winter).

“आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत वाढल्याने त्याची झळ सर्वसामान्य ग्राहकांनादेखील बसत आहे. हिवाळा संपला की, दर थोडेफार कमी होईल. हा एक आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे. पेट्रोल-डिझेलची मागणी वाढल्याने किंमती वाढल्या. थंडीच्या मोसमात हे असं नेहमी होतं. पुढच्या काही दिवसांमध्ये किंमती कमी होतील”, असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले (Union Petroleum Minister Dharmendra Pradhan said petrol diesel price hike in winter).

देशातील महत्त्वाच्या शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

शुक्रवारी दिल्लीत पेट्रोलचे दर हे 90.93 रुपये प्रति लिटर होते. तर डिझेलचे दर प्रति लिटर 81.31 रुपये इतके होते. मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 97.34 तर डिझेलचे दर प्रति लिटर 88.44 रुपये आहेत. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 94.68 तर डिझेलचे दर प्रति लिटर 84.20 रुपये इतकं होतं. तर बंगळुरुमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 93.98 तर डिझेलचे दर प्रति लिटर 86.21 रुपये इतकं होतं.

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.