AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढील आठवड्यात बँका चार दिवस बंद; ‘या’ तारखांना असणार सुटी

सध्या देशात सणासुदीचा काळ आहे, त्यामुळे साहाजीक बँकांच्या सुट्यांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. पुढील आठवड्यात देशातील प्रमुख सरकारी आणि खासगी बँका तब्बल 4 दिवस बंद राहणार आहेत.

पुढील आठवड्यात बँका चार दिवस बंद; 'या' तारखांना असणार सुटी
| Edited By: | Updated on: Nov 21, 2021 | 11:28 AM
Share

नवी दिल्ली –  सध्या देशात सणासुदीचा काळ आहे, त्यामुळे साहाजीक बँकांच्या सुट्यांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. पुढील आठवड्यात देशातील प्रमुख सरकारी आणि खासगी बँका तब्बल 4 दिवस बंद राहणार आहेत. या महिन्यात आतापर्यंत बँकां एकूण 13 दिवस बंद राहिल्या आहेत. तर पुढील आठवड्यात सोमवारपासून आणखी चार दिवस बंद राहणार आहेत. याचाच अर्थ या महिन्यात बँकांना तब्बल 17 दिवस सुट्या होत्या. साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात अनेक सण,उत्सव असतात. त्यामुळे या महिन्यात इतर महिन्यांच्या तुलनेत बँकांना अधिक सुट्या असतात.

आरबीआयकडून बँकांच्या सुट्यांचे नियमन 

भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयकडून बँकांच्या सुट्यांबाबत एक लिस्ट जारी करण्यात येते, या लिस्टनुसार राज्यातील आणि देशातील बँकांच्या सुट्यांचे नियमन होत असते. बँकांच्या सुट्यांबाबत प्रत्येक राज्यांचे आपले वेगळे नियम असतात. त्यामुळे एखाद्या सणाला जर एखाद्या राज्यातील बँक बंद असेल तर दुसऱ्या राज्यातील बँकेला देखील सुटी असेलच असे नाही. त्यामुळे जर आपले बँकेत काही महत्त्वाचे काम असेल तर आपण आरबीआयकडून जाहीर करण्यात आलेली ही सुट्यांची लीस्ट चेक करून बँकेत जाऊ शकतो. त्यामुळे बँक बंद असल्यास आपला वेळ वाया जाणार नाही.

पुढील आठवड्यातील सुट्या

22 नोव्हेंबर कनकदास जयंती – कर्नाटकमध्ये सुटी 23 नोव्हेंबर सेंग कुत्नेम- शिलांग 27 नोव्हेंबर चौथा शनिवार 28 नोव्हेंबर रविवार

येत्या सोमवारपासून तब्बत चार दिवस बँक बंद राहणार असल्याने, जर  बँकेत काही महत्त्वाचे काम असेल तर ते आपल्याला लवकरात लवकर करावे लागेल अन्यथा काम लांबणीवर पडू शकतो. बँकेत जाण्यापूर्वी आरबीआयने जारी केलेली सुट्यांची लिस्ट चेक करणे फायदेशीर ठरते. त्यामुळे आपल्याला बँक आज चालू राहणार आहे की, बंद आहे याची कल्पना येते. व आपला वेळही वाचतो.

संबंधित बातम्या 

बांधकामासाठी आवश्यक कच्च्या मालाच्या दरामध्ये भरमसाठ वाढ; विकासकांचे नुकसान, किमती नियंत्रणात आणण्याची मागणी

नवे कृषी कायदे रद्द झाल्याचा उद्योग क्षेत्राला फटका ; कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीचा ओघ कमी होणार?

‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना बनवले कोट्याधीश; 20 वर्षांमध्ये शेअर्सच्या किमतीत 650 टक्क्यांची वाढ

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.