Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जारी, वाचा तुमच्या शहरातले आजचे दर

आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गुरुवारी राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत 35 पैशांची वाढ झाली तर डिझेलच्या किंमतीही 35 पैशांनी वाढल्या.

Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जारी, वाचा तुमच्या शहरातले आजचे दर
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 7:02 AM

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये (Petrol Diesel Price Today 25 February) सातत्याने वाढ होत आहे. देशातल्या अनेक शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पार गेल्या आहेत. गेल्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अनेक पटींनी वाढ झाली. दररोज 30 पैशांपर्यंत वाढ झाल्याचं समोर आलं आहे. मंगळवारी इंधनाच्या दरांमध्ये वाढ झाली पण बुधवारी आणि आज गुरुवारीही दरांमध्ये फारसे बदल झालेले दिसले नाहीत. (petrol diesel price today 25 February 2021 know the new rate of chennai mumbai and kolkata)

आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गुरुवारी राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत 35 पैशांची वाढ झाली तर डिझेलच्या किंमतीही 35 पैशांनी वाढल्या. खरंतर, तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी करतात. दिल्लीबद्दल बोलायचं झालं तर गुरुवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत 90.93 वर पोहोचली आहे. मुंबईतील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 97.34 रुपये आहे. एकंदरीतच मेट्रो शहरांमध्ये इंधनाचे दर सर्वाधिक आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत आत्तापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर गेली आहे.

प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर

नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 90.93 रुपये प्रति लिटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today) : 97.34 रुपये प्रति लिटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today) : 91.1 2रुपये प्रति लिटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 92. 90 रुपये प्रति लिटर

नोएडा (Noida Petrol Price Today) : 89.19 रुपये प्रति लिटर

प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 81.32 रुपये प्रति लिटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.44 रुपये प्रति लिटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.20 रुपये प्रति लिटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today) : 86.31 रुपये प्रति लिटर

नोएडा (Noida Diesel Price Today) : 81.76 रुपये प्रति लिटर

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (petrol diesel price today 25 February 2021 know the new rate of chennai mumbai and kolkata)

संबंधित बातम्या – 

30 वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या कर्मचार्‍यांना शासन देणार 120000 रुपये; नेमकं सत्य काय?

आता पोस्टाच्या बचत योजनाही खासगी बँकेत उपलब्ध होणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय

फक्त 5 हजारांच्या गुंतवणुकीत लाखोंची कमाई करण्याची संधी; 9 मार्च शेवटची तारीख

(petrol diesel price today 25 February 2021 know the new rate of chennai mumbai and kolkata)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.